weekly horoscope 5th february 2023 to 11th february 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (०५ फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३)

पौर्णिमेचं आणि गुरुकृपेचं एक अतूट नातं सांगितलं जातं! चंद्राच्या कलांचा विकास हा एका अमृतकलेकडे वाटचाल करत असतो आणि हीच ती चंद्राची सतरावियेची अमृतकला होय.

श्रीराम भट saptrang@esakal.com

व्यावसायिकांना यश

मेष : सप्ताहात शुक्र-मंगळाची फिल्ड ॲरेंजमेंट राहील. व्यावसायिकांचं मार्केटिंग यशस्वी होईल. व्यावसायिक वसुली होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींकरिता सप्ताहाची सुरुवात आणि शेवट मानसिक मरगळ घालवेल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सर्व प्रकारच्या गाठीभेटींतून उत्तम. अर्थात, विवाहसंबंधातही.

दिवस चौकार-षटकारांचे!

वृषभ : राशीचा मंगळ शुक्राच्या योगात रोहिणी नक्षत्रास तारुण्य प्रदान करेल. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र आपल्या राशीस नवी जीवनदृष्टी देईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ८ ते १० हे दिवस विजयी चौकार-षटकारांचे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना राजकारणात यश. और क्‍या!

गुप्तचिंता जातील

मिथुन : सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर शुभलक्षणीयच. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती सभा-प्रदर्शनं गाजवतील. प्रिय व्यक्तींसमवेत आनंदोत्सव. ता. ८ ते १० हे दिवस एकूणच मोठी भाग्यबीजं पेरणारे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्तचिंता जाईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुप्रचिती.

उत्तम घडामोडींचा काळ

कर्क : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र गुरुप्रचिती देणारंच. विशिष्ट शुभारंभ कराच. पुत्रपौत्रांच्या चिंता जातील. मात्र, व्यावसायिक संमोहनं टाळा. प्रेमिकांनो कोणाच्या बहकाव्यात येऊ नका. ता. ९ व १० हे दिवस पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायदृष्ट्या उत्तम घडामोडींचे. पौर्णिमेजवळ आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींची चैन, चंगळ आणि मौजमजा!

घोळ न घालता निर्णय घ्या

सिंह : शुक्र-मंगळ योगातून पौर्णिमेजवळ एक बॅटिंग फिल्ड राहील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती चांगल्या अर्थानेच फ्लॅश न्यूजमध्ये राहतील. विवाहविषयक गाठीभेटी कराच. घोळ न घालता निर्णय घ्या. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा तीर्थाटनाची. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार दैवी प्रचितीचा, लॉटरी लागण्याची शक्यता.

ऐतिहासिक शुभफळं मिळतील

कन्या : सप्ताहातील पौर्णिमा विशिष्ट ऐतिहासिक शुभफळं देईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील नव्या जडणघडणीतून लाभ. हस्त नक्षत्रास सप्ताहाचा शेवट मोठ्या जल्लोषाचा. विशिष्ट प्रतीक्षा संपेल. नवपरिणितांना सुवार्ता. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार खरेदीमध्ये जपण्याचा.

शेअर मार्केटमध्ये अनुकूलता

तूळ : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र होतकरू तरुण मंडळींना ऑनलाइन क्‍लिक होणारं. ओळखी, मध्यस्थी क्‍लिक होतील. व्यावसायिक तेजी राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शेअर मार्केट अनुकूल राहील. चित्रा नक्षत्रास पौर्णिमा व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनातून छानच. विशाखा नक्षत्रास शनिवार हरवाहरवीचा. घरातील लहान मुलांना सांभाळा.

विशिष्ट संधीचा लाभ उठवा

वृश्‍चिक : पौर्णिमेची प्रभावी स्पंदनं खेचून घेणारी रास राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती नवस पूर्ण करतील. गुरुकृपा होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक घडामोडींतून प्रसन्न ठेवणारंच ग्रहमान. विशिष्ट संधीचा लाभ उठवाल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती घरी आणि दारी मोहिनी टाकतील. तरुणांना प्रेम प्रकरणात यश मिळेल.

त्रासदायक बाबी संपतील

धनू : आजच्या पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र एखाद्या भव्य यशाची चाहूल देईल. गुरूंवर श्रद्धा ठेवाच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची चित्तशुद्धी होईल. ग्रासलेलं एखादं ग्रहण जाईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ८ ते १० हे दिवस विशिष्ट शत्रुत्व शमवणारे. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार गाठीभेटींतून शुभलक्षणी. घरात कुणाचा तरी विवाह ठरण्याची शक्यता.

गुरुकृपेचा वर्षाव होईल

मकर : आजची पौर्णिमा गुरुकृपेचा वर्षाव करणारीच. मौनात राहून आनंद घ्या. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-शुक्राचा शुभयोग पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात खुल जा सिम सिम करणारा! अर्थातच, अमोल ठेवा प्राप्त होईल. नोकरी तसंच व्यावसायिक क्षेत्रात मोठे लाभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना लॉटरी योग.

नामवंतांचा सहवास लाभेल

कुंभ : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात राशीतील शुक्रभ्रमण आपलं एक पॅकेज पूर्ण करणार आहे. तरुणांनो, अवश्‍य लाभ घ्या. काहींना शेअर बाजारातून लाभ. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती सेलिब्रिटींचा सहवास अनुभवतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणात यश. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशातला व्हिसा मिळेल.

पूर्वसंचितातून यश मिळेल

मीन : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात सुरू होणारा हा सप्ताह नोकरी-व्यवसायामध्ये काही उत्तम संकेत देणारा, एखादी मनीषा पूर्ण करणारा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना पूर्वसंचितातून रसद पुरवली जाईल. ता. ८ ते १० हे दिवस जनसंपर्कातून छानच. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा पुत्रोत्कर्षाची. गुरुवारची संकष्टी आयुष्यावरची दुष्ट छाया घालवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT