World Bicycle Day 2024 esakal
आरोग्य

World Bicycle Day 2024 : रोज सायकल चालवा अन् निरोगी राहा..! जागतिक सायकल दिनानिमित्त जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

World Bicycle Day 2024 : जगभरात दरवर्षी ३ जून हा दिवस 'जागतिक सायकल दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

World Bicycle Day 2024 : पूर्वीच्या काळी बहुतेक लोक हे एकतर पायी चालत किंवा सायकलचा वापर करून प्रवास करत होते. चालण्यामुळे आणि सायकलमुळे शरीर तंदुरूस्त रहायचे. परंतु, जसेजसे नंतर शहरीकरण झाले तसतसे सायकलचा वापर ही कमी होऊ लागला. त्याऐवजी मग दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे प्रमाण वाढू लागले.

आजकाल अनेक लोकांकडे बाईक, स्कूटर किंवा कार असते. जवळच्या ठिकाणी जायचे असो किंवा लांबच्या ठिकाणी लोक सर्रासपणे बाईक, स्कूटर, स्कूटी किंवा कारचा वापर करतात. वाहनांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाबरोबरच आपल्या आरोग्याचे ही नुकसान होते. वाहनांच्या अतिवापरामुळे वातावरणात प्रदूषणाचे प्रमाण वाढते आणि श्वसनासारख्या समस्या उद्भवतात.

वाहनांऐवजी आपण किमान जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करायला हवा. सायकल चालवल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि आपले आरोग्य ही चांगले राहते. आज जागतिक सायकल दिनानिमित्त आपण सायकल चालवण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

स्नायू मजबूत होतात

नियमितपणे सायकल चालवल्यामुळे आपले शरीर तंदूरूस्त राहण्यास मदत होते. आपल्या शरीरातील पायांचे, हातांचे आणि खांद्याचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

मानसिक आरोग्य उत्तम राहते

सायकल चालवल्याने नैराश्य, चिंता आणि तणावाची समस्या दूर होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त नियमित सायकल चालवल्याने आपल्या शरीरातील हॅपी हार्मोन्स अर्थात आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते. दररोज काही तास सायकल चालवल्याने चांगली झोप येते आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

सायकल चालवणे हा शरीराचा सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. हा अतिशय सोपा व्यायाम प्रकार आहे. अनेकांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. जर तुम्ही रोज किमान १ तास किंवा अर्धा तास जरी सायकल चालवली तरी महिन्याभरात तुमचे वजन कमी होऊ शकते. सायकल चालवल्याने शरीरातील फॅटस बर्न होण्यास मदत होते.

सांध्यांसाठी लाभदायी

जिममध्ये अधिकचे वर्कआऊट केल्याने साध्यांवर खूप ताण येतो. त्यामुळे, सांध्यांना आणि गुडघ्याला दुखापत होण्याचा धोका असतो. परंतु, सायकल चालवल्याने गुडघ्यांवर जास्त ताण येत नाही आणि शरीराचा उत्तम व्यायाम ही होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT