5 Biggest Forest in the World Esakal
5 Biggest Forest in the World: पृथ्वीचं संतुलन राखण्यात जंगलं महत्त्वाची भुमिका बजावतात. आधुनिकीकरणाच्या (Modernization) नादात जगातील अनेक जंगलं भुईसपाट झाली. परंतु जगभरातील काही मोठी जंगलं आजही तग धरून आहेत. या जंगलांना पृथ्वीचं फुप्फुस (Lungs of the Earth) म्हटलं जातं. जगातील सर्वात मोठी जंगलं कोणती आहेत, ते आपण पाहूया.
1. अॅमेझॉन जंगल (Amazon Jungle) - दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठं जंगल आहे. ७०,००,००० चौरस किमी क्षेत्र असलेलं हे जंगल तब्बल ९ देशांत पसरले आहे. या जंगलाला पृथ्वीचं फुप्फूस म्हणतात. 2. कांगो जंगल (Congo Forest)- कांगो हे जगातील
दुसऱ्या क्रमांकाचं तर आफ्रिकेतील सर्वात मोठं जंगल आहे. या जंगलामध्ये पिग्मी चिंपाझी पहायला मिळतात. 3. न्यू जीनिया फॉरेस्ट (New Xenia Forest)- जगातील सर्वात मोठं तिसऱ्या क्रमांकाचं जंगल म्हणून न्यू जीनिया जंगल ओळखलं जातं. हे जंगल 2,88,000 वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. 4. टोंगास (Tongas)- पूर्व अमेरिकेतील अलास्कामधील टोंगास जंगल जगातील सर्वात मोठ्या पाच जंगलांपैकी एक आहे. 5. वाल्दिवियन जंगल (Valdivian Forest)- तब्बल 2,48,100 वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं हे जंगल जगातील सर्वात मोठ्या जंगलांपैकी एक आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.