Yoga For Skin esakal
आरोग्य

Yoga For Skin : निरोगी अन् चमकदार त्वचा हवी? मग, दररोज करा ‘या’ योगासनांचा सराव, जाणून घ्या पद्धत

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Skin : सध्याची बिघडलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव अन् खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आरोग्यासोबतच त्वचेवर देखील याचा परिणाम होतो आणि त्वचेची चमक कमी होऊ लागते.

योग्य संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली हे तरूण, तुकतुकीत त्वचेचे रहस्य असू शकते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही निरोगी त्वचेसाठी नियमितपणे योगाभ्यास आणि आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.

योगाचा नियमितपणे सराव केल्यास म्हातारपणात ही तुमची त्वचा निरोगी राहू शकते. तसेच, चेहऱ्याची चमक ही कायम राहण्यास मदत होते. नियमित काही योगासनांचा सराव केल्याने चेहऱ्याची त्वचा हेल्दी आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

भूजंगासन

भूजंगासन हे योगासन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाचा नियमित सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर जमिनीवर सरळ रेषेत झोपा.

आता तुमच्या दोन्ही पायांचे तळवे सरळ रेषेत ठेवा. त्यानंतर, तुमचे शरीर वरच्या बाजूला करून डोके वरच्या दिशेने करून श्वास घ्या. तसेच, तुमचे दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवा. आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर, तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. नियमित या योगासनाचा सराव केल्याने त्वचा हेल्दी आणि चमकदार राहण्यास मदत होते.

हलासन

हलासन हे योगासन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हलासन हे योगासन प्रभावी आहे. या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपावे. आता श्वास घेताना तुमचे दोन्ही पाय वरच्या दिशेने उचलून डोक्यांच्या मागे घ्या. त्यानंतर, पायांच्या अंगठ्याने जमिनीला स्पर्श करून दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा.

या स्थितीमध्ये तुमची कंबर ताठ आणि जमिनीला समांतर ठेवा. काही सेकंद या स्थितीमध्ये रहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. त्यानंतर, सामान्य स्थितीमध्ये परत या. या योगासनाचा नियमित सराव केल्याने त्वचा, केस आणि संपूर्ण आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे, या योगासनाचा तुमच्या दैनंदिन रूटीनमध्ये जरूर समावेश करा. हे योगासन जर पहिल्यांदाच करत असाल तर योगातज्ज्ञाची मदत घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Accused: याआधी तो जेलमध्ये होता, त्याला कुणी बाहेर काढलं माहित नाही... बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांचे कुटुंबिय नेमकं काय म्हणाले?

रस्त्यावर धावू लागली पेटलेली कार, लोकांची वाहने वाचवण्यासाठी एकच पळापळ; 'बर्निंग कार'चा थरारक Video Viral

जुनं ते सोनं! Mumbai Indians ची धाव तीनवेळा IPL जेतेपद जिंकून देणाऱ्या कोचकडे; फ्रँचायझीने घेतला मोठा निर्णय

Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा एकजण अल्पवयीन? आरोपीने कोर्टासमोर दिली माहिती

Mumbai Indians संघात द्रविडच्या खास माणसाला मिळणार 'जॉब'? पण मग मलिंगा...

SCROLL FOR NEXT