व्यावसायिक पतप्रतिष्ठा मिळेल
मेष : सप्ताह शुक्रभ्रमणातूनच चांगला कालखंड निर्माण करेल. सप्ताह विवाहेच्छूंना पर्वणीचा, भरणी नक्षत्राच्या तरुणांनी ऑनलाइन चॅटिंग करावेच. ता. १० व ११ हे दिवस आपल्या राशीस एकूणच उत्साही राहतील. मात्र सप्ताहात अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना प्रवासात जपावे लागेल. वेंधळेपणा टाळावा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी आजचा रविवार ग्रहयोगातून हाय व्होल्टेजचा. वाहने सांभाळा. विजयादशमी व्यावसायिक पतप्रतिष्ठा देणारी.
विजयादशमी आनंदाची ठरेल
वृषभ : ता. ७ व ८ हे दिवस गुरुभ्रमणातून चांगला कालखंड असेल. तरुणांना मोठ्या सुवार्तांतून थक्क करणारे दिवस. विशिष्ट ध्येयपूर्तीचा आनंद. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मानसन्मानातून लाभ होतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना विजयादशमी मोठी आनंदाची जाईल. घरात तरुणवर्गाचे भाग्योदय. उद्याची ललिता पंचमी वैवाहिक जीवनातून विचित्र रुसण्या-फुगव्याची ठरू शकते. थट्टामस्करी सांभाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार लॉटरीचा ठरेल.
वेदनायुक्त व्याधींचा त्रास होईल
मिथुन : सप्ताह तरुणांना उत्तमच राहील. कलाकारांची मोठी विजयादशमी साजरी होईल. ता. १० व ११ हे दिवस पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी नावीन्यपूर्ण फळे देतील. व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल. बाकी सप्ताह वेदनायुक्त व्याधींतून कटकटीचा. सप्ताहाची सुरवात मृग नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र जागरण घडवेल. विशिष्ट नुकसानीचं भय सतावेल.
सरकारी मदत मिळेल
कर्क : विजयादशमीकडे नेणारा सप्ताह नावीन्यपूर्ण असाच राहील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण मोठे मजेशीर ठरेल. चांगला कालखंड. व्यावसायिक नुकसानीचं भय जाईल. विशिष्ट सरकारी मदत मिळेल. बाकी सप्ताहात हातापायाच्या दुखापती जपाव्यात. खेळाडूंनी जपावं. पुनर्वसु नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहात परदेशी नोकरीचा लाभ. पंचमी घरात सुवार्तांची.
परिस्थितीजन्य लाभ होतील
सिंह : सप्ताहात बुध, गुरु शुभयोगाचं एक पॅकेज राहील आणि त्याचा शुक्रभ्रमण उत्तम मंगळाच्या साथीतून उत्तम लाभ करून देईल. शिक्षण, नोकरी आणि विवाह आदी माध्यमांतून जबरदस्त क्लिक होणारे ग्रहमान. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा वाव देणारे ग्रहमान आहे. ता. ७ आणि ८ हे दिवस मोठे परिस्थितीजन्य लाभ देतील. मात्र सप्ताहाच्या शेवटी मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी अन्नपाण्यातील संसर्गपासून जपावे.
मोठे करारमदार होतील
कन्या : सप्ताह मंगळ भ्रमणातून हाय व्होल्टेजचा. तरुणांनी मस्ती टाळावी. हातापायाच्या दुखापती सांभाळाव्या. बाकी सप्ताहातील शुक्रभ्रमण आणि बुध, गुरु यांचा शुभयोग. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा भाव चांगलाच वाढवेल. व्यावसायिक मोठे करारमदार संपन्न होतील. ता. १० व ११ हे दिवस आपल्या राशीस एकूणच आर्थिक ओघ ठेवतील. उद्याची ललिता पंचमी भाग्यबीजेच पेरणारी. नवपरिणितांचे प्रश्न सुटतील. विवाह ठरेल.
परस्परविरोधी ग्रहमानाचा कालखंड
तूळ : राशीचे शुक्रभ्रमण ग्रहांचा पट ताब्यात घेईल. ता. ७ व ८ हे दिवस मोठी मजेदार फळे देतील. व्यावसायिक उत्सव, प्रदर्शने गाजतील. काहींना विशिष्ट सन्मान चकित करतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठे परस्परविरोधी ग्रहमान राहील. सप्ताहात जुनाट व्याधी सांभाळाच. बाकी सप्ताहात तरुणांना उत्तम नोकरीच्या संधी येतील.
संकटकाळात मदत मिळेल
वृश्चिक : बुद्धिजीवी मंडळींना विजयादशमीचा सप्ताह मानमरातब देणारा. उद्याची ललिता पंचमी अतिशय हृद्य राहील. एकूणच ता. ७ आणि ८ हे दिवस रोजनिशीत नोंदवण्यासारखेच किंवा फेसबुक गाजवतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी संकटकालीन मदत मिळेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पती वा पत्नीच्या भाग्योदयातून विजयादशमी साजरी करता येईल.
आरोप-प्रत्यारोप टाळाच
धनू : सप्ताहात मोठे परस्परविरोधी ग्रहमान. शुक्रभ्रमणातून लाभ होतील. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. वादग्रस्त खरेदी-विक्रीचे विशिष्ट व्यवहार संपन्न होतील. बाकी सप्ताहात नोकरीतील राजकारण सांभाळा. उत्तराषाढा नक्षत्रास मंगळाचे हाय व्होल्टेज सतावेल. आरोप-प्रत्यारोप टाळाच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी श्वानदंशापासून सांभाळावे.
ओळखी-मध्यस्थींचा लाभ होईल
मकर : यंदाचा हा विजयादशमीचा सप्ताह गाजवणारच आहात. सप्ताहात शुभग्रहांची लॉबी जबरदस्त कार्यरत राहील. तरुणवर्ग अतिशय खुशीत राहील. व्यावसायिक आर्थिक ओघ राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ व ८ हे दिवस शुभग्रहांच्या पॅकेजमधून लाभ देतील. निर्णायक क्षणी ओळखी, मध्यस्थी क्लिक होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मानसन्मानाचे योग आहेत, मात्र उष्माघातापासून सांभाळा.
थोरामोठ्यांचा सहवास लाभेल
कुंभ : ग्रहांचा पट परस्परविरोधी आहे. तरुणांनी उन्माद टाळावा. विजयादशमीजवळ पर्यटनस्थळी सावध. कोणतीही कुसंगत नको. बाकी सप्ताह कलाकारांना सूर गवसून देणारा. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ व ८ हे दिवस मोठे रंगतदार राहतील. थोरामोठ्यांचा सहवास घडेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वसुलीतून लाभ होईल. मात्र सप्ताहात संसर्गजन्य बाधेपासून सावध. कुपथ्यं टाळा. वृद्धांनी सांभाळावे.
कलाकारांना पर्वणीचा कालखंड
मीन : सप्ताहातील बुध, गुरु शुभयोग सप्ताहावर छान अंमल करेल. स्वतंत्र व्यावसायिकांना हा विजयादशमीचा सप्ताह चांगली उमेद देईल. कलाकारांना हा सप्ताह पर्वणीसारखीच राहील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव देणारा सप्ताह. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विजयादशमी मोठ्या मौजमजेची ठरेल. प्रेमिकांचे बिघडले स्वर जुळून येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.