Yoga  sakal
आरोग्य

Yoga for Healthy Hair : केस खूप गळतात, हैराण आहात? मग रोज करा ही योगासनं... लवकरच दिसेल फरक

सकाळ डिजिटल टीम

तंदुरुस्त राहण्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे. याचा सराव करून तुम्ही आजारांपासून दीर्घकाळ दूर राहू शकता. रोज योगा केल्याने आरोग्यासोबतच त्वचा आणि केसही निरोगी ठेवता येतात. त्यामुळे जर तुमचे केस खूप पातळ असतील, जास्त तुटत असतील आणि वाढ चांगली होत नसेल, तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत येथे दिलेल्या योगाचा समावेश करावा. काही दिवसातच तुम्हाला त्याचे फायदे दिसू लागतील.

कपालभाती

सर्वप्रथम नाकाने दिर्घ श्वास घेणे आणि त्यानंतर पोट आत घेऊन नाकाने जोरात श्वास सोडणे म्हणजे कपालभाती प्राणायाम. हा प्राणायाम प्रकार अतिशय लोकप्रिय असून याचे अनेक फायदे आहेत. दररोज ६ ते १२ मिनिटे कपालभातीचा सराव करावा. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामुळे श्वसन संस्था अधिक बळकट होत जाते.

अधोमुखासन

सूर्य नमस्कारादरम्यान आपण ज्या १२ पोझचा अभ्यास करतो त्यापैकी एक आहे. ज्यामुळे रक्त प्रवाह वाढतो. यामुळे, स्कॅल्पपर्यंत पोहोचणार्‍या ऑक्सिजनमध्ये वाढ होते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. या आसनाचे इतर अनेक फायदेही आहेत. उदाहरणार्थ, हे मनाला शांत करण्यास, शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते.

सर्वांगासन

सर्वंगासन हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे, जो वेगवेगळ्या स्नायूंच्या गटांवर कार्य करतो. हे आसन तुमच्या डोक्यात रक्त परिसंचरण वाढवते. रोज या योगाचा सराव केल्याने केस गळणं थांबतं.

बालासन

पोटाशी संबंधित कोणत्याही समस्यांपासून दूर राहण्यासाठी बालासना केले जाते. रोज या योगा प्रकाराचा सराव केल्याने आपली पचनसंस्था आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे केस गळती कमी होते.

शिर्षासन

शिर्षासनाला हेडस्टँड म्हणून ओळखले जाते. यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते ज्यामुळे केस गळणे आणि टक्कल पडणे कमी होते. हे आसन केसांची वाढ सुधारण्यास मदत करते.

MVA Press Conference: सरकारच्या प्रत्येक कृतीवर संशय, धोक्यात असलेल्या महाराष्ट्र वाचवायचा आहे, पत्रकार परिषदेतून मविआची टीका

Women's T20 World Cup: भारताला सेमीफायनलला पोहोचण्यासाठी पार करावा लागणार ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या कसं आहे समीकरण

Salman Khan : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ ; घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Nanded Assembly Elections 2024: नांदेड दक्षिणमध्ये वाढणार चुरस; महाविकास, महायुतीमधील दावेदारांची संख्या वाढली

Parbhani Assembly Elections 2024: परभणी विधानसभेची जागा भाजपला; उमेदवारी देण्याचा निर्णय गुलदस्त्यात..

SCROLL FOR NEXT