World Blood Donor Day 2024 : जगातील सर्वोत्कृष्ट दान म्हणजे रक्दान होय. रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. रक्तदान केल्याने आपण एका बाजूला व्यक्तीचा जीव ही वाचवतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला एक आत्मिक समाधान ही मिळते. काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते रक्तदान केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे, रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे.
सुरक्षित रक्त आणि रक्ताच्या गरजेबद्दल समाजात जागरूकता वाढवणे आणि रक्तदान करण्यासाठी लोकांनी पुढे यावे यासाठी जगभरात दरवर्षी १४ जून हा दिवस ‘जागतिक रक्तदाता दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
रक्तदान करून जीव वाचवणाऱ्या रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या दिनामागचा प्रमुख उद्देश आहे. आज या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आपण रक्तदान करण्यापूर्वी काय काळजी घ्यायची? आणि त्याचे आरोग्याला होणारे फायदे कोणते? ते जाणून घेऊयात.
जर तुमचे शरीर हायड्रेटेड असेल तर, शरीरातील नसा शोधणे हे सोपे जाते. शिवाय, रक्त देताना किंवा रक्तदान केल्यानंतर अशक्तपणामुळे तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे, रक्तदान करण्यापूर्वी भरपूर पाणी प्या.
रक्तदान करायला जाण्यापूर्वी काहीतरी अवश्य खा. याशिवाय रक्तदानाच्या वेळी मिळणारा फराळ अवश्य खा. यामुळे, तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहील आणि रक्तदान केल्यानंतर तुम्हाला अशक्तपणा येणार नाही.
जर तुम्हाला दररोज व्यायाम करण्याची सवय असेल तर रक्तदान करण्यापूर्वी व्यायाम करा, पुरेसा आहार घ्या. त्यानंतर रक्तदान करा. रक्तदान केल्यानंतर अजिबात व्यायाम करू नका.
रक्तदान केल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. मेंटल हेल्थ फाऊंडेशनच्या अहवालानुसार रक्तदान केल्याने आरोग्याला खालील फायदे होतात.
तणाव कमी होण्यास मदत होते.
मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारते.
रक्तदान करताना केल्या जाणाऱ्या मोफत तपासणीचे शरिराला अनेक फायदे होतात.
नकारात्मक भावनांपासून मुक्त होण्यास मदत होते.
हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
मनात सकारात्मक भावना निर्माण होतात.
रक्तदान केल्याने रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.