Yoga Tips esakal
आरोग्य

Yoga Tips : वारंवार मान आणि पाठदुखीचा त्रास होतोय? मग, 'या' योगासनांची घ्या मदत, मिळेल लवकर आराम..!

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : ऑफिसमध्ये सतत लॅपटॉपवर काम करणे, व्यायामाचा अभाव असणे आणि बिघडलेली जीवनशैली यांचा आरोग्यावर परिणाम होतो. मग, विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. लॅपटॉपवर सतत काम केल्याने मान, पाठ आणि कंबरदुखीचा त्रास संभवतो.

परंतु, जर तुम्ही वेळेत मान आणि कंबरदुखीच्या समस्येवर आराम मिळवला नाही, तर अनेक शारिरीक समस्यांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे, यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. अनेकदा चुकीच्या हालचालींमुळे खांदे, मान, पाठ आणि कंबरेवरील दाब कमी करण्यासाठी योगासनांची मदत घेतली जाते.

योगामुळे शारिरीक अन् मानसिक आरोग्य स्थिर राहण्यास मदत होते. शिवाय, पाठदुखी अन् मानदुखीपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

सेतूबंधासन

ऑफिसमध्ये डेस्क जॉब करणाऱ्यांसाठी आणि लॅपटॉपवर सतत काम करणाऱ्यांसाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. सेतूबंधासन करण्यासाठी पाठीवर झोपावे आणि दोन्ही पायांचे गुडघे वाकवून जमिनीवर पायाला स्पर्श करावा.

आता तुमच्या दोन्ही हातांच्या मदतीने शरीर वरच्या दिशेने न्या वर करा. आता या स्थितीमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. काही काळ या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

शोल्डर ओपनर

शोल्डर ओपनर हे योगासन करण्यासाठी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे राहा आणि तुमच्या स्नायूंना आराम द्या. आता तुमच्या दोन्ही हातांचे तळवे मागच्या बाजूने नेऊन ते एकमेकांमध्ये गुंतवा.

आता या स्थितीमध्ये तुमचे खांदे शक्य तितके मागे खेचा. त्यानंतर, जुन्या स्थितीमध्ये परत या आणि हे योगासन पुन्हा करा. हे योगासन केल्याने तुम्हाला पाठदुखी-मानदुखी आणि खांदेदुखीपासून आराम मिळवण्यास मदत होईल. जर तुम्ही हे योगासन पहिल्यांदाच करत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा किंवा योगा तज्ज्ञाचा जरूर सल्ला घ्या.

भूजंगासन

भूजंगासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाचा सराव करण्यासाठी योगा मॅटवर पोटावर सरळ रेषेत झोपा. आता तुमचे दोन्ही पाय मागे न्या आणि तुमचे दोन्ही हात खांद्याच्या समांतर ठेवा. आता तुमच्या मानेला अन् पाठीला ताण देऊन छाती वरच्या बाजूला खेचा. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: मुंबई पोलिसांची जिगरबाज कामगिरी; समुद्रात बुडणाऱ्या दोघांना वाचवलं अन्...

Latest Marathi News Updates : संपूर्ण अंबरनाथ शहरात केमिकल गॅसचा पसरला धूर

Audi Car Accident : मुलाच्या 'कार'नाम्याचा बावनकुळेंना फटका; सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे 'संकेत'

Vande Bharat Railway : 'वंदे भारत'ची चाचणी यशस्वी; हुबळी-मिरज मार्गावर धावली रेल्वे, PM मोदींच्या हस्ते कधी उद्घाटन?

High Court: उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नावानेही फसवणूक; न्यायालयीन प्रशासनाकडून नोटीस प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT