Unknown Facts about Hotel Taj SAKAL
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gate Way of India) दिमाखात उभं असलेलं हॉटेल ताज महाल पॅलेस (Hotel Taj Mahal Palace ) हे फक्त भारतातच (India) नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. 1903 मध्ये सुरु झालेलं हे हॉटेल अनेक अर्थांनी खास आहे. त्यामुळेच फाईव्ह स्टार हॉटेल (Five Star Hotel) म्हटले की हॉटेल ताज महाल नजरेसमोर येते. आज आपण हॉटेल ताजबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या खूप कमी जणांना माहिती आहेत.(Unknown Facts about Hotel Taj)
1.1903 मध्ये मुंबईत सुरु झालेलं हॉटेल ताज महाल भारतातील पहिले असे हॉटेल होतं ज्यात वीजेची सुविधा (Electricity) उपलब्ध होती. त्यावेळी तिथं एक रात्र राहण्यासाठी साध्या रुमचे भाडे 10 रुपये आणि अटॅच बाथरुम आणि पंखेवाली रुमला 13 रुपये भाडे होतं.2. रतन टाटांचे वडील जमशेटजी टाटांना (Jamshedji Tata) एकदा ब्रिटिश राजवटीच्या काळातील सर्वात आलिशान हॉटेल असणाऱ्या 'वॅटसन्स हॉटेल' (Hotel Watson) मध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. कारण त्या काळात वॅटसन्स हॉटेलमध्ये फक्त गोऱ्या लोकांनाच प्रवेश होता.3. जमशेदजी टाटांना हा फक्त स्वतःचा नव्हे तर साऱ्या भारताचा अपमान वाटला आणि त्याचवेळी त्यांनी ठरवलं की भारतात असे हॉटेल बांधायचं जिथं फक्त भारतीयच नाही तर विदेशी नागरिकही कोणत्याही निर्बंधांशिवाय थांबू शकतील.4. यातूनच जन्म झाला भारताच्या पहिल्या सुपर लक्झरी हॉटेल अर्थात हॉटेल ताज महाल पॅलेसचा. ताज महाल हॉटेलची पायाभरणी जमशेटजी टाटा यांनी १८९८ मध्ये केली होती. त्यानंतर ताज महाल हॉटेलचे बांधकाम सुरू झाले. १६ डिसेंबर १९०२ ला ताज महाल हॉटेल सर्वांसाठी खुले झाले.5. विशेष म्हणजे हॉटेल ताजची उभारणी गेट वे ऑफ इंडियाच्या ९ वर्षे आधी झाली आहे. गेट वे ऑफ इंडियाची पायाभरणी १९११ मध्ये झाली होती.6. पहिल्या महायुद्धावेळी ताज महाल हॉटेलचे रुपांतर ६०० खाटांच्या एका लष्करी रुग्णालयात करण्यात आले होते.7. हॉटेल ताज हे दोन इमारतींमध्ये विस्तारलेले आहे. हॉटेल ताज पॅलेस आणि ताज टॉवर. ताज महाल पॅलेसचे बांधकाम २०व्या शतकाच्या सुरूवातीला करण्यात आले होते. तर ताज हॉटेलचा टॉवर १९७३ मध्ये तयार झाला होता.8. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हॉटेल ताजला लक्ष्य केलं होतं. 9. या हॉटेलमध्ये जगभरातील अनेक महत्त्वाचे लोकांनी वास्तव्य केलं आहे. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनीही या हॉटेल ताजमध्ये वास्तव्य केले होते.10. ताज हॉटेल्सची गुणवत्ता आणि आदरातिथ्य, ग्राहकांना देण्यात येणारी सेवा याचे कौतुक आंतरराष्ट्रीय पातळीवर झाले आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.