Annual Horoscope 2024, Sagittarius Horoscope esakal
Horoscope | राशी भविष्य

Annual Horoscope 2024 : 'धनू रास' या राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल 2024 वर्ष? जाणून घ्या सविस्तर माहिती

धनू ही राशीचक्रातील अत्यंत महत्त्वाची अशी नववी रास (Dhanu Rashi) होय.

सकाळ डिजिटल टीम

-आनंद एस. मत्तीकोप-कुलकर्णी बेळगाव

Annual Horoscope 2024, Sagittarius Horoscope : धनू ही राशीचक्रातील अत्यंत महत्त्वाची अशी नववी रास (Dhanu Rashi) होय. धडाडी, साहस यावर अंमल गाजविण्याची वृत्ती, एखाद्याकडून काम करून घेण्याची कला तसेच प्रचंड शारीरिक क्षमता, करेन ती पूर्व दिशा या गोष्टीचा संगम असलेली रास म्हणजे धनू. दुर्योधनाच्या मरणाचे कारण मांडी होती. त्यामुळे एखाद्या गंभीर प्रसंगात कोणी शड्डू मारून उभे राहिल्यास प्रकरण हातघाईला जाऊन नको ते अनर्थ घडू शकतात, हा या राशीचा गुणधर्म आहे.

या सर्वांचा विचार करून प्रसंगावधानाने वागल्यास जीवनातील कोणत्याही समस्येवर निश्‍चितच मात करू शकाल. यावर्षी गुरूचे भ्रमण तुम्हाला धनलाभाच्या दृष्टीने चांगले आहे. आरोग्य (Health) उत्तम राहील. मनातील अनेक इच्छा पूर्ण करू शकाल; पण पूर्वीची कामे पूर्ण केल्याशिवाय नवीन कामे स्वीकारू नका. ते अंगलट येऊ शकते.

जानेवारी : बुद्धिमत्तेचे चीज होईल. एखादे मोठे कायमस्वरूपी काम मिळण्याची शक्यता. घरादारासाठी प्रयत्न करत असाल, तर त्यात यश मिळेल. तत्कालिक नोकरी असेल, तर थोड्याशा प्रयत्नाने ती कायमची होऊ शकते. अधिकारप्राप्ती होईल. सर्व कामात मोठे यश मिळेल; पण वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीस त्रास, अचानक आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेला धोका, शिक्षणात अडचणी असे प्रकारही घडू शकतील. व्यसनांपासून दूर राहा.

फेब्रुवारी : गुप्त शत्रूंच्या कारवाया होतील. महत्त्वाच्या गोष्टींची कोठेही वाच्यता करू नका. अडचणी येऊ शकतात. वास्तुविषयक व्यवहार जपून करावेत. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक नुकसान, डोळ्यांना त्रास, चष्मा लागणे आणि भीती वाटणे असे प्रकार घडू शकतील.

मार्च : काही कारणांमुळे अचानक प्रवास घडतील. सरकारी कामात आणि कोर्ट कचेरीच्या कामात जरा जपून राहावे लागेल; पण पूर्वीच्या काही समस्या अचानक सुटतील. दीर्घकालीन केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

एप्रिल : उत्तरायण काही बाबतीत अतिशय शुभ ठरणार आहे. आर्थिक स्थितीत बदल होईल. भांडण-तंटे, शत्रुत्व, दुर्घटना यापासून जरा सावध राहावे. किरकोळ गोष्टीवरून निर्माण झालेले मतभेद उग्र रूप धारण करणार नाहीत, याची काळजी घ्या.

मे : अनेक मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता. शारीरिक आरोग्य सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या व्यवहाराच्या वेळी कोणीतरी ऐनवेळी माघार घेतील. त्यासाठी थोरामोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या. जवळच्या लोकांच्या बाबतीत काही चांगल्या घटना घडतील.

जून : अनेक क्षेत्रांत तुमचे कर्तृत्व जगापुढे येईल. आतापर्यंत तुमच्याकडे लक्ष न देणारे लोक आपणहून तुमच्याकडे येऊ लागतील. स्वतंत्र व्यवसायात असाल, तर प्राप्तिकर व इतर प्रकरणातून मुक्त व्हाल. जी कामे हाती घ्याल, त्यात हमखास यश मिळेल.

जुलै : व्यापारी चढाओढीमुळे मन बेचैन राहील. देण्या-घेण्याच्या व्यवहारात फारसा लाभ होणार नाही. प्रवास आणि पत्रव्यवहार या बाबतीत मात्र जीवनाला कलाटणी देणाऱ्या शुभकार्याची सुरुवात या महिन्यात होईल. कोणतेही काम कितीही अवघड असले, तरी त्यात यश मिळू शकेल.

ऑगस्ट : आर्थिक बाबतीत उत्तम काळ. शिल्लक असलेल्या बऱ्याच कामांना गती मिळेल. दुरावलेली मित्रमंडळी पुन्हा जवळ येऊ लागतील; पण आपले कोण? परके कोण? हे ओळखणे महत्त्वाचे. मोबाईलमुळे झालेले गैरसमज निवळतील. एखाद्या सरकारी कामासाठी प्रवास करावा लागेल.

