Healthy And Happy Heart: सध्याच्या धावपळीच्या काळात अनेकांना हृदयासंबंधित समस्या निर्माण होतात. तसेच दिवसेदिवस हृदयासंबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. लोकांना त्यांच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. लोकांना हृदयविकाराचा धोका टाळण्यास आणि त्यांच्या हृदयाची चांगली काळजी घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २९ सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. या हृदय दिनानिमित्त डॉक्टरांनी हृदयाची काळजी घेण्यासाठी काय करावे हे सांगितले आहे.
व्यायाम करणे किंवा शरीर सक्रिय असणे हा तुमच्या हृदयासाठी खूप चांगला उपाय आहे. यामुळे तुमच्या हृदयाला पंप करणे सोपे होते. व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि तुमचे आरोग्य निरोगी राहते. व्यायाम केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते. याशिवाय व्यायामामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहते.
पण, तुम्हाला जास्त कठिण व्यायाम करण्याची गरज नाही. डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही दिवसातून फक्त ३० मिनिटे चालणे, जॉगिंग किंवा इतर कोणताही हलका व्यायाम करू शकता. हृदय आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी पोहणे, चालणे, धावणे आणि जॉगिंगसारखे व्यायाम करू शकता. तसेच, लक्षात ठेवा की जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा तुम्ही उच्च रक्तदाब पातळीचे रुग्ण असाल तर व्यायाम करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
हृदयाचे कार्य संतुलित राहण्यासाठी योग्य आहार अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या रोजच्या आहारात शक्य तितक्या हिरव्या भाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करावा. तसेच निरोगी चरबीसाठी तुम्ही सुकामेवा, सीड्स, अॅवोकॅडो, फॅटी फिश आणि ऑलिव्ह ऑइलचे सेवन करू शकता. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड, रिफाइंड फूड आणि पॅक केलेले पदार्थ खाणे टाळावे. अन्नपदार्थ कमी तेलत बनवा आणि साखर आणि मीठ कमीत कमी खावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.