जगभरात भारताला मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांचा देश म्हणून ओळखलं जातं. या देशात सर्वधर्म समभाव असून विविध प्रकारचे धर्म मोठ्या संख्येनं आढळतात.
जगभरात भारताला मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांचा देश म्हणून ओळखलं जातं. या देशात सर्वधर्म समभाव असून विविध प्रकारचे धर्म मोठ्या संख्येनं आढळतात. भारतात हिंदूंची संख्या सर्वाधिक असल्याने येथे हिंदू मंदिरं मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येनं भाविक देव-दर्शनासाठी येत असतात. इथल्या जवळपास प्रत्येक भागात एक मंदिर आपल्याला पहायला मिळेल. इतकेच नाही, तर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून देवाच्या श्रध्देपोटी कोट्यवधींची देणगी दिली जाते. इथं प्रत्येक मंदिराचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे. मात्र, सध्या कोरोना महामारीमुळे जवळपास सर्वच मंदिरे बंद आहेत.पद्मनाभ स्वामी मंदिर (Padmanabha Swamy Temple, Kerala) : केरळच्या तिरुअनंतपूरममध्ये असलेलं पद्मनाभ स्वामी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं. एका अहवालानुसार, या मंदिराच्या 6 तिजोऱ्यांमध्ये सुमारे 20 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. पद्मनाभ स्वामी मंदिरात भगवान महाविष्णूची सोन्याची मूर्ती असून त्याची साधारण किंमत 500 कोटी रुपये इतकी आहे.तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) : आंध्र प्रदेशच्या तिरुमालामध्ये असलेलं तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी साधारण 60 हजारहून अधिक भाविक देव-दर्शनासाठी येत असतात. मात्र, कोरोनामुळे सध्या या मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलीय. दरवर्षी या मंदिराला भाविकांकडून 650 कोटी इतकी देणगी देण्यात येते. साई बाबा मंदिर, शिर्डी (Sai Baba Temple, Shirdi) : महाराष्ट्रात असणाऱ्या अहमदनगरातील शिर्डी साई बाबा मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. शिर्डी साई संस्थानच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी भाविकांकडून सुमारे 480 कोटी इतके देणगी दिली जाते.वैष्णो देवी मंदिर, जम्मू (Vaishno Devi Temple Jammu Kashmir) : माता राणी वैष्णो देवी मंदिर देशभरात खूप लोकप्रिय आहे. दरवर्षी, या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. टूर माय इंडिया कॉमच्या मते, दरवर्षी सुमारे 500 कोटी रूपयांची देगणी भाविकांकडून मंदिराला दिली जाते.सिद्धिविनायक मंदिर, मुंबई (Siddhivinayak Temple Mumbai) : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे गणेशाचं एक अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत असे बरेच लोक श्री दर्शन व आपला नवस मागण्यासाठी येथे येतात. एका वृत्तानुसार, दरवर्षी मंदिरात जवळ-जवळ 75 ते 125 कोटी इतकी रक्कम भाविकांकडून देगणी स्वरुपात देण्यात येते. डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.