7 scariest restaurants in the world Sakal
रेस्तराँ (Restaurants) किंवा हॉटेलमधलं जेवण (Meal) खाल्ल्यानंतर तिथली चव लोकांना आठवते. पण जगात अशी काही रेस्टॉरंट आहेत, जी जेवणापेक्षा जास्त तेथील भीतीदायक वातावरणासाठी (Scariest Atmosphere) ओळखली जातात. या रेस्तराँमध्ये जायला लोक प्रचंड घाबरतात. यापैकी काही रेस्तराँ एकतर उंचीवर आहेत किंवा त्यांची रचना स्मशानभूमीप्रमाणे करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी टेबलाला शवपेटीचा आकारही देण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रेस्तराँबद्दल सांगणार आहोत. (7 scariest restaurants in the world)
डिनर इन द स्काय (बेल्जियम) - 160 फूट वर हवेत डोलणाऱ्या टेबल-खुर्च्यांवर स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्यायचा असेल तर हे सर्वोत्तम रेस्तराँ आहे. जेवणादरम्यान, 22 लोकांना सेफ्टी बेल्टने खुर्च्यांवर एकत्र बांधले जाते आणि त्यांना 160 फूट उंचीवर नेले जाते, जेथून जेवताना संपूर्ण शहराचे दृश्य पाहता येते. लोकांना डायनिंग सीटवर बसण्यापूर्वी विमा पॉलिसीवर स्वाक्षरी करावी लागेल. या रेस्टॉरंटच्या जगभरात अनेक शाखा आहेत.द न्यू लकी रेस्टॉरंट (अहमदाबाद) - 'डाईन विथ डेड' असा एक वाक्प्रचार या रेस्टॉरंटवर अगदी चपखल बसतो. डझनभर दगडी शवपेटी स्टीलच्या रेलिंगमध्ये बसवण्यात आल्या आहेत. असे म्हटले जाते की या शवपेटी 16 व्या शतकातील संताच्या अनुयायांच्या होत्या. येथील पालक पनीर चवीसाठी खूप प्रसिद्ध आहे.डॅन्स ले नॉयर (न्यूयॉर्क) - अंधारात अन्न खाण्यापेक्षा भयानक काय असू शकते. न्यूयॉर्कच्या डॅन्स ले नॉयर रेस्टॉरंटमध्ये लाइटिंग उपकरणांवर पूर्ण बंदी आहे. तुम्ही तुमच्या फोनचा लाईट देखील चालू करू शकत नाही. अंधारात बसून जेवणाचा आनंद घ्यावा लागतो. दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे अनोळखी व्यक्तीसोबत बसून जेवणाची चव चाखायची असते.फोर्टेझा मेडिसिया (इटली) - फोर्टेझा मेडिसिया हे इटलीतील एक प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे, जे 2007 सालापासून पाहुण्यांच्या सेवेत आहे. 1474 मध्ये बांधण्यात आलेला हा एक राजवाडा आहे, परंतु आज त्याचा वापर कडक सुरक्षा तुरुंग म्हणून केला जातो. येथे कारागृहातील कैदी अन्न शिजवतात. सुरक्षेच्या कारणास्तव ते अन्न प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये दिले जाते. खूप प्रसिद्ध असल्यामुळे या रेस्टॉरंटचे बुकिंग काही आठवडे अगोदर करावे लागते. येथे तुम्हाला स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेताना पियानोच्या सुरांचा आनंद घेता येईल.नयोतैमोरी (टोकियो) - जपानची राजधानी टोकियोमध्ये बनवलेले हे रेस्टॉरंट लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इथे जेवणाने सजलेल्या स्त्रीच्या आकारात बनवलेली डमी लोकांसमोर टेबलावर ठेवली जाते. खाण्यासाठी चाकू आणि काट्याऐवजी ऑपरेशन टूल्सचा वापर केला जातो. मग हाऊस पब (इंग्लंड) - खडकाळ जमिनीवर बांधलेल्या या सुंदर रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला स्मशानभूमीतून जावे लागेल. यानंतर तुम्हाला बॅकरूम, बार आणि डायनिंग एरिया सारखी ठिकाणे दिसतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जेवताना मधेच काही भीतीदायक आवाज ऐकू येतील. तुम्हाला बिअरच्या तळातून कोणाच्या तरी ठोकण्याचा आवाजही ऐकू येईल. डिझास्टर कॅफे- भूकंपाचे धक्के या रेस्टॉरंटमध्ये अधिक पर्यटकांना आकर्षित करतात. रात्री येथे ७.८ रिश्टर स्केलच्या कृत्रिम भूकंपाचे धक्के जाणवतात. कॅफेमध्ये उपस्थित कर्मचारी नेहमीच सेफ्टी कॅप आणि वेस्ट घातलेले दिसतात. ड्रोनद्वारे अन्न आणि मद्य पाठवले जाते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.