World Heart Day 2023  Sakal
आरोग्य

World Heart Day 2023 : कोलेस्‍ट्रॉल नियंत्रणात ठेवायचंय? जाणून घ्या 5 सोपे उपाय

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हृदयाशी संबंधित विकारांचा धोकाही वाढतो.

Harshada Shirsekar

जागतिक हृदय दिवस (World Heart Day 2023) दरवर्षी 29 सष्टेंबरला साजरा केला जातो. हृदयाशी संबंधित आजारांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.  हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर कोलेस्ट्रॉलच्या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

दरवर्षी हृदयविकारामुळे ग्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या जवळपास 4.4 दशलक्ष केसेस समोर येताहेत, यामध्ये असे आढळून येते की शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हृदयाशी संबंधित विकारांचा धोकाही वाढतो. या समस्या टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी कशी नियंत्रणात ठेवावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

वैद्यकीय तपासणी व मागदर्शन

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नियमित तपासणी करणं आवश्यक आहे. रक्‍त चाचण्‍यांद्वारे कोलेस्‍ट्रॉल प्रोफाइलबाबत माहिती मिळते. ज्याद्वारे डॉक्टर तुम्हाला डाएट, व्यायाम आणि आवश्यक औषधोपचाराबाबत योग्य मार्गदर्शन करतील.

नियमित व्यायाम करा 

नियमित व्यायाम केल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते व शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रणात राहू शकते. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जॉगिंग, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारखे व्यायाम आपण करू शकता. योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास शरीराचे वजन नियंत्रणात राहील तसेच खराब कोलेस्ट्रॉलचा धोका देखील टळेल.

पौष्टिक आहार  

जंकफूडचे सेवन केल्यास हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. आपल्या आहारामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा. फायबरयुक्त व पौष्टिक खाद्यपदार्थांचेच सेवन करावे. ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळेल.

शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा 

लठ्ठपणाची समस्या विशेषतः पोटाभोवती जमा झालेल्या अतिरिक्त चरबीमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होऊ शकते.  संतुलित आहाराचे सेवन व नियमित व्‍यायाम करून आपण शरीराचे वाढलेले वजन कमी नियंत्रणात आणू शकता. वजन नियंत्रणात असल्यास हृदयविषयक आजारांचा धोका कमी होऊ शकतो आणि एकूणच आरोग्‍य उत्तम राहते. 

वाईट सवयी सोडा

धूम्रपान आणि मद्यपानामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी असंतुलित होऊ शकते. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल देखील वाढते. यामुळे शक्यतो लवकरात लवकर अशा वाईट सवयींपासून स्वतःची सुटका करून घ्यावी. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी घडवलं सुसंस्कृतपणाचं दर्शन; चुलते श्रीनिवास पवार यांचे घेतले आशिर्वाद

Traffic Update: मतदारांची गावी जाऊन मतदान करण्यासाठी धडपड; मात्र वाहतूक कोंडीचं विघ्न, मुंबई-गोवा महामार्गावर लांबच लांब रांगा

Chhatrapati Sambhajinagar Assembly Election : मतदार संख्येत भर; शाई वाढली, मतदान केंद्रांना तब्बल ७ हजार २०० बाटल्यांचा पुरवठा

Nashik Vidhan Sabha Election : बालेकिल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी कुटुंबीयांसमवेत प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

प्राजक्ता माळी ते सोनाली कुलकर्णी, मराठी कलाकारांनीही बजावला मतदानाचा हक्क; शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT