World No-Tobacco Day: तंबाखूवर बंदी घालण्यासाठी दरवर्षी 31 मे रोजी 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' साजरा केला जातो. धूम्रपान करणे किंवा तंबाखूचे सेवन करणे अत्यंत हानिकारक आहे. तंबाखूमुळे अनेक जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. तंबाखूमध्ये असलेले निकोटीन हलके उत्तेजक असल्याने, लोक ते मोठ्या प्रमाणात सेवन करतात. पण त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
सामान्य लोकांसोबतच अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीही धुम्रपान करतात. यापैकी एक नाव आहे मॉडेल आणि अभिनेता पूरब कोहलीचे. जागतिक तंबाखू दिनापूर्वी पूरबने सांगितले की, त्याने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी धूम्रपान करण्यास सुरुवात केली होती. नंतर त्याला हे सोडण्यासाठी वर्ष लागले आहे.
पूरब वर्षानुवर्षे तंबाखूचे सेवन करत होता. जरी त्याने ते सोडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण धूम्रपानाने त्याला सोडले नाही. पुरबने हिंदुस्तान टाईम्सला त्याचा अनुभव आणि तंबाखूच्या वाईट सवयीबद्दल सविस्तर सांगितले आहे.
पूरब कोहली म्हणाला, 'मी साधारण 15-16 वर्षांचा होतो. आपल्याला माहिती आहे की धूम्रपान करणे वाईट आहे आणि आपण अशा गोष्टी ऐकल्या असतात ज्यामुळे आपण जे काही करतो आहे ते चुकीचे आहे. त्याकाळी धूम्रपान करणे ही पुरुषार्थी गोष्ट मानली जात होती पण मी ते फक्त बरे वाटावे म्हणून सुरू केले.
तारीख लिहून ठेवली होती
कोहली पुढे सांगितले 'मला धुम्रपान सुरू करून 10 वर्षे झाली होती, मी विचार केला की असे करणे सोडले पाहिजे. मी बघू शकलो की जेव्हा माझ्यावर कामाचा ताण होता तेव्हा मी अधिक धूम्रपान करू लागलो. मी अशा पॉइंटवर पोहोचलो जिथे मला प्रयत्न करायचे होते आणि मी ते खरोखर करू शकतो का ते पाहायचे होते.
तो म्हणाला- 'मी स्वतःला म्हणालो, मी 10-12 वर्षे धूम्रपान केले, मी एक वर्ष धूम्रपान करू शकत नाही का? मी तारीखही लिहून ठेवली होती. मी स्वतःला त्याद्वारे प्रेरित केले आणि मी जो निर्णय घेतो त्यावर ठाम राहतो.
हातात सिगारेट ठेवायची, पण पेटवली नाही
पूरब पुढे म्हणला, 'एकदा सकाळी उठलो आणि म्हणालो थांबायचं. मी धूम्रपान सोडले, परंतु ते खूप कठीण होते. मी एक सिगारेट विकत घेतली आणि मी ती माझ्या हातात ठेवायचो आणि ती कधीही पेटवली नाही. मी ते हातात धरून न पेटवता त्यावर पफ करायचो आणि हळूहळू तिच्यावर प्रेम करण्याची भावना निघून गेली. ज्या दुकानांतून मी ते विकत घेत असे, त्यांच्या जवळ गेल्यावर मला धूम्रपान करावे वाटत होते. धूम्रपान व्यसन किती वाईट आहे हे मला कळायला लागले.
पुढे अभिनेता म्हणाला, 'मी खूप प्रबळ इच्छाशक्तीचा आहे. मी निर्णय घेतला तर मी त्यावर ठाम राहतो. तो पुढे म्हणाला, 'एका प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी त्याला पुन्हा सिगारेट घ्यावी लागली. पूरबच्या म्हणण्यानुसार, 'त्यानंतर मी 3-4 वर्षे धुम्रपान केले नाही, परंतु एक भूमिका होती ज्यासाठी मला सिगारेट ओढावी लागली आणि त्यानंतर मी 30 च्या सुरुवातीच्या काळात थोड्या काळासाठी पुन्हा धूम्रपान करू लागलो. मला आधीच माहित आहे की मी एकदा थांबलो होतो आणि वर्कआउट करताना काय फरक पडला.
दुसऱ्यांदा धूम्रपान कायमची सोडली
कोहली पुढे म्हणतो, 'दुसऱ्यांदा मी सिगारेट कायमची सोडली. एकदा तुम्ही सुरुवातीचे ६-७ महिने पार केले की ते चांगले होते. तुम्हाला झोप येते, आणि जेव्हा तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचे वजनही वाढू लागते. मला आठवतं की मी गाजर आणि काकडी खायचो. यामुळे मला चांगल्या सवयी लागण्यास मदत झाली. माझी त्वचा आता चांगली दिसते आहे आणि माझे मन अधिक शांत आहे. मला खूप आनंद वाटतो की मला आता ते व्यसन नाही. मी शेवटचे धूम्रपान करून 13-14 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.