कोल्हापूर : पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे दोन दिवस कोल्हापुरच्या (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी काल शिरोळ (Shirol) तालुक्याचा दौरा केला. आज सकाळी श्री अंबाबाईचे दर्शन (Ambabai Temple) घेतले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने प्रभारी अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला त्यानंतर ठाकरे राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचे निवासस्थानी रवाना झाले आहेत. कोल्हापुरात आज दर्शन घेतल्यानंतर त्यांनी राजकीय विषयावर बोलणे टाळले. यादरम्यानची काही छायाचित्रे...
पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे दोन दिवस कोल्हापुरच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी काल शिरोळ तालुक्याचा दौरा केला. आज सकाळी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी केली अंबाबाई मंदिराची पहाणी. माझ्या हातून चांगलं काम होऊ दे अस साकडं त्यांनी अंबाबाई चरणी घातले.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने प्रभारी अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला त्यानंतर ठाकरे राजेश क्षीरसागर यांचे निवासस्थानी रवाना झाले.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गाभाऱ्यात दर्शन घेतले.पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज कोल्हापुरात श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गाभाऱ्यात अंबाबाईची प्रतिमा भेट देण्यात आली.-कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी ३१ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यासाठी विकास निधी दिल्याबद्दल जिल्ह्यातील शिवसेना आमदार आणि शहर शिवसेनेच्या वतीने ठाकरे यांचा तलवार आणि अंबाबाईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.कोल्हापुरात आज दर्शन घेतल्यानंतर मंत्री ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र मंदिरात मी राजकीय विषयावर बोलणार नाही असे ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी मागणी करणारे निवेदन मंत्री ठाकरे यांना देण्यात आलेसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.