Comedy Wildlife Photography Awards 2021 : गेल्या वर्षात टिपलेल्या मजेदार वन्यजीवांच्या छायाचित्रांचा सन्मान करणारा कॉमेडी वाइल्डलाइफ फोटो अवॉर्ड्सने 2021च्या स्पर्धेसाठी अंतिम स्पर्धकांची घोषणा केली आहे.
“Chinese whispers”- (जॅन कॅसल, जर्मनी)
''Chinese whispers'' : हा छोटे रॅकून्स एकमेकांना कानगोष्टी सांगतानाचा फोटो जर्मनीतील कॅसलच्या जॅन पाईचा याने क्लिक केला आहे.
Laughing Snake- (आदित्य क्षीरसागर, इंडिया) : भारताच्या पश्चिम घाटामध्ये हरणटोळ (Vine snakes) साप सहज पाहायला मिळतात. आपण जर त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे तोंड उघडून अंगावर धावून येतात. पण या सुंदर निरुउपद्रवी(Harmless) वाईन स्नेकला घाबरण्याचे काहीच कारण नाही. या हसऱ्या सापाचा फोटो क्लिक करणाऱ्या आदित्या क्षीरसागर यांनी सांगितले की, ''मला हा साप दिसला म्हणून मी खूष होतो
आणि सापाला पाहिल्यावर असे वाटले की तो माझ्याकडे पाहून हसतोय.''
Monday Morning Mood (अँड्र्यू मेयेस, राईतव्लेई नेचर रिझर्व, साऊथ अफ्रिका ):
साऊथ अफ्रिकेतील राईतव्लेई नेचर रिझर्वमध्ये झाला कवडी मैना/ पीईड स्टर्लिंग पार्च्ड ( Pied starlings perched)पक्षांच्या थव्याचा फोटो काढताना हा फोटो मी क्लिक केला. या पक्षाच्या हावभाव
अगदी Monday Morning मूड सारखे दिसत आहे.
Ninja Prairie Dog! : (अर्थूरो ट्रिव्हीयानो हायजीन, कोलोरोडो)
जेव्हा Bald Eagle चा prairie dog ला पकडण्याचा प्रयत्न चूकतो तेव्हा prairie dog हा Eagleच्या दिशेने उडी मारून जवळच्या बिळामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अर्थूरो ट्रिव्हीयानो यांनी टिपलेला क्षण!
“Time for school” ( चि कि तेओ, सिंगापूर ):
बेबी otter(पाणमांजर) (पाणमांजर) ला तोडात पकडू पोहण्याचे धडे देताना otter(पाणमांजर)
“See who jumps high” (चु हान लिन, ताईवान) :
''सर्वांत उंच उडी कोण मारणार अशा भाव चेहऱ्यावर ठेवून उडी मारणारा मासा आणि उंच उडी पाहून थक्क झालेले इतर मासे'' हा मजेशीर फोटो तायवानच्या चू हान यांनी क्लिक केला आहे.
“The Baboon who feels like a tenor” (क्लेमन्स गिनार्ड, सौदी अरेबिया) : सौदी अरेबियातील डोंगरावरून रस्त्यावर आलेला, जांभई देणारा हमाद्र्य वानरचा(Hamadryas baboon) फोटो क्लेमन्स गिनार्ड यांनी क्लिक केला आहे.“Majestic and Graceful Bald Eagle” (डेव्हिड एपली, साऊथ वेस्ट फ्लोरिडा, युएसए) :
Bald Eagles वर्षांनूवर्षे नव्हे कित्येक दशके एकच घरटे वापरतात, नवीन साहित्य वापरून वारंवार घरट्याची सुधारणा करत राहातात. सहसा उडताना फांद्या तोडण्यामध्ये ते कुशल असतात. सकाळापासून न थांबता घरटे बनवून दमल्यामुळे हा Eagle त्याची सर्वोतम कामगिरी दाखवू शकता नव्हता. कधी कधी ते कमी देखील पडतात. दिसताना हे जरी वेदनादायक दिसत असले तरी Eagles लवकर रिकव्हर होतो. नवीन फांद्या तोडण्यापूर्वी ते थोडा आरामही करतात.
“Shaking Off 2020” (डॉन विल्सन, लुईझियाना, यूएसए) :
''मी कोरोना महामारीच्या मध्यंतरीच्या काळात साधारण 2021 च्या सुरवातीला साऊथ लुईझियाना परिसरात तपकिरी रंगाचा पाणकोळी (brown pelicans) चे फोटो काढत होतो. पाणकोळी उठल्यानंतर
माश्यांकडे जाण्यापूर्वी आपले अंगावरील पाणी झटकतात. हा पाणकोळी जवळपास आपले खांदे हलवत असल्याचे दिसते. जणू तो सांगतोय की, 2021 कसे असेल याची त्याला काहीच कल्पना नाही.''
