Lungs Cancer Day : शरीराच्या सर्व अवयवांना नियमितपणे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा योग्यरित्या झाला तरच ते त्यांचे कार्य योग्यरित्या करतात. अशा स्थितीत फुफ्फुस निरोगी ठेवणे आवश्यक आहे. फुफ्फुसांची योग्य देखभाल न केल्यास ते खराब होऊन फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. आज वर्ल्ड लंग्ज डे. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या घटना कमी करण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी वर्ल्ड लंग्ज डे पाळला जातो. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण म्हणजे तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान. चला तर आज आपण फुफ्फुसाचे नुकसान होत असल्यास कोणती सुरुवाती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.
फुफ्फुसांचे नुकसान होत असल्यास तुम्हाला सुरुवातील ही लक्षणं दिसून येतील
श्वास घेण्यास त्रास होणे
दीर्घकाळ छातीचे दुखणे
महिना दीड महिना घशात ठसे तयार होण्याची समस्या
खोकला आल्यास रक्तस्त्राव होणे
वजन कमी होणे
फुफ्फुसांच्या कँसरमध्ये सुरुवातीला ही लक्षणं दिसतात
काही हेल्थ रिपोर्ट्सच्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसू शकत नाहीत. मात्र काही संकेत फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकतात.
कायम खोकल्याची समस्या असणे
- नेहमीच्या खोकल्यात थोडा बदल दिसून येणे
- खोकल्यातून रक्तस्त्राव
खोकताना, हसताना किंवा दीर्घ श्वास घेताना छातीत, पाठीत किंवा खांद्यामध्ये वेदना होतात.
श्वासोच्छवास घेण्यास अचानक त्रास होणे
- वजन कमी होणे
- थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे
- भूक न लागणे
- गरगरल्यासारखे वाटणे
- चेहरा आणि मानेवर सूज येणे
- गिळताना वेदना होणे (Health)
तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य घरीच कसे चेक करता येईल? इथे वाचा
काही डॉक्टर्स असा सल्ला देतात की तुमचे फुफ्फुस निरोगी आहेत की नाही हे तुम्हाला घरीच चेक करता येतं. फुफ्फुसांचे आरोग्य चेक करण्यासाठी ब्रेथ होल्डिंग एक्सरसाइज करा. ही एक्सरसाइज करण्यासाठी दीर्घ श्वास घेऊन तो श्वास तोंडातच धरून ठेवा. या एक्सरसाइजदरम्यान तुम्ही २५-३० सेकंद श्वास रोखण्यास यशस्वी झाल्यास तुमचे फुफ्फुस निरोगी असल्याचे कळते. (Lungs)
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.