World Autism Awareness Day 2024 esakal
आरोग्य

World Autism Awareness Day 2024 : मुलांच्या हाती ‘गॅझेट’ देण्याऐवजी त्यांच्याशी खेळा

अयोग्य जीवनशैली, मानसिक स्थिती, वाढता ताण, उशिरा प्रसूती, प्रसूतीमध्ये गुंतागुंत यामुळे मुलांमध्ये ‘ऑटिझम’चा आजार होऊ शकतो.

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अयोग्य जीवनशैली, मानसिक स्थिती, वाढता ताण, उशिरा प्रसूती, प्रसूतीमध्ये गुंतागुंत यामुळे मुलांमध्ये ‘ऑटिझम’चा आजार होऊ शकतो. अलीकडच्या काळात दोन वर्षाच्या आतील मुलाच्या हातात मोबाईल दिला जात असल्याने किंवा टीव्हीसमोर त्यांना बसवून ठेवले जात असल्याने काहींमध्ये ‘ऑॅटिझम’ची लक्षणे दिसून आली. मोबाईलमुळे लहान मुलांमधील समस्या वाढत आहेत. हा न्युरोलॉजीकल डिसऑर्डर आहे, यामुळे मुलांच्या हाती ‘गॅझेट’ देण्याऐवजी त्यांच्याशी खेळावे, त्यांना प्रेम द्यावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

ऑटिझम हा काही रोग नाही, तर एक मेंदूची अवस्था आहे. ही मुलं-मुली अगदी सामान्य मुलांसारखी खेळतात. उड्या मारतात, किंबहुना इतर मुलांपेक्षा कधी कधी जास्त ऊंचावर चढतात, चंचल असतात. दोन-तीन एक वर्षाचे झाले की काही मुले वेगळे वागत आहेत असे जाणवते. जन्माला येणाऱ्या दर हजार मुलांमध्ये किमान एक जण कुठल्या ना कुठल्या दिव्यांग अवस्थेशी झुंज देते.

या पैकी सरासरीने किमान एखादे मुल ऑटिझम अर्थात स्व-मग्न असते, असे जागतिक आरोग्य संघटना म्हणते. ही स्वमग्न अवस्था आजवर मतीमंद अथवा गतीमंद प्रकारात गणली जायची. सरकारच्या नव्या धोरणामुळे आता स्वमग्न मुलांना गतीमंदत्वाच्या प्रकारांतरातून वगळून त्यांना स्वतंत्र दर्जा दिला आहे,अशी माहिती मेडिकलच्या मानसोपचार विभागप्रमुख डॉ. मनिष ठाकरे यांनी दिली.

विद्यमान स्थितीत राज्यातल्या कुठल्याही मुलाला अशा प्रकारचे प्रमाणपत्र हवे असेल तर मुंबईतील सायन अथवा केईएम गाठावे लागते. स्वमग्नतेशी झुंजणाऱ्या मुलांना आता राज्यात ‘नागपूर’ हे असे एकमेव शहर आहे, जिथे अशा मुलांना स्वतंत्र प्रमाणपत्र मिळते आहे. त्याही पुढे एक पाऊल टाकत जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राने अशा १५० पेक्षा अधिक मुलांना स्वावलंबन कार्डही वितरित केले आहे. त्यामुळे अशा मुलांच्या पालकांची प्रमाणपत्रांसाठी मुंबईचे जाण्याची प्रक्रिया खंडित झाली आहे.

ऑटिझम या मानसिक स्थितीला सामोरे जाण्यास मुलांच्या पालकांना थोडी जास्त आव्हाने येतात. परंतु, योग्य मार्गदर्शनाद्वारे हे आव्हान सोपं होऊन जातं. वेळोवेळी होणारी शिबिरे व सपोर्ट ग्रुप यामुळे ऑटिझम व आपल्या मलांकडे बघण्याची त्यांची दृष्टीदेखील प्रगल्भ झाली आहे. मेडिकलमध्ये तपासणीची आणि प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सोय झाली आहे. दरवर्षी मेडिकलमध्ये ५० ते ६० ऑटिझम मुलांची नोंद होते.

-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल -नागपूर

ऑटिझमची लक्षणे

  • नजरेला नजर न मिळवणे.

  • सतत एकाच गोष्टीत रममान होऊन राहणे.

  • एखाद्या गोष्टीकडे एकटक बघणे.

  • लोकांमध्ये जाणे न आवडणे.

  • समोरून कोणी चालत येत असेल तरी काही ऑटिस्टिक मुलांना खूप भीती वाटते

पालकांनी हे करावे...

  • योग्य जीवनशैली आत्मसात करा.

  • मुलांच्या हाती ‘गॅझेट’ देण्याऐवजी त्याच्याशी खेळा.

  • त्याच्याशी संवाद वाढवा.

  • प्रत्येक गोष्ट समजावून सांगा.

  • उद्यानात घेऊन जा, त्यांच्याशी खेळा.

  • आई-वडिलांनी किमान एक तासाचा वेळ बाळासाठी काढावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT