वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक अधिक फायदेशीर ठरतात. डिटॉक्स ड्रिंकमुळे पचनक्रिया सुधारते. योग्य पचनक्रिया हे वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.डिटॉक्स ड्रिंक देखील शरीरातून विषारी द्रव बाहेर टाकण्यास आणि शरीराच्या चयापचयात वाढ देण्यास मदत करते. चांगली पाचनक्रिया आणि चांगले चयापचय प्राणाली आत्मसात केल्या वजन कमी करण्याचे ध्येय सहज साध्य होते. तुम्ही आहारात काही बदल केले तर या5 डिटॉक्स ड्रिंकमुळे तुमचे शरीरातील चयापचयक्रिया वाढेल आणि वजन कमी करण्यास मदत होईल.
वाळ्याचे पाणी(vetiver Water) :
वाळ्याचे किंवा खसखस हे शरिरात थंडावा निर्माण करण्यासाठी ओळखले जातात. वाळ्याच्या मुळांना गरम पाण्यात उकळून सहज डिटॉक्स ड्रिंकबनविता येते. एका दिवसाआड
हे गाळून पाणी घेऊ शकता.डिटॉक्स वॉटर वजन कमी करणे(weight loss), मज्जातंतूला विश्रांती देण्यासाठी (nerve relaxation), आणि निद्रानाशांवर( insomnia) उपचारासाठी उत्तम आहे. वाळ्याचे पाणी हे त्वचा आणि यकृतसाठी देखील उत्तम काम करते. वाळ्याच्या मुळांचा वापरण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्यातून काढलेल्या आवश्यक तेलांचा वापर.
धन्याचे पाणी (Coriander Water) :
कोथिंबीर पचनक्रियेसाठी उपयुक्त द्रव्य(digestive enzymes ) आणि रसांना(juices) उत्तेजित करते, जे आपल्या पाचक प्रणाली वाढविण्यासाठी ओळखले जाते. तसेच यातून फायबर देखील मिळते. एक चमचा धने टाकून उकळून हे पाणी तयार करता येते. पाणी उकळून गॅस बंद करा आणि रात्रभर थंड होण्यासाठी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गाळून प्यावे.जीरे आणि लिंबू पाणी (Cumin-Lemon Water)
जीऱ्याचे सेवन केल्यास चयापचय गती वाढते आणि पचन सुधारल्यामुळे शरीरातील कॅलरी जलद कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. एक चमचा जीरे रात्रभर भिजवत ठेवा आणि सकाळी गरम पाण्यासह उकळून घ्या. जीरे गाळून तयार कोमट पाणी प्यावे. त्यामध्ये अर्धा लिंबू चा रस टाकून हे पाणी रोज सकाळी प्यावेदालचिनी आणि मधाचे पाणी
रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्यास झोप लागल्यानंतर सुरवातीच्या काही काळात कॅलरीज् कमी होतात. मधामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी चरबींनी असतात.
मधातील आवश्यक घटक भूक आणि वजन कमी करण्यास मदत करतात. दुसरीकडे दालचिनी शरीरातील जास्तीची चरबी कमी करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते
दालचिनीमधील अँटीमाइक्रोबियल, अँटीपारॅसिटिक गुणधर्मांमुळे तो आरोग्यासाठी उत्तम सर्वात मसालेदार पदार्थ ठरतो. याचे सेवन केल्याने सर्दी, अॅलर्जी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
मेथीचे पाणी (Fenugreek Water)
मेथी हे लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे, व्हिटॅमिन बी 6, प्रथिने आणि आहारातील फायबर सारख्या अनेक फायदेशीर जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांचा समृद्ध असा स्रोत आहे.
मेथीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. मेथीचे बरेचसे आरोग्य फायदे त्यामध्ये असणाऱया सॅपोनिन्स आणि फायबरमुळे होतात.
मेथीमध्ये उच्च-गुणवत्तेच्या फायबरमुळे पचन होण्यास आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित करण्यात मदतशीर ठरते. तुम्हाला रात्रभर मेथी भिजवून ठेवून सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचे आहे. फक्त मेथीचे दाणे गाळून पाणी प्यावे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.