मेष : ग्रहांचं फिल्ड संमिश्र स्वरूपाची फळं देईल. काही बाबतीत नैसर्गिक पाठबळ मिळणार नाही. महत्त्वाची कामं रेंगाळतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आरोग्यविषयक तक्रारी उद्भवून अडथळे येतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस शुभग्रहांच्या लॉबीतून फळं देतील. वैयक्तिक मोठे भाग्योदय होतील. घरात पती वा पत्नीचा भाग्योदयही साजरा कराल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार नोकरीविषयक छान मुलाखतींचा.
वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील मंगळ हर्षल योगाचं फिल्ड दुखापतींपासून जपण्याचं. सप्ताहात ता. १७ व १८ हे दिवस महत्त्वाच्या कामातून उत्तम संगतीचे असतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी मध्यस्थीतून मोठे लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठी भाग्यबीजं पेरणारा. व्यावसायिक जाहिराती यशस्वी होतील. तरुणांचे विशिष्ट स्पर्धात्मक यशातून जीवन मार्गस्थ होईल. भावाबहिणींचा उत्कर्ष होईल.
मिथुन : सप्ताह विशिष्ट कायदेशीर प्रश्नातून त्रास देणारा. विशिष्ट गुप्तचिंता सतावेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना चोरी, नुकसानीचे प्रसंग येतील. बाकी सप्ताह व्यावसायिकदृष्ट्या आर्थिक ओघ ठेवेलच. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार नोकरीतील ताण घालवेल. सप्ताहाचा शेवट मौजमजेचा व पुनवर्सु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह तीर्थाटनाचा. ता. १९ चा शुक्रवार घरात सुवार्तांचा ठरेल.
कर्क : सप्ताह शुभग्रहांच्या लॉबीतून प्रभाव टाकणारा राहील. सुरवातीस अष्टमीचा मोठा अंमल राहील. प्रसन्न गाठीभेटी होतील. पुष्य नक्षत्रास बलवत्तर विवाहयोग आहेतच. कलाकारांना मोठे घवघवीत यश मिळेल. ता. १७ जुलैची एकादशी संध्याकाळी मोठी भावसंपन्न राहील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारचा सूर्योदय मोठी भाग्यलक्षणे दाखवेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात घरातील लहान मुलांकडं लक्ष द्यावं.
सिंह : सप्ताहातील मंगळ-हर्षल युती योगाची पार्श्वभूमी सार्वजनिक जीवनातून बेरंग करणारी. क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाव्या. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना हितशत्रूंपासून त्रास होऊ शकतो. व्यावसायिक जुगार टाळावा. पूर्वा नक्षत्रास ता. १७ ते १९ हे दिवस मोठे गतिमान राहतील. थोरामोठ्यांच्या सहकार्यातून लाभ होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात नोकरीचा लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार गुप्तचिंता घालवणारा.
कन्या : सप्ताहात शुभग्रहांची लॉबी कार्यरत राहीलच. हातापायांच्या दुखापतींपासून सावध. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मातृपितृ चिंता सतावेल. सप्ताह व्यावसायिक पार्श्वभूमीवर छान संगतीचा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार धनवर्षावाचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ ते १९ हे दिवस शैलीदार फलंदाजीचे. गाठीभेटी यशस्वी होतील. नोकरीच्या मुलाखतीतून प्रभाव टाकाल. वैवाहिक जीवनात प्रेमळ संवाद.
तूळ : सप्ताहात नैसर्गिक पाठबळ कमी मिळेल. तरुणांनी यंत्रं, वाहनं सांभाळावीत. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र दुखापतींचे प्रसंग संभवतात. बाकी सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांना उपक्रमातून मोठे लाभ होतील. सोमवार नोकरीत सुवार्तांचा असेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना मानसन्मानातून सुखद धक्का देणारा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ चा शुक्रवार कला, छंद उपक्रमांतून मोठा यशदायी ठरेल. सरकारी कामं होतील.
वृश्चिक : अष्टमीच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना भाग्यलक्षणंच दाखवेल. ता. १६ ते १९ हे दिवस तरुणांची उमेद वाढवतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ जुलैची एकादशी मोठी अजून फळं देईल. व्यावसायिक क्षेत्रात अचानक धनलाभ होतील. तरुणांना उत्तम विवाहस्थळं येतील, विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात वैयक्तिक जीवनातील क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाव्या. गर्भवतींनी पथ्ये पाळावीत.
धनू : सप्ताह मंगळ-हर्षल योगातून हाय व्होल्टेजचा राहू शकतो. भाजण्या-कापण्यापासून सावध राहा. स्त्रीवर्गानं जपावं. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती ग्रहयोगातून लक्ष्य होऊ शकतात. स्त्री वर्गास नैराश्यजनक विचारांचा त्रास होऊ शकतो. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट सुखदायक राहील. नोकरीतून सुवार्ता देणारा कालखंड. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक वसुली होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार सुवार्तांतून प्रसन्नतेचा.
मकर : अष्टमीच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह राशीस शुभग्रहांच्या माध्यमातून फलदायीचा होईल. तरुणांचं एक यशस्वी पर्व सुरू होईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ ते १९ हे दिवस जीवनातील माधुर्य निश्चितच वाढवतील. नवपरिणितांना गुरुवार आणि शुक्रवार सुवार्तांचेच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठ्या आदर-सत्कारातून धन्यता देईल. उत्तराषाढा व्यक्तींनी अनन्नपाण्यातील संसर्गापासून जपावं.
कुंभ : सप्ताहातील मंगळ-हर्षल युती योगाचं फिल्ड आणि राशीतील शनी भ्रमण नैसर्गिक पाठबळ देणार नाहीत. वादग्रस्त गाठीभेटी टाळाच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सर्व आचारसंहिता पाळण्याची गरज आहे. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ व १९ हे दिवस घरातील सुवार्तांतून छान मानसिक पर्यावरण ठेवतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात सरकारी कायदेकानून पाळावेत. पोलिसांशी हुज्जत घालू नये.
मीन : अष्टमीच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह शुभग्रहांचाच. ता. १७ व १९ हे पूर्वसुकृत फळाला आणतील. गुरुवार गुरुकृपेचाच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना साधनेचं फळ मिळेल. होतकरू तरुणांची प्रतीक्षा संपेल. काहींना व्यावसायिक पतप्रतिष्ठेचा लाभ. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची घरातील भावस्पंदनं ता. १७ च्या एकादशीच्या प्रभावात अतिशय पवित्र राहतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना साक्षात्कार होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.