10 Rules which going to change Sakal
Rules That Will Change From April 1st, 2022 : 1 एप्रिल 2022 पासून अनेक नियमांत म होणार आहेत. या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. पुढील महिन्यात जीएसटी, एफडी, बँका, कर तसेच इतर नियमांमध्ये बदल होणार आहेत. 1 एप्रिलपासून बदलणाऱ्या महत्त्वाच्या 10 नियमांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
1. पीएफ (PF) खात्यावर कर- केंद्र सरकार १ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू करणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून सध्याचे पीएफ खाते (PF Account) दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते, ज्यावर कर देखील आकारला जाईल. नियमांनुसार, ईपीएफ (EPF) खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त मर्यादा लागू केली जात आहे. याच्यापुढील योगदानावरील व्याजाच्या उत्पन्नावर कर आकारला जाईल. त्याचवेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये (GPF) करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे.
2. पोस्ट ऑफिस नियम- पोस्ट ऑफिसच्या (Post Office) स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये (Small Savings Schemes)गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यामध्ये मिळतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. बचत खाते लिंक केल्यावर, व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रान्सफर केले जातील. सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट खात्यांच्या बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे अनिवार्य केले आहे.
3. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे नियम- १ एप्रिलपासूनं म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे चेक, बँक ड्राफ्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे करता येणार नाहीत. वास्तविक, म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन एग्रीगेशन पोर्टल MF युटिलिटीज (MFU) 31 मार्च 2022 पासून चेक-डीडी इत्यादीद्वारे पेमेंट सुविधा बंद करणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फक्त UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे द्यावे लागतील.
4. अॅक्सिस बँक आणि PNBच्या नियमांमध्ये बदल- १ एप्रिल २०२२ पासून अॅक्सिस बँकेच्या पगार किंवा बचत खात्याचे नियम बदलणार आहेत. बँकेने बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा 10 हजारांवरून 12 हजार रुपये केली आहे. अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने मोफत रोख व्यवहारांची विहित मर्यादा देखील बदलून चार फ्री ट्रांजेक्शन किंवा 1.5 लाख रुपये केले आहे. त्याचवेळी पंजाब नॅशनल बँक एप्रिलमध्ये PPS लागू करत आहे. 4 एप्रिलपासून 10 लाख आणि त्यावरील धनादेशांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.
5. GSTचे सोपे नियम- CBIC (Central Board of Indirect Taxes and Customs) ने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-इनव्हॉइस जारी करण्याची उलाढाल मर्यादा 50 कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून 20 कोटी रुपये केली आहे. हा नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू केला जात आहे.
6. गॅस सिलेंडरची किंमत वाढू शकते- दर महिन्याप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या दिवशीही गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. सध्या पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढत आहेत, अशा परिस्थितीत एप्रिलमध्ये पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
7. औषधांवर जास्त खर्च होईल- १ एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. ड्रग प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाने शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे, त्यानंतर आता 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढतील.
8. 1 एप्रिलपासून घर खरेदी करणाऱ्यांना धक्का- 1 एप्रिल 2022 पासून, केंद्र सरकार प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना कलम 80EEA अंतर्गत कर सवलतीचा लाभ देणे बंद करणार आहे. 2019-20 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने 45 लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करणाऱ्यांना गृहकर्जावर अतिरिक्त ₹ 1.50 लाख आयकर लाभ देण्याची घोषणा केली होती. नंतर ही सुविधा 2020 आणि 2021 च्या अर्थसंकल्पात वाढवण्यात आली होती, परंतु यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्ष 2022-23 पासून ही सुविधा वाढवण्यात आली नाही.
9. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष FD बंद- कोविड-19 महामारीच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष FD योजना सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक लाभ मिळत आहेत. मात्र, आता काही बँका ही योजना बंद करू शकतात. वास्तविक, एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही विशेष योजना दोन वर्षांसाठी संपुष्टात आणू शकतात कारण या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना वाढवण्याची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत या दोन बँका विशेष एफडी योजना बंद करू शकतात, असे मानले जात आहे.
10. १ एप्रिलपासून क्रिप्टोकरन्सी नियमांवरील कराचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्व व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट (व्हीडीए) किंवा क्रिप्टो अॅसेट्वर 30 टक्के कर लावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.