10 best treks of India in November 2021 : हिवाळ्यात ट्रेकिंगची मजा वेगळीच असते. हिमालयाच्या दऱ्यांमध्ये असे अनेक अद्भुत ट्रेकिंग स्पॉट्स आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्हालाही थंडीच्या ऋतूमध्ये अशा ठिकाणी फिरायचे असेल, तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही त्याचे नियोजन करू शकता. हिवाळ्याच्या मोसमात हे ट्रेकिंग फिल्ड पूर्णपणे बदलतात. तुम्हाला आजूबाजूला फक्त बर्फाच्छादित पर्वत आणि हिमनद्यांचं आश्चर्यकारक दर्शन घडेल.
दायरा बुग्याल - आजवर फार कमी लोकांनी दायरा बुग्याल ट्रेक पाहिला असेल. हा ट्रेक उत्तराखंडमधील रैथलमध्ये गंगोत्रीच्या प्रदेशात येतो. दायरा बुग्यालचा नजारा पाहून तुमच्या हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहणार नाहीत. येथे ट्रेकिंग करणे तसं कठीण काम नाही, त्यामुळे तुम्ही कुटुंबासह याचा आनंद घेऊ शकता. देवरिया ताल(Dayara Bugyal) -चंद्रशिला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडणाऱ्या लोकांना देवरिया ताल-चंद्रशिला ट्रेक खूप आवडतो. जर तुम्ही यापूर्वी कधीही ट्रेक केला नसेल आणि हिमालयातील ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर यापेक्षा चांगली जागा नाही. हे ठिकाण हिमालयाच्या पर्वतराजीत येत नाही. देवरिया ताल-चंद्रशिला उत्तराखंडमध्ये येते.
कुआरी पास ट्रेक(Kuari Pass Trek)- प्रत्येक ट्रेकमधून तुम्हाला नंदा देवी पर्वत संपूर्णपणे पाहण्याची संधी मिळणार नाही, जो भारतातील सर्वोच्च पर्वतांपैकी एक आहे. पण कुआरी पास ट्रेक तुम्हाला ही संधी देतो. येथून तुम्ही द्रोणागिरी पर्वत आणि एलिफंट पर्वताचे विहंगम दृश्य देखील पाहू शकता. कुआरी पास ट्रेक जोशीमठ, उत्तराखंड येथे आहे.केदारकंठा(kedarkantha)- केदारकांठा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध ट्रेक आहे जिथे हिवाळ्यात बरेच पर्यटक जातात. हिवाळ्याच्या हंगामात इकडचे मार्ग संपूर्ण बर्फाने व्यापतात. नोव्हेंबरमध्ये हिवाळ्यात येथे गर्दी खूप वाढते. सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर हा ट्रेकिंगसाठी उत्तम काळ आहे. हा ट्रेक उत्तरकाशी येथे आहे.
हर की दून(Har ki Doon) - कोटगाव, उत्तराखंडमधील हर की दून ट्रेक आतापर्यंत फार कमी लोकांनी एक्सप्लोर केला आहे. या भागात तुम्हाला पक्षी आणि प्राणी बघायला मिळतील. येथे तुम्हाला माकडाची एक खास प्रजातीही पाहायला मिळेल आणि काळे हरण मिळण्याचीही शक्यता आहे. याशिवाय तुम्हाला येथे अस्वल आणि बारशिंग्यासारखे प्राणीही पाहायला मिळतील. हे ठिकाण सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे.संदकफू ट्रेक (Sandakphu)- संदकफू ट्रेक पश्चिम बंगालच्या जौभरी येथे आहे. येथून तुम्ही जगातील चार सर्वोच्च शिखरं (माऊंट एव्हरेस्ट, मकालू, माउंट कांचनजंगा आणि माऊंट ल्होत्से) पाहू शकता. येथे ट्रेकिंग करताना सिंगलिला नॅशनल पार्कच्या जंगलांचाही आनंद लुटता येईल.गौमुख तपोवन(Gaumukh Tapovan ) - हा अद्भुत ट्रेक तुम्हाला गंगा नदीचे उगमस्थान असलेल्या गायमुख ग्लेशियरवर घेऊन जातो. इतकंच नाही तर हा ट्रेक तुम्हाला शिवलिंग पर्वताच्या जवळच्या भागात घेऊन जातो, जिथे तुम्ही पायथ्यापासून शिखरापर्यंत पर्वत पूर्णपणे पाहू शकता. तपोवनातून तुम्हाला मेरू पर्वताचे सुंदर दृश्यही पाहायला मिळेल. हे ठिकाण उत्तराखंडमधील गंगोत्री येथे आहे.गिदारा बुग्याल(Gidara Bugyal) - गिदारा बुग्याल हे एक उत्तम ट्रेकिंग सर्कल आहे. या भागात तुम्हाला उंचीवरील सर्वात मोठे गवताळ प्रदेश पाहायला मिळतील. त्याची मैदाने बुग्यालपेक्षा मोठी आहेत. या ठिकाणी ट्रेकिंगबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही येथे कॅम्पिंगसोबतच ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता. हा ट्रेक उत्तराखंडमधील भंगेली येथे आहे.बुरान व्हॅली(Buran Ghati)- बर्फाचा हंगाम संपल्यानंतर बहुतेक प्रवासी बुरान व्हॅलीकडे जातात. पण ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतरही लोक तेथील ट्रेकिंग पॉईंटला भेट देतात. या दरम्यान येथील घनदाट जंगल केशरी रंगाने व्यापले जाते. या ठिकाणाचं सौंदर्य इतकं मनमोहक आहे की, इथलं जंगल सोडावंसं वाटणार नाही. हा ट्रेक हिमाचल प्रदेशात आहे.गोएचला(sikkim goechala trek) - सिक्कीमच्या युकसोम प्रदेशात स्थित गोएचलामध्ये अनेक मोठ्या पर्वतांचे दृश्य दिसते. येथून तुम्हाला केवळ कांचनजंगा पर्वतच नाही तर उतरही 14 उंच शिखरांची शिखरेही दिसतील. हे नेपाळमधील सर्वात मोठ्या पर्वतीय ट्रेकच्या अगदी जवळ आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.