सप्टेंबर : दैनंदिन कामाच्या स्वरुपात काही महत्त्वाचे फेरबदल या आठवड्यात होतील. जे तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकतील. वैवाहिक जीवन तसेच नोकरी व्यवसायातील रखडलेली कामे होऊ लागतील. कोर्ट प्रकरणे सुरू असतील, तर थोडेसे चातुर्य वापरा. तुमची सरशी होईल. नोकरीत हव्या त्या ठिकाणी बदली होऊ शकेल. घरातील वातावरण समाधानी आणि आनंदी राहील.

ऑक्टोबर : ध्यानीमनी नसताना महत्त्वाची कामे आपोआप होऊ लागतील. हा महिना तुम्हाला फार मोठे यश देऊ शकेल. अत्यंत अवघड व्यावहारिक कामे पूर्ण करू शकाल. आरोग्यविषयक गंभीर समस्या दूर होतील. तसेच आर्थिक व्यवहारही सुरळीत होऊ लागतील; पण काही गुप्त शत्रूंच्या कारवायांमुळे महत्त्वाच्या कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर : आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. दीर्घकाळ दूर असलेल्या व्यक्तींची भेट होईल. धनलाभाच्या दृष्टीने ग्रह उत्तम आहे. एकाच वेळी अनेक नोकऱ्यांचे अथवा व्यवसायाचे योग येतील. विवाहासाठी प्रयत्न करत असाल, तर अनुकूल काळ आहे. घर, जागा, वाहन वगैरेंचे स्वप्न पूर्ण करू शकाल. लग्नासाठी तीन-चार स्थळे येतील. त्या सर्वांनी एकाच वेळी होकार दिल्यामुळे गोंधळात पडाल. नोकरी व्यवसायातील ताणतणाव कमी होतील.

डिसेंबर : पुष्कळ वेळा आपण ठरवतो एक आणि होते वेगळेच, तर काही वेळेला जे काम होणार नाही असे वाटत असते, नेमके तेच काम आपोआप होऊन जाते. असे काही अनुभव या महिन्यात येतील. नवे काहीतरी करून दाखवावेसे वाटेल. चार पैसे हाती आल्यास ते आत्तापासूनच जपून ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे खर्च वाढणार आहेत. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन, खेळ वगैरेकडे लक्ष न देता अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. एखादी किरकोळ चूकही वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरवू शकेल. तरुणवर्गाने प्रेम प्रकरणात विशेष सावधगिरी बाळगावी. प्रेमाच्या भरात दिलेले एखादे वचन किंवा शब्द अंगलट येऊ शकतो.

..तर ते जीवनाचे सोने करू शकतात

ईशान्य व उत्तर या दोन्ही दिशांवर धनू राशीचे प्राबल्य असल्याने या दिशेकडे तोंड करून कोणतेही कार्य केल्यास यश मिळू शकते. मूळ नक्षत्राची प्रचंड शक्ती आणि कचऱ्यातून सोने निर्माण करण्याची कला, उत्तराषाढा नक्षत्राचा मानीपणा आणि एकाच वेळी अनेक कामे करण्याची क्षमता, पूर्वाषाढा नक्षत्राचे धाडस, देखणेपणा आणि मर्दानी सौंदर्य, अवखळपणा, अवघडपणा घेऊन ही रास आलेली आहे. या राशीची माणसं सर्व क्षेत्रात धाडसाने पुढे येतात. स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणि स्वतःच्या कर्तबगारीनेच वर येतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते जीवनाचे सोने करू शकतात; पण अति राग, उतावळेपणा आणि क्षमतेबाहेरील कामे घेण्याचे त्यांनी टाळावे.

यावर्षी नोकरी व्यवसायात बऱ्यापैकी चांगल्या घटना घडतील. बदली किंवा बढती आली असेल, तर ती मिळू शकेल. वरिष्ठांचा जाच कमी होईल. धनस्थानावर गुरूची दृष्टी असल्यामुळे वर्षभर आर्थिक अडचण भासणार नाही. विवाहाच्या दृष्टीने हे वर्ष म्हणावे तितके अनुकूल नाही. शनीचे भ्रमण तुम्हाला सर्व बाबतीत प्रोत्साहन देणारे आहे. इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कर्तबगारीने आणि बुद्धीने जे काही कराल, त्यातच तुम्ही वर याल. राहू-केतूचे भ्रमण वास्तुदोष निर्माण करेल. नोकरीविषयक काहीतरी गडबड, गोंधळ होईल. कुणाची तरी चूक अंगलट येऊन नोकरी सोडण्याचे प्रसंग येतील किंवा निलंबन वगैरे अशी शक्यता दिसते. त्यासाठी कोणाचीही नको ती जबाबदारी स्वीकारू नका. घर-जागा वगैरे घेणार असाल, तर ती बाधित नाही, याची खात्री करूनच घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT