weekly horoscope Sakal
Weekly Horoscope | साप्ताहिक राशी भविष्य

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (३१ मार्च २०२४ ते ६ एप्रिल २०२४)

सप्ताह कायदेशीर बाबींतून निश्चितच जपण्याचा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शनी-मंगळाच्या भ्रमणाच्या पार्श्वभूमीवर एकप्रकारची आचारसंहिता पाळावी लागेल.

सकाळ वृत्तसेवा

आचारसंहिता पाळावी लागेल

मेष : सप्ताह कायदेशीर बाबींतून निश्चितच जपण्याचा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शनी-मंगळाच्या भ्रमणाच्या पार्श्वभूमीवर एकप्रकारची आचारसंहिता पाळावी लागेल. राजकीय व्यक्तींनी सांभाळावं. बाकी ता. १ ते ३ हे दिवस तरुणांची उमेद वाढवतील. काहींना ओळखी-मध्यस्थींतून मोठे लाभ. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना देवदर्शन. शनिवारचा दिवस गाठीभेटींतून सांभाळावा. घरात वाद नकोत.

मित्रमंडळींकडून लाभ होईल

वृषभ : सप्ताहात शनी-मंगळाच्या सहयोगातून उच्च दाब राहील. नोकरीत ताणतणावाचे प्रसंग येऊ शकतात. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी वागण्या-बोलण्यातून पथ्यं पाळावीत. बाकी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठ्या सुवार्तांचा. व्यावसायिक धनवर्षाव होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रमंडळींकडून लाभ होईल. शुक्रवार मोठ्या मौजमजेचा. शनिवारी गर्दीच्या ठिकाणी जपा. कुसंगत नको. गुंडांशी वाद नकोत.

करार व गाठीभेटी होतील

मिथुन : सप्ताहात ता. २ च्या अष्टमीचं प्रभावक्षेत्र शुभ ग्रहांच्या ताब्यातलेच. गाठीभेटी, करारमदार आणि विशिष्ट वैयक्तिक भाग्योदयातून ही अष्टमी प्रसन्न ठेवेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती येईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या विवाहाचा मार्ग मोकळा होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठा जल्लोषाचा. शुक्रवार परदेशस्थ मुलांच्या भाग्योदयाचा.

नोकरीच्या मुलाखतीत यश

कर्क : सप्ताह शनी-मंगळाच्या पार्श्वभूमीवर अतिशय दखलपात्र. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक या त्रिघटकांतून कोणतीही अरेरावी नको. बाकी होतकरू तरुणांना ता. २ ते ४ हे दिवस उत्तम मार्ग दाखवणारे. नोकरीच्या मुलाखतींतून यश. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उपक्रमांतून यश. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र शत्रू पीडेचा. सार्वजनिक बाबींत लक्ष घालू नका.

तरुणांच्या समस्या सुटतील

सिंह : सप्ताहात ता. १ ते ४ हे दिवस उत्तम प्रवाही राहतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना अष्टमीच्या प्रभावक्षेत्रात उत्तम गुरुबळ राहील. नोकरीत वरिष्ठांची कृपा संपादन होईल. घरातील तरुणवर्गाचे मोठे प्रश्न सुटतील. मात्र सप्ताहात सरकारी कायदेकानू पाळाच. शनिवारी घरात वादंग नको. पती वा पत्नीशी अजिबात वाद नकोत. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी भाजणं, कापणं यापासून काळजी घ्यावी.

नोकरीत पगारवाढ होईल

कन्या : सप्ताहातील ग्रहमान अडखळत नेणारं. शेजारीपाजारी विचित्र घटना घडू शकतात. बाकी उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ ते ४ हे दिवस घरातील प्रिय व्यक्तींच्या चिंता घालवणारे. नोकरीत पगारवाढ होईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक वसुली होईल. ता. ६ एप्रिलचा शनिवार एकूणच आपल्या राशीस गाठीभेटींतून बेरंगाचा. मित्रांशी वाद नकोतच.

घरातील वृद्धांची काळजी घ्यावी

तुळ : सप्ताहात ग्रहांचं फिल्ड विशेषतः तरुणांना गुरुभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर छानच राहील. ता. १ ते ४ हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींतून यश देणारं. नोकरीतील विरोध मावळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमातून साथ देणारं. मात्र सप्ताहात घरातील वृद्धांची काळजी घ्यावी. शनिवार विचित्र घटनांची शक्यता.

वैवाहिक जीवनात सुवार्ता

वृश्चिक : शनी-मंगळाच्या सहयोगाचं फिल्ड नैसर्गिक साथ न देणारं. कसल्याही प्रकारचा आग्रह टाळा. सार्वजनिक जीवन सांभाळा. बाकी सप्ताहात शुक्रभ्रमणाची विशिष्ट स्थिती, अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवन सुवार्तांतून बोलेल. सप्ताहारंभ अर्थातच मंगळवारची अष्टमी जल्लोषाची. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आजची रविवार संध्याकाळ मोठ्या मौजमजेची. गुरुवारी नोकरीत भाग्योदय. शनिवारी भांडणं नकोत.

अडलेली सरकारी कामं होतील

धनु : सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना मोठी साथ देणारा. अडलेली सरकारी कामं होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह वैयक्तिक उपक्रमांतून उत्तमच राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ ते ४ हे दिवस घरगुती पार्श्वभूमीवर मोठे प्रसन्न ठेवतील. मात्र सप्ताहात खरेदी करताना जपा. शनिवारी नुकसानीचं भय सतावेल. काहींना शारीरिक वेदनेतून त्रास होण्याची शक्यता.

मौल्यवान वस्तू सांभाळा

मकर : व्यावसायिक उधार-उसनवारी सांभाळा. फसवणुकीचे प्रसंग येऊ शकतात. बाकी धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी एप्रिल फूलपासून सावध. बाकी श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ४ चा गुरुवार भाग्योदयाचा. तरुणांना उत्तम नोकरीचा लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवारी प्रेमप्रकरण फुलवेल. काहींना ओळखीतून विवाहस्थळं येतील. मात्र शनिवार एकूणच आपल्या राशीस मोठ्या दगदगीचा. मौल्यवान वस्तू सांभाळा.

कला व छंदातून प्रसिद्धी

कुंभ : राशीतील शनी-मंगळाचा उच्च दाब राहील. सार्वजनिक जीवन सांभाळा. नोकरीतल्या राजकारणात पडू नका. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी गुरू-शुक्राची छान कनेक्टिव्हिटी राहील. घरातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय होतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून झगमगाटच करवेल. मात्र शनिवारी संताप टाळा.

व्यवसायात प्राप्ती वाढेल

मीन : राशीतील शुक्रभ्रमण आजच्या रविवारी रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना जाता-जाता उत्तम फलदायी होईल. व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. ता. १ ते ४ हे दिवस एकूणच शुभ ग्रहांच्या साथसंगतीचे. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून प्रसन्नता लाभेल. नोकरीतील घटना प्रसन्न ठेवतील. मात्र सप्ताहाच्या शेवटी चोरी-नुकसानीचे प्रसंग येऊ शकतात. काहींना अग्निभय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT