Heart Attack and Blood Group Sakal
आरोग्य

World Heart Day 2023: रक्तगट आणि हार्ट अटॅकचा असा आहे संबंध; तुमचा ब्लड गृप यात नाही ना?

सर्वच वयोगटांमध्ये आता हृदयविकाराची समस्या अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणं गरजेचं आहे.

वैष्णवी कारंजकर

हृदयरोग, विशेषतः हार्ट अटॅकची समस्या हल्ली अधिक गंभीर होत आहे. यामुळे आता कमी वयाच्या लोकांनाही धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, ३० वर्षांहून कमी वयाचे लोकही अशा गंभीर समस्यांना बळी पडत आहेत. त्यामुळे आता सर्वच वयोगटातल्या लोकांना हृदयविकारापासून वाचण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

पण काही वेळा हृदयरोगाशी रक्त गट म्हणजे ब्लडगृपचाही संबंध असतो. काही विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका अधिक असल्याचं आढळून आलं आहे. याबद्दल अमर उजालाने सविस्तर माहिती दिली आहे. जाणून घ्या हृदयविकाराचा रक्तगटाशी नक्की संबंध काय आहे?

संशोधन लोकांना त्याच्या जोखमींबद्दल सतर्क करत आहे. संशोधकांच्या टीमला असं आढळून आलं की रक्त गट ए आणि बी असलेल्या लोकांमध्ये रक्तगट ओ असलेल्या लोकांपेक्षा रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका जास्त असतो. रक्त गोठण्याच्या स्थितीमुळे हृदयरोग आणि हृदयविकाराचा धोका वाढतो असं मानलं जातं.

मागील संशोधनात हृदयरोग आणि एबीओ जनुक यांच्यातील संभाव्य दुवा देखील सांगितला आहे, जो ए, बी किंवा एबी रक्तगट असलेल्या लोकांमध्ये असतो. प्राथमिक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की वायू प्रदूषणासारख्या परिस्थितीमुळे अशा रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो, ज्यासाठी प्रत्येकाने विशेष काळजी आणि दक्षता घेतली पाहिजे.

चार लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासात, अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या तज्ञांनी नोंदवलं की रक्तगट ओ असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ८% आणि इतर लोकांच्या तुलनेत १०% जास्त हृदयविकाराचा धोका असतो. A किंवा B रक्तगट असलेल्या लोकांसाठी हे सर्व वाईट नसलं तरी, संशोधकांच्या टीमला असं आढळून आलं की ओ रक्तगट असलेल्या लोकांमध्ये ए आणि बी रक्तगट असलेल्या लोकांच्या तुलनेत उच्च रक्तदाबाचा धोका ३% कमी असतो.

अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन विद्यापीठातील तज्ज्ञ म्हणतात की रक्तगटावरुन तुम्हाला हृदयविकार होणारच असं खात्रीने सांगता येत नाही. पण अधिक सावध राहिलं पाहिजे, हे सांगितलं जातं. हृदयविकार टाळण्यासाठी आपण सर्वांनी सतत प्रयत्न केले पाहिजेत, खबरदारी घेऊन तुम्ही तुमचे धोके कमी करू शकता.

टीप - वरील माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT