Annual Horoscope 2024, Aquarius Horoscope esakal
Horoscope | राशी भविष्य

Annual Horoscope 2024 : 'इच्छापूर्तीचे वर्ष, जीवनालाही लाभेल स्थैर्य'; कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल 2024 वर्ष?

हर्षल-नेपच्यून काही बाबतीत तुमच्या जीवनाला नवी कलाटणी देणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

वैवाहिक जोडीदाराच्या नातेवाईकांकडून काही अडचणी उद्‌भवतील. साखरपुडा किंवा लग्नाच्यावेळी झालेल्या चर्चेचा काही ठिकाणी उल्लेख होऊन मनस्ताप होईल.

Annual Horoscope 2024, Aquarius Horoscope : आकाशगंगेतील अकरावी महत्त्वाची रास. अत्यंत बुध्दिमान, तीव्र आकलनशक्ती आणि खोलवर विचार करण्याची क्षमता हे गुणधर्म घेऊन ही रास आलेली आहे. पक्षाप्रमाणे हवेत उडावे, एखादा कारखाना टाकावा, गडगंज संपत्ती मिळवावी, एकाचवेळी चार-पाच व्यवसाय करावेत, ऑफिसमध्ये सेक्युरिटी असावी, घरात सुगरण पत्नी असावी, सुदृढ शरीर असावे, सर्वांनी आपणाला मान द्यावा, अशा या राशीच्या माणसांच्या अनेक सुप्त इच्छा असतात. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतीलच असे नाही; पण प्रयत्न केल्यास सर्व काही साध्य होऊ शकते, हे सिद्ध करणारी ही रास (Kumbh Rashi) आहे.

जानेवारी : या राशीतील सर्व नक्षत्रांना वर्षभर प्रवास योग येतील, असे संक्रांतीचे फळ आहे. नोकरी, व्यवसायातील काही अडचणी आपोआप कमी होतील. उर्जितावस्था येऊ लागेल; पण तुमचे नियोजन मात्र चांगले हवे. कष्टाने का होईना; पण हाती घेतलेल्या सर्व कामात चांगले यश मिळवाल. पोलिस केसेसपासून जपा. व्यसनी मित्रमंडळींच्या सल्ल्यापासून दूर राहावे, अन्यथा गोत्यात याल. संततीपासून त्रास होऊ शकतो.

फेब्रुवारी : मोठे उद्योगधंदे करावेसे वाटतील. जर योग्य नियोजन आणि योग्य कल्पना असतील, तर त्यात मनासारखे यश मिळेल. नोकरीसाठी (Job) प्रयत्न सुरू असतील, तर तेथेही काम होईल. पुढे घडणाऱ्या काही घटनांची पूर्वसूचना मिळेल. सर्व कामांत यश देणारा महिना आहे, पण देण्या-घेण्याच्या व्यवहारातून काही ठिकाणी संघर्ष होण्याचे योग आहेत. लांबचे प्रवास, सहली वगैरे टाळण्याचा प्रयत्न करा.

मार्च : वैवाहिक जोडीदाराच्या नातेवाईकांकडून काही अडचणी उद्‌भवतील. साखरपुडा किंवा लग्नाच्यावेळी झालेल्या चर्चेचा काही ठिकाणी उल्लेख होऊन मनस्ताप होईल. सहज केलेली चेष्टा, थट्टा-मस्करी अंगलट येईल, काळजी घ्यावी. कागदोपत्री व्यवहारात यश येईल. मुला-बाळांच्या भाग्योदयाच्या दृष्टीने चांगली बातमी येईल. जे काम हाती घ्याल, त्यात दैवीसहाय्य लाभेल.

एप्रिल : काहीजणांच्या मदतीने घरात एखादे देवकार्य होईल. देवघर चुकीच्या दिशेला असेल, तर या महिन्यात बदला, नक्कीच त्याचा चांगला अनुभव येईल. सरकारी कामात मोठे यश देणारा महिना आहे. आतापर्यंत खोळंबलेली अनेक कामे गतिमान होतील. नोकरीत असाल, तर काहीजणांना अनपेक्षित बदलीला सामोरे जावे लागेल.

मे : नोकरी, व्यवसायात कामाची जबाबदारी वाढेल. घरगुती समस्या असतील, तर या महिन्यात त्या कमी होतील. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. जागेच्या व्यवहारात यश मिळेल. घर, जागा, वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. किचकट प्रश्‍न या महिन्यात सुटतील. धनलाभाच्यादृष्टीने अनुकूल योग. संततीच्याबाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. भाग्योदयास सुरुवात होईल.

जून : पूर्वजांच्या काही पुण्याच्या कामामुळे इतरांना अशक्य असलेल्या गोष्टीत तुम्हाला चांगले यश मिळेल. अचानक धनलाभ, विवाह, संततीप्राप्ती अथवा संततीचा उत्कर्ष, प्रवास याचे योग आहेत. नव्या कार्यक्षेत्रात प्रवेशाच्या दृष्टीने हा महिना अनुकूल आहे. वाहन जपून चालवा. दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे.

