आसन  sakal
आरोग्य

योग-जीवन आसन :स्नायूवृत्ती निरोध

आसन’ जे पतंजलींना अपेक्षित आहे, त्याचा आज आपण थोडक्यात विचार करणार आहोत

सकाळ वृत्तसेवा

‘आसन’ जे पतंजलींना अपेक्षित आहे, त्याचा आज आपण थोडक्यात विचार करणार आहोत. बऱ्याच जणांना असे वाटते, की आपले अंग वाकत नाही म्हणजे आपल्याला योगासने शिकता येणार नाहीत. तर काहींना असे वाटते, की आपले अंग खूप वाकते म्हणजे आपल्याला योगासने लगेच जमतील. या दोन्ही बाजू म्हणजे योगासनांबाबत गैरसमज आहेत. बाळंतपणानंतर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अंग जास्त वाकायला लागते असेही निदर्शनास आलेले आहे.

आसन म्हणजे स्नायूवृत्ती निरोध होय. आसनात शरीराचे सर्व घटक, संस्था, स्नायू, मज्जा, सर्व पेशी यांचा निरोध साधला जातो. त्यांचे नियमन केले जाते. त्यांना स्थिर केले जाते.आसन हे आपले अंतःकरण समजावून घेण्यासाठी, संतुलन साधण्यासाठी, ताकद, सहनशक्ती वाढविण्यासाठी, हा देह ‘देवाचे मंदिर’ त्याला स्वच्छ, नीटनेटके करणारी आणि आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली शारीरिक-मानसिक क्रिया असते.

समं कायशिरोग्रीवन धारयन्नचलं स्थिरः ll भ.गीता अ.६ श्लो.१३ ll

अर्थात- ‘ध्यानाचे वेळी शरीर, डोके, मान एका सरळ रेषेत ठेवून मनानेही स्थिर व्हावे.’ याचा आपल्याला प्रत्येक आसनात विचार करावा लागतो. त्यासाठी संपूर्ण शरीरावर काम करावे लागते. वाघाचं पिल्लू वाघासारखं दिसतं ना? त्याच्यात वाघाचे गुण बीज रुपाने असतात, तसेच योगासन हे ध्यान-समाधीचे पिल्लू आहे असे समजा. त्यात समाधी बीजरूपाने असते. पतंजली म्हणतात, आसनात शरीराची स्थिरता व मनाची सुखता असावी. जिवा-शिवाची भेट ही ध्येयात्मक स्थिरताही असावी. प्रयत्नपूर्वक कमावलेल्या आसनात जेव्हा प्रयत्नाच्या शिथिलतेचा अनुभव येतो, त्या अवस्थेचा उपयोग आपल्या शुद्ध अशा पूर्वस्थितीत येण्यासाठी करावा. ही स्थिती म्हणजे अनंत- समापत्ती होय. अशा स्थितीत कोणत्याही विरोधी परिस्थितीचा परिणाम होत नाही. म्हणजे साधकाचे चित्त विचलित वा पतीत होत नाही.

आत्मा आणि परमात्मा दोन्ही अनंत आहेत. पण आत्मा हा जीवात्मा बनून कर्मभोगामुळे जन्ममरणाच्या विळख्यात सापडतो. जगाशी, प्रकृतीशी त्याचा योग घडल्याने, परमात्म्यापासून त्याचा वियोग झालेला असतो. त्याचा परमात्म्याची योग घडून आणणे म्हणजे त्या अनंतात विलीन होणे. म्हणजेच अनंतसमापत्ती होय. ते आसनाचे स्वरूप आहे.

आसन या अंगाचा आवाका मोठा आहे. प्रथम व्यायामप्रकार म्हणून किंवा रोगनिवारणासाठी किंवा आरोग्यप्राप्तीसाठी त्याचा स्वीकार आपण करू शकतो.

आसनक्रिया हे कर्म म्हणून लक्षात घेत, कर्माच्या माध्यमातून ज्ञान संपादन करीत, त्यातील भक्तीची उकल करून घेत, योगमार्गाला लागायचे हे उद्दिष्ट असते. या अर्थाने आसन हे योगाचे महाद्वार (प्रवेशद्वार) आहे.

आजचे आसन आणि प्राणायाम.

आधारासहित शवासन- प्रकार १

दंडासनात बसा. पाठीसाठी उभा लोड घ्या. संपूर्ण पाठीला व डोक्याला आधार मिळेल असे पाठीवर जा. डोक्याखाली पातळ मऊ उशी घ्या. मांड्यांवर लोड आडवा ठेवा. त्यामुळे पाय शांत, स्थिर होतात. पाय शांत झाले की वात शांत होऊन मेंदूतही शांतता येते. डोळे बंद करा.

पाठीसाठी उभा लोड घेतल्यामुळे छातीचा विस्तार वाढून श्वासपटल मोकळे राहते. भावनावेग आवरता येतो. दमेकरी, हृदयरोगी, अशक्त माणसे यांना, छातीत धडधडत असेल, श्वास लागत असेल, छातीत जड वाटत असेल किंवा जळजळ होत असेल, तर ही पद्धत उपयुक्त ठरते. डोक्याखालील उशीमुळे घसा मोकळा राहण्यास, मेंदू शांत होण्यास मदत होते.

उज्जायी प्राणायाम टप्पा १

शवासनात शरीर सरळ रेषेत ठेवावे. छाती लांब-रुंद ठेवावी. एक-दोन मिनिटे डोळे अलगद बंद करून स्वस्थ पडून राहावे. चेहऱ्याचे स्नायू दिले सोडावेत.

श्वसनाच्या प्रवाहावर जागरूकपणे लक्ष ठेवून त्याची सातत्याने जाणीव ठेवावी.

श्वास आत घेताना दोन्ही फुप्फुसे समप्रमाणात भरत आहेत, छाती वरच्या दिशेने आणि बाहेरच्या बाजूला प्रसरण पावत असल्याची जाणीव ठेवावी.

श्वास शांतपणे बाहेर सोडावा आणि दोन्ही फुप्फुसे सारख्या प्रमाणात रिकामी करावीत.

याप्रमाणे डोळे बंद करूनच दहा मिनिटे सराव चालू ठेवावा.

परिणाम

मज्जातंतू ताजेतवाने होतात.

सखोल श्वसनासाठी पूर्वतयारी होते.

चित्त सजग, सतर्क, दक्ष होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

IND vs NZ 2nd Test : ७ बाद १०३ धावा! Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला, पण विराटसह इतरांनी पार केला कचरा

भारत स्वातंत्र्यानंतर मुंबई इलाख्यात कोल्हापूर अन् पहिल्या आमदारांपैकी बाबासाहेब खंजिरेंनाच मिळाली पुन्हा संधी!

IND vs NZ: काल अ‍ॅक्टींग करत मैदान गाजवले, आज ९व्या चेंडूवर त्रिफळे उडाले! Virat Kohli चे दोन भिन्न Video

SCROLL FOR NEXT