कंपनीला जाणून घ्या
मुलाखतीला जाण्यापूर्वी तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की, ज्या कंपनीसाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या कंपनीबद्दल तुमच्याकडे बेसिक माहिती आहे की नाही. जसे की त्या कंपनीची स्थापना कधी झाली? त्याचे संस्थापक कोण आहेत? कंपनी काय बनवते? आणि तिची वाढ कशी होते? इंटरनेटवर या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आरामात मिळवू शकता. अनेकदा मुलाखत घेणारा हा प्रश्न विचारतो, आपण ज्या कंपनीत येत आहात. त्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे हे त्यांना जाणून घ्यायचे असते. म्हणूनच तुम्ही ही माहिती मुलाखतीला जाण्याआधीच तयार करा, म्हणजे तुमची बाजू भक्कम होईल.
परवानगीशिवाय आत जाऊ नका
अनेकदा असं दिसून येतं की, तुमचं नाव पुकारलं की तुम्ही थेट आत प्रवेश करता. कारण तुम्हाला वाटतं की आता मला बोलावलं गेलंय, तर ते चुकीचं आहे. आत जाण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्या आणि मगच आत जा. याशिवाय मुलाखतकार तुम्हाला सांगेल तेव्हाच खुर्चीवर बसा आणि जेव्हा तो तुम्हाला बसायला सांगतो, तेव्हा तुम्ही 'थँक यू सर / मॅम' म्हणायलाच हवे. त्यामुळे तुमचे मॅनर्स दिसतात.
नॉर्मल आणि फॉर्मल कपडे परीधान करा
आपण स्वतःला कसे 'कॅरी' करतो यावर आपल्या 'पर्सनॅलिटीचे रिफ्लेक्शन' (personality reflection) अवलंबून असते . मुलाखतीत आपण चांगले कपडे घालावेत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण त्यांची योग्य निवड करणे कठीण असल्याने काही वेळा गणित बिघडू शकते. तुमचे कपडे कंफर्टेबल आणि फॉर्मल असावे. भडक रंगाचे कपडे परिधान करणं टाळा. आपले बूट पॉलिश केलेले आहेत , टाय स्वच्छ नीट बांधलेली आहे आणि कपडे स्वच्छ आहेत. या बाबींकडे विशेष लक्ष द्या त्यामुळे खूप फरक पडतो.
बॉडी लॅंग्वेजवर लक्ष ठेवा
आपल्या बॉडी लॅंग्वेजची (शारीरिक हालचाल) काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. परिचय करून देताना सर्वप्रथम एकमेकांशी खंबीरपणे हॅन्डशेक (हात मिळवा) करा आणि अशा वेळी तुमच्या शारीरिक हालचालींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.परिचय करून देताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघा आणि आजूबाजूला नको. तुमचा चेहरा सामोरच्या बाजूला असावा. आपल्या चेहऱ्यावर थोडेसे स्मित असले तर उत्तमचं !
संवादकांच्या मते, सुमारे ५० टक्के संदेश आपल्या शारीरिक हालचालींवरून समोरच्या व्यक्तीकडे जातात, त्यामुळे मुलाखतीला जाताना त्याची तयारी काही दिवस आधीच करणे फायद्याचे ठरेल
पाण्याची बाटली सोबत ठेवा
जेव्हा तुम्ही खूप जास्त चिंतेत असता तेंव्हा त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होतो . अशावेळी एखादा पाण्याचा घोट पिल्याने तुम्हाला बरे वाटू शकते. आवश्यक तेवढंच बोला:
बऱ्याचदा असं दिसून येतं की मुलाखत घेणारा एखादा प्रश्न विचारतो तेव्हा त्या क्षेत्राची माहिती असेल तर तुम्ही त्याला खूप जास्त उत्तरं द्यायला सुरुवात करता. असं करणं टाळा, मुलाखतदाराला फक्त योग्य तेच ऐकायचं असतं आणि तुमचं बोलणं त्यावेळी त्याला अरसिक वाटेल. आवश्यक तेवढंच बोला त्यापेक्षा जास्त बोलू नका.
रेझ्युमेवर खोटं बोलू नका
याकडे लोकं दुर्लक्ष करतात परंतु याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सहसा, आपण एखाद्याच्या रेझ्युमेची नक्कल करतो किंवा आपल्या रेझ्युमेमध्ये असे काहीतरी लिहितो जे आपण कधीही केले नाही आणि त्यानंतर, जेव्हा मुलाखतकार त्याबाबतीत विचारतो तेव्हा आपण उत्तर देऊ शकत नाही. म्हणूनच रेझ्युमेचा पूर्ण अभ्यास करून आपण काय लिहिले आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे आपणांस ज्ञात असावे. विशेषत: तुमची ध्येये आणि तुमचे छंद. शिवाय नेहमी रेझ्युमेच्या तीन प्रती घ्या. अनेक वेळा मुलाखत घेणारे एकापेक्षा जास्त जण असतात, त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येकाला एक प्रत दिली तर त्यांना ते सोपे जाईल आणि तुमच्या या तयारीवर ते खूशही होतील.आत्मविश्वास बाळगा
मुलाखतीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास,जो तुमच्या हावभावांत आणि डोळ्यांत दिसतो. आपण बसलेले असताना, आपण घाबरतोय असे वाटायला नको . तुमच्याकडे आत्मविश्वास नसला तरी मुलाखतीपुरता उसणा घ्यायला हरकत नाही. कारण तो आत्मविश्वासच आपल्याला आपल्या स्वप्नातील नोकरीपर्यंत पोहोचवू शकतो.
पगारावर बोलताना नियंत्रण ठेवा:
जर तुमची निवड झाली असेल आणि ते तुमच्याशी पगाराबद्दल बोलत असतील, तर ऐनवेळी तिथे कमीजास्त करू नका. तुम्हाला किती पैसे घ्यायचे आहेत हे आधीच ठरवा आणि मगच उत्तर द्या. अनेक वेळा मुलाखत घेणारा जास्त विचार करत असतो आणि कमी बोललात तर तुमचं नुकसान होतं.
आपला वेळ घ्या:
मुलाखतीच्या वेळी तुम्ही तुमचा सगळा वेळ घेऊन कोणत्याही प्रश्नाचे थेट उत्तर देण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा. उत्तर देताना काही सेकंद विचार करणे ही नकारात्मक गोष्ट नसून, ती योग्य उत्तर देण्याची तुमची क्षमता मानली जाईल. यामुळे आपल्या आत्मविश्वासात भर पडेल आणि आपल्या उत्तरावर आपले नियंत्रण देखील असेल.
मुलाखत ही एक कला आहे ज्यामध्ये आपल्याला प्रभुत्व मिळवावे लागते. या काळात तुम्ही मनात एक गोष्ट बसवली की, तुम्ही मुलाखत द्यायला नाही, तर फक्त थोडं बोलायला आला आहात, ज्यामध्ये तुम्हाला अधिक चांगल्यापद्धतीने बोलायचं आहे आणि निघून जायचंय अशा थॉट प्रोसेसमुळे मुलाखतीची भीती तुमच्या मनातून निघून जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.