सुमारे 800 वर्षांपूर्वी पेरूमधील (Peru) समुद्र किनाऱ्यावर एका तरुणाला दफन करण्यात आलं होतं. लोकांनी पुरलेल्या या व्यक्तीला ममी (Mummy) बनवलं. त्याचा मृतदेह विशेष कपड्यानं गुंडाळून बांधण्यात आला होता.
सुमारे 800 वर्षांपूर्वी पेरूमधील (Peru) समुद्र किनाऱ्यावर एका तरुणाला दफन करण्यात आलं होतं. लोकांनी पुरलेल्या या व्यक्तीला ममी (Mummy) बनवलं. त्याचा मृतदेह विशेष कपड्यानं गुंडाळून बांधण्यात आला होता. त्याचे हात-पायही बांधण्यात आले होते. जणू त्याला बसलेल्या स्थितीतच बांधून ठेवलं गेलं होतं. ही ममी अँडियन पर्वत (Andean Mountains) परिसरात सापडलीय.शेकडो वर्षांपासून ही ममी इथेच पडून होती. या वर्षाच्या सुरुवातीला एका घुमटाचा शोध घेत असताना, याचा शोध लागला. नेशनल युनिव्हर्सिटी ऑफ सॅन मार्कोसचे पुरातत्वशास्त्रज्ञ योमिरा सिल्विया हुआमॅन सॅंटिलॅन आणि पीटर व्हॅन डॅलेन लुना यांनी याचा शोध लावला. दोघींनीही घुमटाच्या आत ममी पाहिल्यावर, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, ही ममी सडलेल्या अवस्थेत होती.योमिरा सिल्व्हियानं सांगितलं, की ममी सापडताच आमची संपूर्ण टीम आनंदानं उड्या मारु लागली. कारण, आम्ही इतिहासाचं एक नवं पान शोधून काढलं होतं. अशा महत्त्वाच्या शोधाची आम्हाला अपेक्षाच नव्हती. आता आणखी काही संशोधक या घुमटाचा आणि ममीचा काय संबंध आहे, हे शोधण्यासाठी अभ्यास करत आहेत. याच ठिकाणी या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. योमिरा म्हणते, या ममीचा काळ साधारण इंका साम्राज्य (Inca Empire) सुरू झाले, तेव्हाचा असावा. 16 व्या शतकात स्पॅनिश लोकांनी (Spaniards) आक्रमण केले, तेव्हा इंका साम्राज्याचा अंत सुरू झाल्याचे पहायला मिळाले.ही ममी पुरुषाची आहे की स्त्रीची, हे पुरातत्वशास्त्रज्ञांना अद्याप समजलेलं नाही. पण, जेव्हा या व्यक्तीचा मृत्यू झाला, तेव्हा त्याचं वय 25 ते 30 च्या दरम्यान असावं. रेडिओ कार्बन डेटिंगच्या माध्यमातून आम्ही याबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं योमिरा म्हणाली.ही ममी काजामारक्विला शहरातील अंडाकृती घुमटाच्या आत सापडली. हा भाग लिमा शहराच्या हद्दीत येतो. हे संपूर्ण शहर मातीच्या विटांनी बनलेलं आहे. एकेकाळी हे पेरूमधील सर्वात मोठं व्यावसायिक केंद्र होतं. लिमा किनार्याजवळच्या या प्री-हिस्पॅनिक ठिकाणाचा अभ्यास व्हायला हवा होता. मात्र, तो झाला नाही.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.