Annual Horoscope 2024, Pisces Horoscope esakal
Horoscope | राशी भविष्य

Annual Horoscope 2024 : जीवनातील अंतिम क्षण कसा असेल, हे दर्शवणारी 'मीन रास'; या राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल 2024 वर्ष?

जीवनातील (life) अंतिम क्षण कसा असेल, हे दर्शवणारी ही रास आहे.

सकाळ डिजिटल टीम

राशीचा स्वामी गुरू असून त्याची दिशा ईशान्य आहे. केशरी बदामी व क्रीम हे रंग या दिशेचे निदर्शक आहेत.

Annual Horoscope 2024, Pisces Horoscope : आभाळ माया आणि सागराचा खोलपणा, स्वतःच्या पोटात काहीही ठेवून घेऊ नये, अशी शिकवण देणारी ही रास. यशाच्या उत्तुंग शिखराला स्पर्श करा; पण पाय मात्र जमिनीवरच हवेत हे देखील हीच रास शिकविते. जीवनातील (life) अंतिम क्षण कसा असेल, हे दर्शवणारी ही रास आहे. सागरासारखे विशाल मन, प्रचंड संपत्ती, सुयोग्य वैवाहिक जोडीदार असावा. काही प्रयत्न न करता सर्व काही मिळावे. तिजोरी कायम भरलेली असावी. प्रत्येकाने आपली प्रशंसा करावी. जाईल तेथे यश मिळावे. कोणी शत्रू नसावे, घरात सुख-शांती आणि समृद्धीचे वातावरण असावे, अशी इच्छा बाळगणे. कष्टाने जे यश मिळते त्याचा आनंद वेगळाच असतो, हे शिकवणारी ही रास (Min Rashi) आहे.

जानेवारी : मित्र-मैत्रिणींच्या आग्रहासाठी दूरचे प्रवास किंवा सहलीचे योग. काही नव्या योजना कार्यान्वित होतील. संक्रांतीनंतर मानसिक समाधान देणाऱ्या घटना घडतील. कुटुंबात जर वादावादी असेल, तर धार्मिक कार्यामुळे ती नाहीशी करण्यास मदत होईल. आर्थिक (Financial) बाबींमध्ये हात आखडता घ्यावा लागेल. काही दिवस काटकसर आवश्यक आहे.

फेब्रुवारी : वैवाहिक जीवनातील (Married life) अडचणी दूर होतील. नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळेल; पण नव्या कल्पना राबवाव्या लागतील. मनातील अनेक इच्छा पूर्ण करू शकाल. वैवाहिक जोडीदाराबाबत महत्त्वाची घटना घडेल. भाग्योदय भरभराटीच्या दृष्टीने शुभ योग. नोकरीमध्ये स्थलांतर संभवते. काही प्रकरणांमुळे घरमालक आणि भाडेकरू संबंध बिघडतील. त्यासाठी सावध राहा. कुणाही अनोळखी माणसाला भाडेकरू म्हणून ठेवून घेऊ नका.

मार्च : जे काम कराल ते आवाक्याबाहेरचे असू नये, याची काळजी घ्या. एखाद्या प्रकरणात उपस्थिती महत्त्वाची ठरू शकेल. प्रेमप्रकरणात असाल तर फसाल. मोबाईल अथवा तत्सम माध्यमे जपून वापरा. कुणालाही त्या वस्तू देऊ नका, अन्यथा अडचणीत येण्याची शक्यता आहे. वित्तीय संस्थेत कर्ज काढण्यासाठी काहीजण तुम्हाला जामीन राहण्याचा आग्रह करतील; परंतु जामीन राहण्यापूर्वी विचार करा.

एप्रिल : अडचणीच्या वेळी काही जण तुमचे वाहन मागतील; पण शहानिशा केल्याशिवाय कुणालाही वाहन देऊ नका, त्यांची चूक तुम्हाला फार महागात पडू शकते. अत्यंत अवघड कामात यश मिळेल. त्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायात लाभदायक वातावरण. अपघात, आजार, गैरसमज यापासून जपावे लागेल. कोणतेही नवीन काम करताना नियोजनपूर्वक करा.

मे : वास्तुशास्त्र आणि अघोरी विद्येच्या मागे लागल्याने आर्थिक फसवणूक होईल. प्रवास जपून करावा. वाहने जपून चालवा आणि वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने चांगले योग आहेत. इच्छितस्थळी बदली होऊ शकते. काही जणांना बढतीचे योग संभवतात. स्वतःची वास्तू होण्याच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान. एखादा मित्र अथवा नातेवाईकांच्या सहकार्याने किंवा शेजारी व्यक्तींच्या ओळखीने जागा घेऊ शकाल.

