World No-Tobacco Day Nine lakh people die every year due to tobacco maharashtra health sakal
आरोग्य

World No-Tobacco Day : तंबाखूमुळे दरवर्षी नऊ लाख जणांचा मृत्यू

जागतिक तंबाखू विरोधी दिन ; देशातील चित्र ; महाराष्ट्रातही प्रमाण जास्त

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तंबाखूमुळे भारतात दर आठ सेकंदाला एकाचा मृत्यू होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात समोर आले आहे. भारतात तंबाखू संबंधित मृत्यूची संख्या दरवर्षी आठ ते नऊ लाखांपर्यंत आहे.

महाराष्ट्रातील गडचिरोली, मुंबई, नागपूर, पुणे, यवतमाळ, सोलापूर, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये मौखिक कर्करोगाचे रुग्ण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

तंबाखू सेवनाने तोंडाचा, ओठाचा, जबड्याच्या, फुफ्फुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कर्करोग होतो. भारतात तोंडाचा कर्करोग होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फुफ्फुसाच्या ९० टक्के कर्करोगामागे तंबाखूच कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनातून समोर आले आहे.

जागतिक तुलनेत भारतात मौखिक कर्करोगाचे प्रमाण अधिक दिसते. जो आरोग्यावर मोठा भार आहे. भारतातील तंबाखूचे वयानुसार प्रमाण प्रति एक लाख लोकांमागे ७.५ टक्के असून पश्चिम युरोप व युएसएमध्ये ते ४.६ ते ३.८ पर्यंतच आहे. क्षयरोग होण्‍याचे अप्रत्यक्ष कारण तंबाखू असून मधुमेह होण्‍याची शक्यताही तंबाखूमुळे जास्त बळावते.

रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. हृदयरोग व पक्षाघाताचा धोका वाढतो. तंबाखू व धूम्रपानामुळे पुरुषांना नपुंसकतेची शक्यता वाढते. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ती लवकर होते.

गर्भपाताची शक्‍यता किंवा मूल कमी वजनाचे होते. बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात व त्याचा अचानक मृत्यू देखील होऊ शकतो. तंबाखू सेवनाने अचानक रक्तदाब वाढतो आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे पायात गॅंगरि होऊ शकते.

अशी सोडता येईल तंबाखू किंवा धूम्रपान

तोंडात च्‍युइंगम, चॉकलेट, पे‍परमिंट, लॉजेंजेस ठेवण्याचा प्रयत्न करा व दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. जेव्हा तल्लफ होईल, तेव्हा उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला पाणी प्या आणि व्यायामाने देखील तल्लफ घालवता येते. स्‍वतःसाठी सकारात्मक बोला. स्वतःला पुरस्कृत करा. दररोज आरामाच्या तंत्रांचा (योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत) वापर करा. या व्यतिरिक्त, सक्रिय बना आणि पोषक आहार घ्या व नियमित व्यायाम करावा.

देशात मौखिक कर्करुग्णांची संख्या चिंताजनक आहे. तरुण-तरुणींमध्ये तंबाखू सेवन व धूम्रपान जास्त असून अनेकांना हृदयरोग, मधुमेह, कर्करोगाचा धोका वाढला आहे. तंबाखू सेवन व धूम्रपानामुळे संबंधितांचे आयुष्य २० वर्षांनी कमी होऊ लागल्याचा निष्कर्ष आहे.

- डॉ. रोहन वायचळ, जिल्हा मुख आरोग्याधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT