World Milk Day 2024 esakal
आरोग्य

World Milk Day 2024 : जागतिक दूध दिन अन् आरोग्यदायी जीवन

World Milk Day 2024 : एक जून हा दिवस जगात सर्वत्र ‘जागतिक दूध दिन’ म्‍हणून साजरा केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

अरूण डोंगळे, अध्यक्ष गोकुळ

World Milk Day 2024 : एक जून हा दिवस जगात सर्वत्र ‘जागतिक दूध दिन’ म्‍हणून साजरा केला जातो. फूड अ‍ॅन्‍ड अ‍ॅग्रीकल्‍चर ऑर्गनायझेशन, युनायटेड स्‍टेटस् व त्‍यांच्याशी संलग्‍न १९१ सभासद देशांनी माणसास आवश्‍यक न्‍युट्रीशनल उपलब्‍धता वाढवण्यासाठी दुधाकडे लक्ष केंद्रित केले. २००१ पासून १ जून हा दिवस जागतिक दूध दिवस म्‍हणून साजरा होऊ लागला आहे.

दूध हा माणसाचे शरीरास आवश्‍यक असलेली पोषक अन्‍नद्रव्‍ये देणारा नैसर्गिक व परवडणारा अन्‍नघटक आहे. तसेच दूध हा असा अन्‍नपदार्थ आहे की जो थंड करून, गरम करून अथवा त्‍यापासून अनेक पदार्थ करूनही खाता येतात. इतर अनेक पदार्थांत दूध घातल्‍याने पदार्थाची लज्‍जत वाढते. यामुळे दुधाचे पोषणमूल्‍य जराही कमी होत नाही.

२०२२ मध्‍ये जगामध्‍ये ९३० मिलियन मे. टन इतके दुधाचे उत्‍पादन झाले आहे. आपला भारत देश दूध उत्‍पादनात सतत अग्रेसर असून, २०२३-२४ मध्ये भारतात सुमारे २३१० लाख मे. टन इतके दुधाचे उत्‍पादन झाले आहे. जगातील १९ टक्‍के दूध भारतात उत्‍पादित होते. भारतामध्‍ये दूध उत्‍पादनात उत्तर प्रदेश, राजस्‍थान, गुजरात, पंजाब, मध्‍य प्रदेश ही राज्‍ये आघाडीवर असून, महाराष्‍ट्राचा क्रमांक ६ वा आहे.

जगात दरडोई दुधाची उपलब्‍धता २५६ ग्रॅम/ दिन इतकी असून, देशाची सरासरी ३७५ ग्रॅम/ दिन इतकी आहे. देशातील दूध उत्‍पादनात अग्रेसर असणारी २० राज्‍ये सोडून अद्यापही उर्वरित राज्‍यात दुधाची प्रचंड कमतरता आहे. उत्‍पादित दुधापैकी ५० टक्‍के दूध पिण्‍यासाठी, ३५ टक्‍के दूध देशी दुग्‍धजन्‍य पदार्थ बनवण्‍यासाठी व १५ टक्‍के दूध विदेशी पाश्‍चात्त्य संस्‍कृतीतून आलेले पदार्थ बनवण्‍यासाठी वापरले जाते.

मानवी आरोग्य व दुधाचे महत्त्व

दूध हे व्हिटॅमिन बी–२ व बी–१२ याचा नैसर्गिक स्तोत्र आहे. आपल्या शरीरात तांबड्या पेशी निर्मितीचे महत्त्वाचे काम, तसेच आपल्या मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यास व्हिटॅमीन बी–१२ काम करते. यामुळे रक्तक्षयाचा धोका कमी होतो. दुधामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या कॅल्शियममुळे शरीरातील हाडे व दात मजबूत राहतात. दुधामध्ये असलेले प्रोटीन मानवी शरीराच्या प्रोटीनच्या गरजेची पूर्तता करतात.

शरीरात ऊर्जा निर्मितीचा भाग प्रोटीन करते. दुधामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहाते. दुधातील प्रोटीन ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी लाभदायक आहे. थंड दूध ॲसिडिटी कमी करते. दुधातील कार्बोहायड्रेडस्‌ शरीरास ऊर्जा पुरवतात व हार्मोन संतुलनाचे काम करतात. दुधातील घटकामुळे शरीराचे पोषण व वाढ होते व प्रतिकारशक्ती निर्माण होते.

कार्बोहायड्रेडस्‌, फॅटस्‌ व प्रोटिन्स शिवाय दुधामध्ये ‘ए’,‘बी’, ‘ई’ जीवनसत्वे, काही प्रमाणात ‘सी’ व ‘के’ जीवनसत्वे, मॅग्नेशियम व इतर काही मूलद्रव्ये असतात म्हणूनच दुधाला पूर्णान्न असे संबोधले जाते. मुलांच्या पोटात दूध गेलेच पाहिजे, असा कित्येक पालकांचा अट्टहास यासाठीच असावा असे वाटते.

भारतातील दुग्‍धव्‍यवसायाची व्‍याप्‍ती

  • १७७ मिल्क युनियन, १५ मिल्क मार्केटिंग फेडरेशन,

  • १,७६,००० प्राथमिक सह दूध संस्था

  • भारतामध्ये ११.५ कोटी लोक दुग्धव्यवसायात असून, त्यापैकी महिलांची संख्या लक्षणीय

  • भारतात जवळपास ७० टक्के दूध उत्पादकाकडे १ ते ३ इतकी अल्प जनावरे आहेत

  • पशुगणना २०१२ नुसार भारतामध्ये ५१२० लाख इतके पशुधन

  • भारतात लाईव्हस्टॉक संबंधित उद्योगातून जवळपास २१.२५ कोटी लोकांना रोजगार मिळतो.

  • भारत, पाकिस्तान, इजिप्त व चीन इत्यादी मोजक्या देशात म्हैस दुधाचा वापर होतो

  • सहकारी तत्त्वातून ३० टक्के दुधाची विक्री, उर्वरित ७० टक्के दूध खासगी व्यापाऱ्यांच्या हातात

  • २०२३ मध्ये भारतातील दुग्धव्यवसायाची उलाढाल रुपये १६,७९२ बिलियन

जिल्हा दूध संघाचे योगदान

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने मागील ६१ वर्षांपासून दुग्धव्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. दूध उत्पादकाच्या गोठ्यापासून ‘स्वच्छ दूध उत्पादन’ योजना राबवून गुणवत्तेची काळजी घेतली आहे. गावपातळीवर ‘बल्क मिल्क कुलर’ प्रणाली कार्यान्वित करणेत येऊ लागली आहे. जनावरांचा आहार, आरोग्य यासाठी संघाने विविध योजना राबवल्या आहेत. संघास आयएसओ २२०००:२०१८ हे फूड सेफ्टी मॅनेजमेंटसाठीचे उच्च मानांकन प्राप्त झाले आहे. संघाच्या उत्पादनांना भारत सरकारचा ‘निर्यातक्षम’ दर्जा प्राप्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT