Yogasana For Peace Of Mind : सध्याची जीवनशैली अत्यंत धकाधकीची, धावपळीची आणि व्यस्त झाली आहे. त्यामुळे मेंदू सतत क्रियाशील असतो आणि मन अस्वस्थ. यामुळे शारीरिक आजारांबरोबर मानसिक आजार जडतात. नैराश्य, निष्क्रियता, कार्यक्षमता कमी होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे माणसाच्या एकूणच जीवनावर त्याचा परिणाम होतो.
अशावेळी मन शांत ठेवण्यासाठी काही योगासनं उपयुक्त ठरू शकतात. हेल्दी जीवन जगण्यासाठी शरीराबरोबर मन पण हेल्दी असणं आवश्यक आहे. यासाठी योग हा सर्वोत्तम पर्याय आहे. जो दोन्ही हेतू पूर्ण करू शकतो. यामुळे शरीराबरोबरच मनालाही व्यायाम मिळतो. आसन करताना श्वासावर केलं जाणारं नियंत्रण मनालाही नियंत्रीत करतं.
उत्तानासान
या आसनात सरळ ताठ उभे रहा. श्वास सोडत पुढे वाका. हात पायाच्या घोट्याला धरण्याचा प्रयत्न करा. यात गुढघे वाकवू नये. यात आपलं कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करावा. काही वेळ त्याच स्थितीत थांबा. मग श्वास घेत उठा. हे आसन रोज करावे.
हलासन
हे आसन सहज कोणालाही जमेल असे नाही. पण तरीही जर रोज सराव केला तर नक्कीच जमू शकते. या आसनाने पाठीच्या मणक्यावर पूर्ण ताण येतो. या आसनामुळे शरीराची आणि मनाची लवचिकता वाढते. एकाग्रता वाढते. चेहऱ्यावर ग्लो येतो.
हे आसन करण्यासाठी पहिले पाठीवर सरळ झोपा. मग दोन्ही पाय एकाचवेळी वर उचला. हात सरळ जमीनीला टेकलेलेच राहू द्या. पाय वर वर नेत डोक्याच्या दिशेने न्या. मग डोक्यामागे जमीनिला टेकवण्याचा प्रयत्न करा. थोड्यावेळ याच स्थितीत रहा. नंतर हळू हळू पूर्वस्थितीत या.
शवासन
तसं बघितलं तर हे आसन करायला सगळ्यात सोपं आणि अनेकांचं आवडतं आसन आहे. यात तुम्हाला पाठीवर झोपायचं आहे. सरळ झोपा. हात, पाय सरळ जमीनीवर टेकलेले असावे. डोळे बंद. सर्व शरीर लूज सोडा. प्रत्येक अवयव एकदम रिलॅक्स करा. पायाच्या बोटांपासून चेहऱ्यापर्यंत सर्व रिलॅक्स करा. श्वासावर लक्ष ठेवा.
यामुळे संपूर्ण शरीराबरोबर मन रिलॅक्स होतं. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने इतर विचार काही वेळासाठी बंद होतात. आणि मनाला पूर्ण आराम मिळतो.
मेडीटेशन
रोज किमान १० मिनीटं ध्यानं करावं. यात पाठीचा कणा ताठ ठेऊन तुम्ही कंफर्टेबल असाल त्या आसनात म्हणजे साधी मांडी, वज्रासन, पद्मासन घालून बसा. दोन्ही हाताचे पंजे एकत्र गुंतवून किंवा ध्यान मुद्रा करून बसा. डोळे बंद आणि लक्ष सगळं श्वासावर ठेवा. असं केल्याने मन शांत आणि रिलॅक्स होतं. नवी उर्जा जाणवते. एकाग्रता वाढते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.