जून : काही वेळा ठरविलेल्या कामापेक्षा अचानक केलेली कामे यशस्वी होतात याचा अनुभव येईल. स्वतःचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीतून मोठे लाभ. नोकरी व संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील; पण नोकरी-व्यवसायात योग्यता असूनही नको ते काम मिळाल्याने मन अस्वस्थ राहील. अशा परिस्थितीत मन शांत ठेवूनच निर्णय घ्यावेत.

जुलै : वास्तू, जागा वाहन यांचा लाभ होईल. व्यावसायिक क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटेल. अवघड वाटणारी कामे सहज पार पडतील. नोकरीसाठी चालू असलेल्या परीक्षेत यश मिळेल. घरात मंगल कार्याच्या दृष्टीने घडामोडींना वेग येईल. काही गोष्टी मनासारख्या घडल्या नसल्या तरी मन शांत ठेवा. भाग्योदयाच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

ऑगस्ट : नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल संभवतात. भरतीसाठी प्रयत्न करीत असाल तर यशस्वी व्हाल. ऑनलाईन किमती वस्तू खरेदी करताना फसवणूक होईल. साडेसाती सुरू असल्यामुळे काही कामे रेंगाळतील. कोणी मदतीची याचना करत असेल तर शहानिशा केल्याशिवाय काही देऊ नका. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा.

सप्टेंबर : प्रवास आणि पत्रव्यवहार याबाबतीत अनुकूल योग. जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आणि शेजारीपाजारी यांच्याशी बिघडलेले संबंध सुधारतील. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतल्यास तक्रारी दूर होतील. अनेक दिवस रखडलेले महत्त्वाचे काम होईल. अत्यंत आवश्यक कामासाठी गरज असलेल्या व्यक्तींची भेट होईल.

ऑक्टोबर : अनेक गोष्टी मनासारख्या होतील. नोकरी-व्यवसायाला शुभकलाटणी. एखाद्याचे लग्न ठरविण्यात तुमचा मोलाचा वाटा असेल. मात्र, त्याचे श्रेय मिळणार नाही. अति मोह आणि आशा यामुळे नुकसान संभवते. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. कौटुंबिक बाबतीत क्लेशदायक वातावरण असल्याने काळजी घेणे सर्वार्थाने उत्तम. जुन्या व्यवहारात मोठा लाभ होऊ शकतो.

नोव्हेंबर : हातावरील रेषेपेक्षा चांगले विचार नशीब घडवतात. अडचणी आल्या म्हणून निराश न होता कारणे शोधा, यामुळे बरेचसे साध्य होईल मनशांतीही मिळेल. व्यवसायात नवीन बदल करण्यास अनुकूल काळ. गुरुचे भ्रमण काही बाबतीत उत्तम. राहूचे भ्रमण दूरचे प्रवास घडवेल. काही जणांना शापित योगाचाही त्रास जाणवेल. मात्र, हा महिना अनेक बाबतीत अनुकूल ठरणार आहे.

डिसेंबर : घराचे बांधकाम, परवानगी अथवा तत्सम सरकारी कामे करून घ्या. तुमच्या चांगल्या कामामुळे मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक बाबतीत सर्व इच्छा पूर्ण होतील. काही संशयित लोकांसमोर महत्त्वाच्या गोष्टींची वाच्यता करू नका अन्यथा शत्रू त्याचा गैरफायदा घेतील. अनेक मार्गाने नवनवीन कामे मिळतील.

राशीचा स्वामी गुरू अन् दिशा ईशान्य

राशीचा स्वामी गुरू असून त्याची दिशा ईशान्य आहे. केशरी बदामी व क्रीम हे रंग या दिशेचे निदर्शक आहेत. ईशान्य व उत्तर भागात या रंगाचा वापर केल्यास जीवन सर्वार्थाने समृद्ध होऊ शकते. मुळातच चंचल स्वभावाची ही रास असल्यामुळे या राशीच्या व्यक्ती कोणताही ठाम निर्णय घेऊ शकत नाहीत. महत्त्वपूर्ण निर्णयांच्या बाबतीत चार-चौघांचा सल्ला अवश्य घ्यावा. यावर्षी हर्षल, नेपच्यूनचे भ्रमण पुढील घटनांची सतत आगाऊ सूचना देत राहील किंवा अंतर्ज्ञानाने घटना समजतील.

एखाद्या व्यक्तीशी तुमचा संपर्क झाला असेल, तर ती कशी असेल याचाही अंदाज येईल. यावर्षी गुरूचे भ्रमण सर्व कामांत मोठे यश देईल. काही जणांना प्रवास, लिखाण, संबंध जोडणे, मानसन्मान, प्रसिद्धी, धनलाभ या दृष्टीने गुरू चांगले फळ देईल. एखादा मित्र अथवा नातेवाईकांच्या सहकार्याने किंवा शेजारी व्यक्तींच्या ओळखीने जागा घेऊ शकाल. भाग्योदयाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणार असाल, तर अनुकूल ग्रहमान आहे. कानाचे आणि मानसिक विकार असतील तर ते कमी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT