World Liver Day 2024 : मद्यपान हे यकृत विकाराचे मुख्य कारण आहे. परंतु जंक फूडचे अतिसेवन, धुम्रपान, कामाचा ताण अशा नेहमीच्या वाईट सवयींमुळे यकृताच्या विकारात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अतिप्रमाणात औषधी घेतल्यास यकृताच्या कार्यात बिघाड होण्याचा धोका आहे.
एकदा यकृताचा आजार झाला की, व्यक्ती मृत्यूच्या दाराजवळ पोचतो. नकळत येणारा आजार असल्याने यकृत विकाराने अखेरच्या घटका मोजत असताना उपचारासाठी येतात. या स्थितीत यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्यात नसतो. देशात यकृताचा कॅन्सर आणि सायरोसिसमुळे तब्बल दीड लाखावर व्यक्ती दगावतात.
दरवर्षी २ लाख यकृताने आजारी व्यक्ती अखेरच्या क्षणी निदान होते. त्यातच अलीकडे बदललेली जीवनशैली आणि मद्यपानाचे अधिक सेवन जीवघेण्या दीर्घकालीन यकृत विकारांचे प्रमुख कारण ठरत आहे. मधुमेह आणि लठ्ठपणा हे देखील यकृत विकारास कारणीभूत ठरतात. अशा विकारांना बळी पडणाऱ्यांचे वय हे ४० ते ६० वयोगटातील आहे.
पोटात जडपणा
पोटदुखी,
अन्नपचन
भूक मंदावणे
उलट्या व मळमळ,
कावीळची लागण
उलटीद्वारे रक्त
पोट फुगणे
पायाला सूज
हिपॅटायटीस बी
साधा कावीळ
फॅटी लिव्हर
लिव्हर सिरॉसिस
यकृत शरीराचा महत्वाचा अवयव असून तब्बल ५०० हून अधिक कार्य करते. यकृताला होणाऱ्या विकारांसाठी हिपॅटायटिस-बी विषाणू हा सर्वात जास्त कारणीभूत ठरतो. यामुळे भारतीय जीवनशैली अंगीकारावी. ताण तणाव घालविण्यासाठी काही जण मद्यपान करतात. या सगळ्यांचा परिणाम यकृतावर होतो. स्वतःची जबाबदारी स्वीकारा, मद्यपान टाळा, लठ्ठपणा नियंत्रणात, हीच निरोगी यकृताची गुरुकिल्ली आहे.
-अमित अग्रवाल, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट,नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.