फिरायला जाण्यासाठी भारतातील 'हिमाचल प्रदेश' (Himachal Pradesh) हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंती आहे. तेथील सुंदर मैदाने, सुंदर दृश्ये आणि बर्फाच्छादितील पर्वत पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात, म्हणून आम्ही तुम्हाला हिमाचलच्या 7 गुप्त ठिकाणांबद्दल सांगू, जिथं तुम्हाला एकदा भेट द्यायलाच हवी.
जंजेहली (Janjehli Valley) : 'जंजेहली घाटी' हे कॅम्पिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान येथे भेट देण्याचा उत्तम वेळ असतो.करसोग व्हॅली (Karsog Valley) : शिमल्याजवळ हिमालयात वसलेलं 'करसोग व्हॅली' हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात आहे. याचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे. कारण, इतकं हे सुंदर ठिकाण आहे.प्रिनी (Prini Himachal) : हिमाचल प्रदेशातील मनालीत वसलेलं प्रिनी गाव देखील अतिशय सुंदर मैदानांनी वेढलेलं आहे. मंत्रमुग्ध करणारे धबधबे आणि हिरवेगार पर्वत तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातील.शोजा (Shoja Valley) : हे ठिकाण पक्षी निरीक्षण, कॅम्पिंग, ट्रेल्स आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल, तर तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये शोजाचा नक्कीच समावेश करा.जिभी (Jibhi) : हिमाचल प्रदेशच्या बंजार व्हॅली अथवा तीर्थन व्हॅलीमध्ये वसलेल्या या गावात तुम्ही सहजरित्या पोहोचू शकता. हे गाव देखील खूपच सुंदर आहे.रेणुकाजी (Renukaji) : येथे भेट दिल्यानंतर आपल्याला वेगळ्या जगात राहत असल्याचा भास होईल. आपण सिरमौर जिल्ह्यातील रेणुका तलावाला देखील भेट देऊ शकता, जे हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठे तलाव आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.