लोहगाव (जि.औरंगाबाद) : सामान्य शिवसैनिकांची प्रंचड मेहनत व आशीर्वादाने आमदार मंत्री पदे भोगणाऱ्यांनी स्वत:च्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी गद्दारी केली. त्यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे म्हणजे शिवसेना काय आहे. याचे उत्तर समजेल असा इशारा माजी मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बिडकीन शिवसंवाद कार्यक्रमात बोलताना गद्दार आमदारांना दिला.
आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत करण्यात आले.शनिवार (ता.२३) पैठण तालुक्यातील बिडकीन येथील निलजगाव फाट्यावर माजी मंत्री युवासेना आदित्य ठाकरे, सहसंपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत, पैठण तालुका शिवसेना प्रमुख मनोज पेरे, युवा सेना अध्यक्ष शुभम पिवळ, कमलाकर वानोळे, विकास गोर्डे, माजी सरपंच अशोक धर्मे, किरण गुजर, राखी परदेशी, ठकुबाई कोथिंबीरे, विजय शेजूळ, ज्ञानेश्वर औटी आदीं हजारो शिवसैनिकाच्या उपस्थितीत शिवसंवाद मेळावा पार पडला.यावेळी बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या आजाराचा फायदा घेऊन गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसून राज्यात सत्ता मिळणाऱ्याचे कोणत्याही परिस्थितीत हे सरकार कोसळणार आणि मध्यावधी निवडणूका होणार आहे. हे लिहून ठेवा, असे शिवसैनिकांना आवाहन करून ते म्हणाले की राजकारण हे चांगल्या लोकाचे नाही असे गद्दार म्हणायचे.परंतू शिवसेना देशात व जगात दाखवून देईल की राजकारणात चांगले लोकांना स्थान आहे. असे काम आपण करणार आहे.शिवसंवादात बोलताना आदित्य ठाकरेकार्यकर्त्यांना अभिवादन करताना आदित्य ठाकरेमोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यासाठी आमच्या दुःखात सामिल होऊन आशीर्वाद द्या, असे आवाहन करून पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना, वाॅटरग्रिड योजना, संतपीठ, डीएमआयसीसाठी दिलेल्या निधीचा उल्लेख करून नव महाराष्ट्र घडवण्यासाठी बळ देण्याचे भावनिक आवाहन केले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.