“Monkey riding a giraffe”( डिर्क-जन स्टिहॉवर. मर्चिसन फॉल्स एनपी, युगांडा) :
''काही माकडाची टोळी एका झाडावर इकडे तिकडे फांद्यावर उड्या मारत एकमेकांसोबत खेळताना आम्हाला दिसले. त्या झाडाजवळून एक जिराफ जात असताना एक माकड चटकन खाली येऊन
जिराफच्या पाठीवर जाऊन बसते'' जिराफ पाठीवर बसून फेरीचा आनंद घेतानाचे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद
The Comedy wildlife” (गुरुमुर्ती, पश्चिम घाट, भारत) : तामिलनाडूच्या पश्चिम घाटात भारतीय नाकतोड्याचा ऐटीतील अंदाज गुरुमूर्ती यांनी
टिपला.
“Treehugger” (जेकब होडान. बोर्नियो) :
''एक झाडाच्या खरबूडीत भागावर हे Proboscis monkey आपले नाक घासत आहे किंवा कदाचित किस(Kiss) करत आहे. माकडांच्या आयुष्यात झांडाचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे त्यांना जज् करणारे आपण कोण?''
“I Guess Summer’s Over” (जॉन स्पीयर्स. ओबन आर्गिल) :
''मी एका कबूतराचे फोटो काढण्याचा फोटो करत असताना एक सुकलेले पान उडून या पक्ष्याच्या तोंडावर जाऊन चिकटले. ''
“Ouch!” (केन जेन्सेन. युनान, चीन) :
“युनान चीनमधील golden silk monkey हे प्रत्यक्षात आक्रमकतेसाठी ओळखले जात परंतु माकड ज्या स्थितीत आहे ते खूप वेदनादायक दिसते!
“Opera warm-ups” (ली स्कॅडन. पर्थ, ऑस्ट्रेलिया) :
या फोटोमधील कांगारू जणू ओपेरा साँग गात असल्याचा भास होत आहे. संगीताच्या आवाजाने आसपासच्या टेकड्या जिवंत झाल्यासारख्या वाटते आहे.
“Welcome to Nature!” (मटियास हम्मर. गोथेनबर्ग, स्वीडन) :
red damselfly (लाल पतंग)चा हा फोटो जणू सुक्ष्म(Macro) निसर्गात आपले स्वागत करत आहे. red damselfly हा स्ट्रॉ वरुन चढतो आणि काही क्षण स्थिरावतो...जणू तो Hi बोलण्यासाठी थांबला आहे.
“Peek-a-boo”(पाल मार्चहार्ट. हर्गिता माऊंटन, रोमानिया) :
झाडावरुन उतरणारे हे अस्वल पाहून असे वाटते की ते लपाछपी खेळत आहे.
“I got you!” (क्रॅनिट्झ रोलँड. हंगेरी) : ''मी माझा दिवस नेहमीसारखा गोफर (जमिनीत बीळ करून राहणारा उंदरासारखा प्राणी) प्लेसवर घालवतो होतो आणि पुन्हा या छोट्याशा प्राण्यांनी त्यांचे मुळ स्वभाव दाखवणे नाकारले नाही.''“Dancing Away to Glory” "(सरोश लोधी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, भारत) :
एक लंगूर (Baboon) त्याचे अंग हलवत आहे, जणू ते नाचते असा भास होतो”
“Smoked Deer for Dinner” (सिद्धांत अग्रवाल. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारत) : “मी अनेक वर्षांपासून भारताच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात पारो नावाच्या वाघिणीच्या कुटुंबाचा मागोवा घेत आहे. ही तिची मुलगी आहे जी तिच्या मागच्या पायांवर उभी राहिली आहे जेणेकरून तिचा
चेहरा लाकडाच्या ओंडक्याला घासता येईल. पण, ती तिच्या खांद्यावर लाकडाच्या ओंढका घेऊन जात आहे असा भास होत आहे. ”
Shhhh! I’m so hungover it hurts. (अनिता रॉस, सॅन बेर्नादिनो कंट्री, कॅलिफॉर्निया) :
“तरुणांना Burrowing owl पाहणे फार आश्चर्यकारक वाटते. हा “Burrowing owl चा फोटो मी क्लिक केला कारण त्याला हॅगओव्हर झाल्यासारखा तो दिसत होता.
© Anita Ross / Comedy Wildlife Photography Awards 2021
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.