जुलै : आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव वाढेल. काहीजणांना त्याचा उत्तम अनुभवही येईल. सतत काही ना काही दैवी अनुभव येत राहतील. काहीजणांच्या आगमनामुळे घरात अस्वस्थ वातावरण राहील. त्यांच्या मुला-बाळांच्या अथवा पाहुण्यांच्या कारवायामुळे कुटुंबात तप्त वातावरण राहील; पण धनलाभ व इतर बाबतीत मोठे यश मिळवाल. महत्त्वाचे जटिल प्रश्‍न सोडविण्यास अनेकजण पुढे येतील.

ऑगस्ट : जागेचे तसेच आर्थिक व्यवहार मार्गस्थ होतील. सर्व गैरसमज दूर होतील. गेलेली नोकरी अथवा व्यवसाय परत मिळण्याची शक्यता. अवघड कामे हातावेगळी करू शकाल. संसारिक सौख्यात वाढ होईल. न जुळणारे लग्न अचानक ठरेल; पण व्यावहारिक बोलणी मात्र अत्यंत जपून करावीत. काही नव्या समस्या निर्माण होतील, त्यासाठी विचारपूर्वक वागावे.

सप्टेंबर : दैनंदिन जीवनात काही महत्त्वाचे फेरबदल घडतील, त्यामुळे आनंदी राहाल. माता-पिता यांच्याबाबतीत सौख्यदायक वातावरण; पण घरातील ऐक्य बिघडणार नाही, याची काळजी घ्या. एखाद्या अति महत्त्वाच्या व कठीण कामात यश; पण किरकोळ कारणासाठी मोठे खर्च करावे लागतील. एखाद्याचे भले करण्यास जाल; पण तोच तुमच्यावर नको ते आरोप करेल, यासाठी सावध राहा.

ऑक्टोबर : पूर्वजांच्या काही चुका या महिन्यात प्रकर्षाने जागृत होतील. त्याचा किरकोळ त्रास होऊ शकेल. यासाठी घरातील श्राद्धकार्य आणि देवकार्य व्यवस्थित करा, म्हणजे संकटे आली, तरी त्यातून बचाव होईल. आर्थिक बाबतीत ग्रहमान चांगले आहे; पण कुणालाही उधार, उसनवारी अथवा कर्ज देताना सावध राहा. नको ती प्रकरणे अंगलट येऊ शकतात. कोणत्याही कागदपत्रावर जपून सह्या करा.

नोव्हेंबर : कुणालाही मदत करताना स्वतःचा बचाव प्रथम करा. पूर्वीच्या काही चुकांमुळे आजाराला निमंत्रण मिळेल. किरकोळ आजारासाठी मोठे खर्च उद्‌भवतील. भाऊबंदकी अथवा भावंडांत वादविवाद असतील, तर ते कमी होतील. नोकरवर्गात काहीतरी गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन शांत ठेवून निर्णय घेणे आवश्यक आहे.

डिसेंबर : कुणाचाही विरोध मोडून काढाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनाट आजार असतील, तर त्यावर काहीतरी मार्ग निघेल. अनैतिक प्रेमप्रकरणापासून दूर राहावे, अन्यथा नको ते आरोप येऊ शकतील. विषारी कीटक, सर्पदंश यापासून धोका. वडिलोपार्जित संपत्ती असेल, तर त्यात काहीतरी घोटाळे दिसून येतील. कागदोपत्री व्यवहार करताना ते जपून करा.

'साडेसाती असली, तरी त्यातून तुमचे चांगलेच होणार'

मंगळ, राहू, गुरू, शनी या चार ग्रहांची मालकी असणारी ही रास कोणत्याही प्रसंगात डगमगत नाही. यावर्षी गुरूच्या कृपेने तुमचे स्वतःचे घरदार होईल, वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल, नोकरी, व्यवसायात प्रगती, एखादी नवीन नोकरी मिळू शकेल किंवा असलेल्या नोकरीत पगारवाढही होऊ शकते. वास्तुसंदर्भातील सर्व प्रश्‍न निकालात निघतील. भाडेकरू आणि मालक यांच्यातील संबंध सुधारतील. आईच्या बाबतीत असलेले काही त्रास कमी होतील. जर घराण्यातील काही दोष असतील, तर ते यावर्षी दत्तकृपेने आपोआप नाहीसे होऊ लागतील.

शनीचे भ्रमण तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडेल. कोणत्याही कामात घाईगडबड करू नका, असा संदेश हा शनी देत आहे. साडेसाती असली, तरी त्यातून तुमचे चांगलेच होणार आहे. जीवनाला कायमस्वरूपी स्थैर्य देणारी घटना यावर्षी घडेल. राहू-केतूचे भ्रमण आर्थिक बाबतीत म्हणावे तसे चांगले नाही. एखाद्या विशिष्ट कारणासाठी राखून ठेवलेला पैसा दुसऱ्याच कामासाठी खर्च होऊ शकतो. देण्या-घेण्यातून कडाक्याचे मतभेद होऊ शकतात. हर्षल-नेपच्यून काही बाबतीत तुमच्या जीवनाला नवी कलाटणी देणार आहेत. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमचे जीवन बदलून जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT