अफगानिस्तानमधून तब्बल २० वर्षांनी अमेरिकन सैन्य माघारी परतले आणि तालिबान्यांनी देशावर ताबा मिळविला. अफगानिस्तानचे नाव ऐकताच लोकांच्या मनात युध्द आणि हिंसेचे चित्र उभे राहते पण तुम्हाला माहित आहे का? अफगानिस्तानमध्ये अद्भुत नैसर्गिक सौंदर्य देखील पाहायला मिळते. अफगानिस्तानमधील अशा १० ठिकाणांबाबत आपण जाणून घेऊ या....
पामीर माऊंटन : सेंट्रल अशियामध्ये असलेले पामीर माऊंटन्सचे सौंदर्य पाहून मन प्रसन्न होऊन जाते. पामीर माऊंटन हे प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. हिमालय आणि तियान शान, सुलेमान, हिंदू कुश, कुनलुन आणि कराकोरम च्या पर्वत रांगांच्या मध्ये हे पामीर माऊंटन आहे. हा सुंदर माऊंटनवर फिरण्यासाठी जगभारातून पर्यटक येत असतात.बंद-ए-आमीर नॅशनल पार्क- दुर्गम भागात बंद ए आमीर नॅशनल पार्क पर्यंत पोहचणे तसे अवघड आहे. अफगानिस्तामधील बामियान शहरातून येथे सहज पोहचता येते. या नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा( गुरूवार दुपारी आणि शुक्रवारी सकाळी) मिनी व्हॅन जाते. बामियान के बुद्धा : अफगानिस्तामधील हा मध्य भाग म्हणजे ते शहर आहे जिथे बौध्दांचा प्रसार झाला. बामियान के बुद्ध एक मल्टी कल्चरल डेस्टिनेशन आहे. येथे तुम्हाला चिनी, भारतीय, ग्रीक आणि तुर्की परांपरांचे अभिनव संगम पाहायला मिळेल. परंतू शहरात बुद्धांची विशाल प्रतिमा पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
ब्रोघिल पास :
हिंदू कुश आणि बंदख्शां प्रातामधील वाखन जिल्हा पार केल्यावर ब्रोघिल पासचे उंच पर्वतांचे नैसर्गिक सौंदर्य तुमचे स्वागत करते. या पर्वतांवरून तुम्ही सर्व शहराचे दृश्य पाहू शकता. येथील शांत वातावरण आणि हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. तझाकिस्तानवरुन गेल्यावर वाखन कॉरिडोरच्या मार्फत ब्रोघिल पासला जाणे सोपे आहे.मीनार-ए-जाम :
मीनार-ए-जाम ची 65 मीटर ऊंच इमारत पाहून कदाचिक तुम्हाला चक्कर आल्यासारखे होईल. असे म्हटले जाते की, घुरिद साम्राज्यामध्ये ऐतिहासिक काळाता शहरात बननिलेल्या स्मारकांमधील हे एक आहे. ६५ मीटर उंची मीनारवर अद्भुत चित्र रेखाटले आहे. बाग-ए-बाबर : हे ठिकाण अफगानिस्तानची राजधानी काबूलमध्ये आहे. बाग-ए-बाबर ची निर्मिती मुगल सम्राट बाबरद्वारा केली गेली होती.
हेरात नॅशनल म्यूझियम : अफगानिस्तानमधील प्राचीन शहर हेरात मध्ये एक नॅशनल म्यूझियम आहे. हे म्युझियम सुरूवातीला तोडले होते, परंतू नंतर पर्यटकांना अफगानिस्तानच्या इतिहास कळवा यासाठी पुन्हा बांधण्यात आले. लोक आधी याला काला इक्रियारुद्दी किंवा अॅलेक्झेंडर गड म्हणत असे.
दारुल अमन पॅलेस : अफगानिस्तानमध्ये दारुल अमन पॅलेस देखील पर्यंटकांसाठी प्रसिध्द ठिकाण आहे. दारुल अमन पॅलेस चा अर्थ आहे 'शांती निवास'. या महालाची निर्मीत युरोपियन शैलीतून झाली आहे जी आता खराब झाली आहे. या महालाची निर्मिती १९२५मध्ये सूरू केली होती आणइ १९२७मध्ये पुर्ण झाले होते. हा महाल तात्कालीन सम्राट आमीर अमानुल्लाह खान यांनी बनविला होता. हा महाल बनविण्यासाठी अमानुल्लाह खानने जर्मनी आणि फ्रान्स मधून २२ आर्किटेक्ट बोलवले होते. नोशाक माऊंटन : नोशाक पर्वत अफगानिस्तानमध्ये बदख्शा प्रांतमधील वाखन कॉरीडॉर येथील सुंदर पर्यटनस्थळ आहे. नोशाक माऊंटन हे अफगानिस्तान मधील सर्वांत उंच पर्वत आहे. हे हिंदू कुश पर्वत रांगामधील दुसरी सर्वांत उंच पर्वत असून याची उंची साधारण २४००० फुट आहे.ब्लू मॉस्क्यू : अफगानिस्तानची ब्लू मॉस्क्यू म्हणजे मस्जिद हे धार्मिक स्थळ पर्यटांकामध्ये अत्यंत प्रसिध्द आहे. संगमरवरपासून बनवलेली मस्जिद पाढंऱ्या खोल्या दिसतात. हे मस्जिद उत्तरी अफगानिस्तामध्ये असून याला हजरत अली मजार देखील म्हंटले जाते. ऐसा कहते है हजरत अली यांचे शरीर या मस्जिदमध्ये दफन केले आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.