सप्टेंबर महिना सुरू झालाय. सप्टेंबर महिना, जो पावसाच्या हलक्या सरीने सुरू होतो, त्यामुळे हा महिना पर्यटकांना खूप आवडतो. या महिन्यात सलग तीन सुट्ट्या देखील आल्या आहेत, ज्याचा आनंद तुम्ही मिनी ट्रिपवर जाऊन घेऊ शकता. त्यामध्ये 10 तारखेला अनंत चतुर्दशीची सुट्टी आहे. 11 सप्टेंबरला या महिन्यातील दुसरा शनिवार आणि 12 तारखेला रविवार आहे. या तीन दिवसाच्या सुट्ट्यांचा आनंद तुम्ही बाहेर फिरायला जाऊन घेऊ शकता. तुम्ही या सप्टेंबरच्या सुट्ट्यांमध्ये या 10 ठिकाणी भेट देऊ शकता.
गोवा: गोवा फिरण्यासाठी सप्टेंबर हा महिना सर्वोत्तम मानला जातो. या दरम्यान, मे-जून महिन्यासारखा उन्हाळा नसतो किंवा ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मुख्य हंगामासारखा नसतो. सप्टेंबरमधील गोव्याचे सौंदर्य वेगळे दिसते. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त, आपण अगुआडा किल्ला, काबो फोर्ट आणि मंगेशी मंदिर यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.पॉन्डिचेरी: जर तुम्हाला समुद्रकिनारी पावसामध्ये भिजायचे असेल तर पॉन्डिचेरीपेक्षा चांगले ठिकाण नाही. पॉन्डिचेरीच्या हिरव्यागार जागेचा शोध घेण्यासाठी सप्टेंबर महिना सर्वोत्तम मानला जातो. आपण फ्रेंच फोर्ट लुई, कीजूर, डुप्लेक्सचा पुतळा, फ्रेंच युद्ध स्मारक आणि जवाहर टॉय संग्रहालय येथे भेट देऊ शकता.कूर्ग: कर्नाटकच्या या सुंदर हिल स्टेशनचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. येथील दृश्ये इतकी सुंदर आहेत की, एकदा त्यांना पाहण्यासाठी येथे यावे असे वाटते. म्हणूनच या ठिकाणाला कधी भारताचे स्कॉटलंड तर कधी कर्नाटकचे काश्मीर असे म्हटले जाते. उटी: तामिळनाडूतील ऊटी हे पर्यटकांमध्ये एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. सप्टेंबर महिन्यात या ठिकाणचे सौंदर्य शिगेला पोहोचले असते. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 2,240 मीटर उंचीवर आहे. हे हॉलीडे डेस्टिनेशन पर्यटकांना हिरवेगार परिसर आणि मोहक चहाच्या बागांचा आनंद घेण्याचे आवाहन करते.
फ्लॉवर व्हॅली (उत्तराखंड): फ्लॉवर व्हॅली हे उत्तराखंडमधील एक अतिशय सुंदर राष्ट्रीय उद्यान आहे. सप्टेंबरमध्ये भेट देण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे. ही दरी जून ते ऑक्टोबर महिन्यांपर्यंत उघडते. यानंतर, वाढत्या थंडीमुळे ही दरी बर्फाच्या चादरीने झाकली जाते. मान्सूनच्या पावसानंतर येथे फुले पूर्ण फुलतात. खोऱ्यात सुमारे 300 प्रकारची अल्पाइन फुले आहेत. याशिवाय, एंजियोस्पर्मच्या 600 प्रजाती आणि टेरीडोफाइट्सच्या सुमारे 30 प्रजाती आहेत.केरळ: जर तुम्ही दक्षिण भारतात कुठेतरी राहत असाल तर तुम्हाला फिरण्यासाठी केरळपेक्षा चांगले ठिकाण सापडणार नाही. जुलै आणि ऑगस्टच्या पावसानंतर सप्टेंबरमध्ये येथील हवामान अतिशय आल्हाददायक होते. भारताच्या दक्षिणेकडील भागात वसलेले हे राज्य शांत पाणवठे, चहाच्या बागा, ऐतिहासिक स्मारके, तलाव, उंच डोंगर आणि वन्यजीव उद्यानांसाठी खूप प्रसिद्ध आहे.उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर शहर देखील सप्टेंबरमध्ये फिरायला पर्यटकांना खूप आवडते. या ठिकाणाला तलावांचे शहर असेही म्हणतात. हे शाही शहर पिचोला सरोवराच्या काठावर वसलेले आहे. सुट्टीच्या दरम्यान, आपण विशेष प्रकारच्या स्थानिक हस्तकला एक्सप्लोर करू शकता. तुम्ही सिटी पॅलेस, लोकसंग्रहालय, विंटेज कार संग्रहालय आणि सहेलियों की बारी येथे भेट देऊ शकता.श्रीनगर: श्रीनगर हे पृथ्वीवरील स्वर्गापेक्षा काही कमी नाही जे सप्टेंबर महिन्यात आणखी आकर्षक बनते. सप्टेंबरमध्ये जास्तीत जास्त लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. हे ठिकाण काश्मीर खोऱ्याच्या मध्यभागी आहे. येथे तुम्ही उंच शिखर, सुंदर दऱ्या, बाग आणि तलाव पाहण्यासाठी जाऊ शकता. श्रीनगर हे पाण्यावर चालणाऱ्या हाऊसबोट (शिकारा) साठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.वाराणसी: उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शहर वाराणसी हे सप्टेंबरमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. शांत घाट आणि अध्यात्म हे वाराणसीच्या आकर्षणाचे केंद्र आहे. अशी रंगीबेरंगी शहर तुम्हाला संपूर्ण जगात कुठेही मिळणार नाही. तुम्ही काशी विश्वनाथ मंदिर, संकट मोचन मंदिर आणि भारत माता मंदिर सारख्या धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता.अमृतसर: पंजाबमधील अमृतसर शहराला सप्टेंबरमध्ये भेट देणे खूप चांगले आहे. अमृतसरचा अर्थ 'अमृत एक पवित्र तलाव' आहे, जो शीख समुदायासाठी एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. भारताच्या बाहेरील भागात असलेल्या अमृतसर शहरात अनेक लोक केवळ सुवर्ण मंदिराला भेट देण्यासाठी जातात. ज्यांना खरेदीची आवड आहे त्यांच्यासाठी हे शहर स्वर्गापेक्षा कमी नाही. भरतकाम केलेली शाल, स्टायलिश शूज, लोकरीची चादरी, लाकडी फर्निचर आणि पारंपारिक दागिने येथे खूप प्रसिद्ध आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.