Eye Care Tips sakal
आरोग्य

Yoga for eyes : सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे सुजलेले दिसतात? मग दररोज करा ही योगासनं

सकाळ डिजिटल टीम

झोपेच्या कमतरतेचा आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळाल्यास डोळ्यांखाली सूज येते. चेहरा निर्जीव दिसतो. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर तज्ज्ञांनी सुचवलेल्या या दोन योगासनांच्या मदतीने तुम्ही डोळ्यांखालील सूज कमी करू शकता. चला तर जाणून घेऊया.

पश्चिमोत्तासन

जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर पुढे वाकते. यामुळे चेहरा आणि डोळ्यांभोवती रक्ताभिसरण वाढते आणि जेव्हा रक्ताभिसरण वाढते तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. यामुळे सूज हळूहळू कमी होऊ लागते. हे आसन केल्याने मेंदूतील रक्त परिसंचरण सुधारते आणि चांगली झोप लागते.

पश्चिमोत्तासन कसे करावे

या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर दोन्ही पाय पसरून जमिनीवर बसा.

त्यानंतर, एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे शरीर हळूहळू पुढे वाकवा.

आता तुमच्या पायाच्या बोटांना दोन्ही हातांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही गुडघे ताठ असायला हवेत.

आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

त्यानंतर, तुम्ही सामान्य स्थितीमध्ये या.

बालासन

जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा तुमच्या चेहऱ्याभोवती आणि डोळ्यांभोवती रक्ताभिसरणही वाढते. हे आसन केल्याने चांगली झोप लागते जी सूज कमी करण्यास मदत करते.

बालासन कसे करावे

या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर बसा.

यानंतर श्वास घेताना दोन्ही हात वर घ्या आणि श्वास सोडताना पुढे वाका.

यानंतर जमिनीवर डोकं टेकवताना या आसनात आल्यानंतर शरीराला हलकं सोडा आणि रिलॅक्स व्हा.

श्वास घ्या आणि श्वास सोडा. श्वास घेताना आणि श्वास सोडताना कोणतीही घाई करू नका.

या पोझमध्ये तुम्ही १ ते ३ मिनिटं राहू शकता.

हे दिवसातून कमीत कमी ५ वेळा करा.

नंतर हात वर करून हळहळू पूर्व स्थितीत या.

General Coaches in Trains : मध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! मेल-एक्स्प्रेसना जोडले जाणार दोन जनरल डबे

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो १७ आणि १८ ऑक्टोबरला पाणी जपून वापरा; पालिकेकडून १०% पाणी कपात

Bomb Threats to Flights : विमानांच्या उड्डाणात धमक्यांचा अडथळा! गेल्या तीन दिवसांत बारा विमानांची उड्डाणे रद्द

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

SCROLL FOR NEXT