World Social Media Day 2024: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. फोनमधील निळ्या लाइटमुळे मेलाटोनिनची पातळी कमी होऊ लागते आणि झोप पुर्ण होत नाही. वारंवार फोन पाहण्याच्या सवयमुळे झोपेवर परिणाम होतो. यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि मानसिक ताण वाढू शकतो. यामुळे सोशल मिडियाचा शरीरावर कोणता परिणाम होतो आणि निरोगी राहण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.
सोशल मिडियावर वारंवार स्टेटस, अकाऊंट आणि रिल पाहिल्यास लोकांमध्ये परस्पर ईर्षा, मत्सर आणि कमीपणा वाढतो. यामुळे एखाद्या व्यक्तीशी तुलना करू लागतो. यामुळे स्वभावामध्ये बदल होतो.
सोशल मिडियाचा वापर वाढल्याने तणाव वाढू शकतो. अनेक लोकांमध्ये तणाव वाढल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
अनेक वेळा लोक सोशल मिडियावर एक रिल्स पाहिल्यानंतर सारखे स्कोल करत राहतात. यामुळे वेळ जास्त वाया जातो. हा एक प्रकारचा अॅडिक्शन आहे. ज्यामध्ये नोटीफिकेशन पाहण्यासाठी फोन हातात ठेवतात.
सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेक नात्यात दुरावा आला आहे. सोशल मिडियावर सतत सक्रिय राहिल्याने गैरसमज वाढले तसेच एकमेंकाना वेळ देत नसल्याने घटस्फोटचे देखील प्रमाण वाढले आहे.
सोशल मिडियावर सतत सक्रिय राहिल्याने आत्मविश्वास कमी होऊ शकतो. सोशल मिडियावर प्रत्येक गोष्ट परफेक्ट होत असताना पाहून आपण स्वत:ला कमजोर समजतो. यामुळे नैराश्य वाढू शकते.
सोशल मिडियापासून दूर राहण्यासाठी कुटूंबातील सदस्यांसोबत वेळ घालवावा. वीकेंडला फॅमिली ट्रिप प्लॅन करावी. यामुळे स्क्रिन टाईम आपोआप कमी होईल.
सोशल मिडियापासून दूर राहण्यासाठी आरोग्याकडे लक्ष द्यावे. नियमितपणे योगा करावा आणि पोषक आहार घ्यावा. आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा.
सोशल मिडिया हे आपल्यासाठी आहे आपण सोशल मिडियासाठी नाही. यामुळे आपण आपल्या आयुष्यात समाधानी असले पाहिजे. इतर कोणाशीही तुलना करू नका.
सोशल मिडिया वापरण्यासाठी एक वेळ निश्चित करावी. यामुळे स्क्रिन टाइम कमी होईल. तसेच डोळे, मानसिक आणि शारिरिक आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.