World Milk Day how to make milk powder at home Esakal
आरोग्य

World Milk Day : घरच्या घरी बनवा मिल्क पावडर; महिनाभर नाही होणार खराब

how to make milk powder at home: बाजारात मिळणारी दूध पावडर ही बऱ्याच वेळा महाग असते. तसंच त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह टाकलेले असल्याची भीतीही असते.

Sudesh

Milk Powder: दूध हा आपल्या दररोजच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. सकाळच्या चहापासून रात्री झोपेपर्यंत आपण दुधाचा वापर करतो. आपण आणलेलं दूध कितीही वेळा गरम करून ठेवलं, तरी ते दोन-तीन दिवसांमध्ये खराब होऊनच जातं. मात्र, हेच दूध जर पावडरच्या स्वरुपात ठेवलं, तर ते महिनाभर टिकू शकतं.

बाजारात मिळणारी दूध पावडर ही बऱ्याच वेळा महाग असते. तसंच त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह टाकलेले असल्याची भीतीही असते. यामुळेच आम्ही तुम्हाला घरच्या घरी मिल्क पावडर बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला दुधामध्ये कोणतीही वस्तू मिसळण्याची गरज नाही.

अशी बनवा पावडर (how to make milk powder at home)

यासाठी सर्वात आधी तुम्हाला दूध उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दूध थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. दूध थंड होईपर्यंत मायक्रोवेव्ह ओव्हनला 150 डिग्री फॅरेनहाईट एवढ्या तापमानाला प्रीहीट करून घ्यायचा आहे.

यानंतर कोमट झालेलं दूध ओव्हनमध्ये ठेवा. हे दूध मध्ये-मध्ये हलवत रहा. काही वेळानंतर हे दूध कोरडं होऊन अगदी घट्ट होईल. त्यानंतर या दुधाचे तुकडे मिक्सर-ग्राईंडरमध्ये टाकून त्याची पावडर बनवून घ्या.

तुम्हाला जेवढी मिल्क पावडर (Make Milk Powder at Home) बनवायची आहे, त्यापेक्षा अधिक दुधाची गरज भासणार आहे. म्हणजेच जर तुम्हाला अर्धा किलो दूध पावडर हवी असेल, तर सुमारे एक ते दीड किलो दूध त्यासाठी लागणार आहे.

डीहायड्रेशन पद्धत

घरच्या घरी दूध पावडर बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे डीहायड्रेशन मेथड. यासाठी तुम्हाला डीहायड्रेशन ट्रेची गरज भासणार आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व डीहायड्रेशन ट्रेमध्ये एक-एक कप दूध घ्या. दरम्यान, ओव्हनला 135 ते 140 डिग्री फॅरेनहाईट एवढ्या तापमानावर सेट करा आणि डीहायड्रेशन ट्रे आत ठेवा.

जेव्हा ट्रेमधील दूध पूर्णपणे कडक होईल, तेव्हा ते बाहेर काढा. हे दूध थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर करून घ्या. तुम्हाला कोणत्याही भांड्याच्या दुकानात किंवा ऑनलाईन डीहायड्रेशन ट्रे मिळू शकेल.

अशी घ्या काळजी

दूध पावडर तयार झाल्यानंतर ती हवाबंद डब्यामध्ये ठेवा. अन्यथा ही पावडर लवकर खराब होऊ शकते. सुरक्षितपणे ठेवलेली मिल्क पावडर तुम्ही महिनाभर वापरू शकता. मिल्क पावडरचा वापर तुम्ही गुलाब जाम, केक, चहा अशा गोष्टींमध्ये करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT