World Olympic Day 2024 Sakal
आरोग्य

World Olympic Day 2024: ऑलिंपिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या गेम्सचे आहेत 'हे' आरोग्यदायी फायदे

पुजा बोनकिले

World Olympic Day 2024: निरोगी राहण्यासाठी जसे योगा आणि पोषक आहार घेणे गरजेचे असते त्याचप्रमाणे मैदानी खेळ खेळणे देखील गरजेचे असते. दरवर्षी २३ जून हा दिवस जागतिक ऑलिंपिक दिन म्हणून साजरा केला जातो.

हा दिवस ऑलिंपिक खेळांबद्दल माहिती आणि महत्व सांगण्यासाठी साजरा केला जातो. खेळ आणि शारीरिकित्या सक्रिय राहणे गरजेचे आहे. पण मोबाईल आणि गेमिंग कन्सोल यामुळं मुलांचे मैदानी खेळ खेळणे जवळपास बंद झालं आहे. यासाठी कोणते खेळ खेळावे आणि त्याचे फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊया.

Badminton

नियमितणे बॅडमिंटन खेळल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

पोटावर जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत मिळते

हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

बॅडमिंटन खेळल्याने तणाव कमी होतो.

शरीरातील टॉक्सिन बाहेर काढायचे असेल तर नियमितपणे बॅडमिंटन खेळावे.

नियमितपणे बॅडमिंटन खेळल्याने हाडांचे आरोग्य निरोगी राहते.

Badminton

Swimming

स्वीमिंग करणे आरोग्यासाठी फयदेशीर ठरते.

नियमितपणे स्वामिंग केल्याने हाडं मजबूत होतात.

तुमचा मुड फ्रेश राहतो.

स्वीमिंग केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

रोज स्वीमिंग केल्याने शरीर लवचिक राहते.

Swimming

क्रीडा पत्रकार आणि राष्ट्रीय स्तरावरील माजी क्रिकेटपटू अनिरूद्ध यांनी सांगतले की "मॉडर्न लाईफस्टाईलच्या या युगात मुलं जन्माला आली की पालक त्यांच्या दिमतीला सर्वकाही हजर करतात. त्यांना मोबाईलची ओळख ते या जगात आल्या आल्या आपणच करून देतो. मोबाईल अन् गेमिंग कन्सोल यामुळं मुलांचे मैदानी खेळ खेळणे जवळपास बंद झालं आहे."

त्यात आता स्कूल बस अन् वाढत्या ट्रॅफिकमुळं मुलांचं सायकलिंग देखील नगण्यच असतं. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिकतेवर देखील होत आहे. अशा स्थितीत मुलांना पुन्हा मैदानी खेळाकडे वळवणे हे अत्यंत गरजेचं झालं आहे. मैदानी खेळांमुळं मुलांच्या शारिरीक वाढ उत्तम प्रकारे होतेच. त्याचबरोबर त्यांचे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. या स्पर्धात्मक जगात वावरताना खेळातून मिळणारी जिद्द, स्पर्धात्मकता त्यांना पुढच्या आयुष्यातही उपयोगी पडते.

खेळातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. तसेच मुलं सांघिक खेळ खेळताना त्यांचे टीम स्पिरीट देखील वाढते. सांघिक खेळाचा फायदा त्यांना समाजात वावरताना अप्रत्यक्षरित्या होतोच. यामुळे मैदानी खेळाचे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे असून मुलांच्या सर्वांगिण विकासात याचा मोठा फायदा होतो. खेळामुळं मुलांना हार पचवायची कशी याचा देखील धडा मिळत असतो. त्यामुळं पुढच्या आयुष्यात मुलांना कठिण प्रसंगांना देखील समर्थपणे तोंड देण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण होते."

Cycling

सायकल चालवणे अद्भूत व्यायाम आहे.

सायकल चालवल्याने शरीराचे स्नायू मजबूत होतात.

हाडांचे आरोग्य निरोगी राहते.

तुम्ही नियमितपणे सायकल चालवल्यास वजन नियंत्रणात राहते.

Cycling

Running

पळणे देखील आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे.

तुम्हील रोज पळत असाल तर वजन नियंत्रणात ठेऊ शकता.

शरीराचे रक्ताबिसरण सुरळित होते

झोपेची समस्या असेल तर ती दूर होते.

मुड खराब असेल तर घराबाहेर पडा आणि पळायला जा. यामुळे तुमचा मुड फ्रेश होतो.

Running

Hockey

हा खेळ खुप वेगाने खेळला जातो. यामुळे संपुर्ण शरीराची हालचाल होते. तसेच मोठ्या संख्येने कॅलरी बर्न होत असल्याने वजन नियंत्रणात राहते.

हॉकी खेळल्याने हृदय निरोगी राहते आणि रक्ताभिसरण सुरळित राहते.

हॉकी खेळल्याने पायाचे स्नायू विकसित होतात.

हाडांचे आरोग्य निरोगी राहते.

हॉकी खेळताना हात आणि डोळे यांच्यातील समन्वयाचा समावेश होतो. हे खेळादरम्यान खेळाडूंचे उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रतिक्रिया देखील सुधारते. या खेळाचा सराव केल्याने समन्वय क्षमता विकसित होण्यास मदत होते.

 हा खेळ 11 लोकांच्या संघासोबत खेळल्याने प्रत्येकजण ध्येय साध्य करण्यासाठी आणि विजयासाठी यशस्वीरित्या कार्य करत असताना टीमवर्कची भावना विकसित होते.

Hockey

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT