World Mental Health Day 2023 sakal
आरोग्य

World Mental Health Day 2023 : एक असाही आजार, लक्षणं वेळीच ओळखू न आल्याने घेतो गंभीर रूप अन् मग..

क किंवा बरोबर हे समजून घेण्याची मानसिक क्षमता संपते तेव्हा त्याचे गंभीर मानसिक आजारात रूपांतर होते

साक्षी राऊत

World Mental Health Day 2023 : आज वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. जगात कितीतरी मनोरूग्ण असे आहेत ज्यांना ते मानसिक आजारांची लक्षणे अनुभवताय याची कल्पनासुद्धा नसते. असाच एक आजार म्हणजे बायपोलर डिसॉर्डर. खरं तर मनात जसं येईल तसं वागणं हा माणसाचा मूळ स्वभावच असतो. मात्र त्यात चूक किंवा बरोबर हे समजून घेण्याची मानसिक क्षमता संपते तेव्हा त्याचे गंभीर मानसिक आजारात रूपांतर होते.

बायपोलर डिसॉर्डरला मॅनिक डिप्रेशन असेही म्हणतात. ही अशी मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीचे वागणे आणि त्याचा मू़ड सतत बदलतो. कधी त्याला फार उत्साह वाटतो तर कधी त्याला फार जास्त डिप्रेशन येतं. जास्त डिप्रेशन आल्यास काम करण्याचा उत्साह आणि आनंदसुद्धा अशावेळी नकोसा वाटतो.

मूड स्विंग होणे ही लक्षणं यात वर्षातून एकदा किंवा दोनदा दिसू शकतात. काही लोकांना यात भावनिक लक्षणं जाणवतील तर काहींना जाणवत नाहीत. बहुतेक प्रकरणांमध्ये, बायपोलर डिसऑर्डरवर औषधे आणि मानसशास्त्रीय समुपदेशनाने (मानसोपचार) उपचार केले जातात.

मॅनिक आणि हायपोमॅनिक एपिसोडमध्ये यापैकी तीन किंवा अधिक लक्षणे समाविष्ट आहेत:

मन अस्वस्थ वाटणे

वाढलेली ऊर्जा किंवा मनातले वादळ

भविष्य आणि आत्मविश्वासाची अतिशयोक्तीपूर्ण भावना (उत्साह)

झोप कमी होणे

असामान्य बोलकेपणा

अचानक येणारे विचार

विचलितपणा

खराब निर्णयक्षमता

बायपोलर डिसॉर्डरची लक्षणे बहुतेकदा व्यक्तीच्या लक्षात येत नाही. त्यामुळे बरेचदा हा आजार गंभीर रूप घेतो. मूड स्विंग होणे, चिडचिडेपणा हे तुम्हाला सामान्य वाटत असले तरी चिडचिड जास्त प्रमाणात वाढल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण ही लक्षणं बायपोलक डिसॉर्डरचीसुद्धा असू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT