चीनमध्ये (China) 16 ते 24 वयोगटातील बेरोजगारी झपाट्यानं वाढत आहे.
चीनमध्ये (China) 16 ते 24 वयोगटातील बेरोजगारी झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं 2022 मध्ये झालेल्या अनेक संशोधनात असं समोर आलंय की, अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या तरुणांना आता सरकारी कार्यालयांमध्ये 'कारकून' बनण्यास भाग पाडलं जात आहे. सुमारे 1.2 कोटी तरुणांनी सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज केलेत.यंदा चीनमध्ये नोकरीच्या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पदवीधारक विद्यार्थ्यांची संख्या 1.2 कोटी असण्याची शक्यता आहे. कोरोनावेळी सरकारच्या कठोर धोरणांमुळं अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं, त्यामुळं अनेक लोक रस्त्यावर आले. त्याचबरोबर रिअल इस्टेट आणि शिक्षणाशी संबंधित कंपन्यांनाही सरकारी धोरणांचा फटका बसलाय.यावर्षी 1.76 कोटी महाविद्यालयीन पदवीधर बाहेर पडले आहेत, त्यामुळं नोकऱ्यांचं संकट निर्माण झालंय. चीनमध्ये सुमारे 8 कोटी तरुण बेरोजगार आहेत.बीजिंगच्या (Beijing) सिंघुआ विद्यापीठाचे (Tsinghua University Beijing China) प्रोफेसर झेंग युहुआंग म्हणाले, '2022 हे चीनसाठी कठीण वर्ष आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीत चीनमध्ये 4.60 लाख कंपन्या बंद झाल्या आहेत. तर, 31 लाख व्यापारी कुटुंबं दिवाळखोरीत निघाली आहेत.'अलीकडं चीनमधील अनेक बँकांमधून पैसे काढण्यास बंदी घालण्यात आलीय. बँक ऑफ चायना (Bank of China) म्हणते की, इथं जमा केलेला पैसा ही गुंतवणूक आहे. ते काढता येणार नाही. या निर्णयाविरोधात चीनमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं होत आहेत.लोकांना पैसे काढण्यापासून रोखण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट सरकारनं (Chinese Communist Government) सैन्याचे मोठे रणगाडे रस्त्यावर उतरवले आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.