Yoga Tips esakal
आरोग्य

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Yoga Tips : दररोज योगाचा सराव केल्याने शरीर आणि मन संतुलित राहण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : दररोज योगाचा सराव केल्याने शरीर आणि मन संतुलित राहण्यास मदत होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते विविध प्रकारच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांच्या उपचारांसाठी योगा फायदेशीर आहे. योगामुळे शरीर लवचिक बनते, स्नायूंना बळकटी मिळते. तसेच, अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. यासाठी तुम्ही नियमित योगा करणे महत्वाचे आहे.  

उन्हाळ्यात वातावरणात अनेक बदल होतात. वातावरणातील वाढत्या उकाड्यामुळे पोटाशी संबंधित असलेल्या अनेक समस्या उद्भवू शकतात. चुकीच्या पचन प्रक्रियेमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये, तुमचे जेवण आणि झोप यामध्ये किमान २-३ तासांचे अंतर असायला हवे. या दरम्यान तुम्ही चालायला जाऊ शकता किंवा योगा करू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा सराव तुम्ही जेवण झाल्यावर करणे गरजेचे आहे. जेवण झाल्यानंतर या योगासनांचा सराव केल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि पोटाशी संबंधित असलेल्या समस्या उद्भवत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात त्या योगासनांबद्दल.

वज्रासन

रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही वज्रासनाचा सराव करू शकता. पचनासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. विशेष म्हणजे पचनासाठी सर्वात फायदेशीर असणाऱ्या योगासनांमध्ये या योगासनाचा समावेश होतो.

या योगासनाचा सराव केल्याने शरीराचा वरचा भाग आणि पोट ताणण्यास मदत होते. रिकाम्या पोटी वज्रासन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, जेवणानंतर हे योगासन करणे अधिक फायदेशीर आहे.

धनुरासन

धनुरासन हे योगासन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. पाचन अवयवांचे कार्य सुरळीत करण्यासाठी हे योगासन अतिशय उपयुक्त आहे. या आसनाचा नियमितपणे सराव केल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते.

या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा. त्यानंतर, तुमचे शरीर वाकवताना दोन्ही पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर, तुमच्या हातांनी पायांचे घोटे पकडा. त्यानंतर, तुमच्या पायांचे घोटे पकडताना खांदे ताणून घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT