सध्या हे 21 व्या शतकाचे युग आहे, पण भारतात अशा लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे, जे अजूनही त्यांचे वैयक्तिक आयुष्य, लव्ह लाइफ किंवा रिलेशनशिप याबद्दल बोलण्यास कचरतात. OkCupid या डेटिंग अॅपने याबद्दलची रोचक आकडेवारी मांडली आहे. ही आकडेवारी असे दर्शवते की, भारतीय लोक या प्रकरणात स्वतःला कसे व्यक्त करतात आणि ते त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे. जेव्हा नात्यामध्ये भावना आणि आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न येतो, तेव्हा 68 टक्के यूजर्सं रिलेशनशिपमध्ये त्यांच्या पार्टनरला फ्रिडम देण्यात अधिक आत्मविश्वास दाखवतात. 73 टक्के यूजर्संना त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यातून लॉन्ग टर्म रिलेशनशिपचा आनंद घ्यायचा असतो. 27 टक्के असे यूजर्सं आहेत, ज्यांना त्यांच्या पार्टनरसह ज्वॉइंट बॅंक अकाउंटवर आक्षेप आहे.
सर्वेक्षणात, यूजर्संना विचारण्यात आले की, त्यांना कशामध्ये अधिक स्वतंत्र वाटते. यूजर्संच्या प्रतिसादांवर आधारित आकडेवारीनुसार, 39 टक्के लोक आर्थिक बाबतीत स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचे मानतात. त्यानंतर 30 टक्के लोक ट्रॅव्हल्समध्ये, 22 टक्के लोक लैंगिकता (सेक्युअलिटी)मध्ये, आणि 9 टक्के लोक कला (आर्ट)मध्ये अत्यंत महत्वाचे मानतात.
जेव्हा यूजर्संना विचारण्यात आले की, त्यांना पैसे आणि स्वातंत्र्य यात कोणती गोष्ट जास्त आवडते, तेव्हा 65 टक्के यूजर्संनी सांगितले की, त्यांना पैशापेक्षा स्वातंत्र्य जास्त आवडते. तर 35 टक्के यूजर्संनी पैशाला प्राधान्य दिले. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, भारतातील बहुतेक लोक पैशानंतर त्यांच्या स्वातंत्र्याशी तडजोड करू शकत नाहीत. त्याच वेळी, काही लोकांसाठी, पैशासमोर स्वातंत्र्य खूप लहान आहे.
जेव्हा नात्यामध्ये भावना आणि आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न येतो, तेव्हा 68 टक्के यूजर्सं रिलेशनशिपमध्ये त्यांच्या पार्टनरला फ्रिडम देण्यात अधिक आत्मविश्वास दाखवतात. 73 टक्के यूजर्संना त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यातून लॉन्ग टर्म रिलेशनशिपचा आनंद घ्यायचा आहे. 27 टक्के असे यूजर्सं आहेत, ज्यांना त्यांच्या पार्टनरसह ज्वॉइंट बॅंक अकाउंटवर आक्षेप आहे.या डेटाचा वापर भारतीय डेटर्स स्वातंत्र्याच्या जीवनातील विविध पैलूंकडे कसे पाहतात आणि हा विश्वास त्यांच्या प्रेमाच्या शोधावर कसा प्रभाव टाकू शकतो हे समजून घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो. डेटिंग प्लॅटफॉर्मवर भारतीय यूजर्संकडून बरेच प्रश्न विचारले गेले.
येथे लोकांना विचारण्यात आले की, प्रेस स्वातंत्र्य आवश्यक आहे की नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना 90 टक्के लोकांनी प्रेसचे स्वातंत्र्य आवश्यक मानले आहे. जेव्हा यूजर्संना विचारण्यात आले की, धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी कायदे असावेत असे तुम्हाला वाटते का? यावेळी प्रतिसादात, 76 टक्के यूजर्संनी असे मानले की धार्मिक स्वातंत्र्य राखण्यासाठी कायदा आवश्यक आहे.यूजर्संना विचारण्यात आले की, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेपेक्षा (सिक्युरिटी) कोणते महत्त्वाचे आहे? या प्रश्नाला उत्तर देताना 58 टक्के यूजर्संनी सांगितले की, त्यांच्यासाठी स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचे आहे. तर 42 टक्के लोकांनी सुरक्षेला प्राधान्य दिले. इथेही लोकांनी सुरक्षेपेक्षा स्वातंत्र्य अधिक महत्वाचे मानले.संस्कृती, जातीयता किंवा वंश तुमच्या ओळखीमध्ये मोठी भूमिका बजावते का? येथे 34 टक्के यूजर्संचा असा विश्वास आहे की, त्यांची ओळख त्यांच्या वशं पंरपरेपासून पूर्णपणे स्वतंत्र आहे. तर 25 टक्के लोक असेही होते ज्यांनी सांगितले की, संस्कृती, वांशिकता किंवा वंश त्यांची ओळख उघड करण्यात विशेष भूमिका बजावतात.OkCupid चे सीनियर मार्केटिंग मॅनेजर सितारा मेनन म्हणाले की, भारतीयांना नॅशनल किंवा पर्सनल लेव्हलवर खुलेपणाने व्यक्त होण्याचा अधिकार म्हणून स्वातंत्र्य दिसते. अशा बारकावे कम्फर्टिबिलीटिबद्दल बोलतात आणि प्रेमाच्या शोधात खूप महत्वाचे बनतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.