स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर संजनाला वेध लागले ते लग्नाचे.
गेली कित्येक वर्ष ती ज्या दिवसाची वाट पहात होती तो दिवस आता जवळ आलाय. ३० ऑगस्ट ही या दोघांच्या लग्नाची तारीख पक्की झाली आहे.
अनिरुद्धसोबत लगीनगाठ बांधून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे. लग्नामध्ये संजना नटण्याची सर्व हौस भागवून घेणार आहे. गुलाबी रंगाच्या साडीतला तिचा ब्रायडल लूक सध्या व्हायरल होतोय.
आई कुठे काय करते मालिकेतल्या संजनाच्या लूकची नेहमीच चर्चा राहिली आहे. संजनाचं स्टाइल स्टेटमेंट तिचे चाहते फॉलो करताना दिसतात. संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेला देखिल फॅशनचे नवनवे ट्रेंड ट्राय करायला खूप आवडतं.
त्यामुळे अनिरुद्धसोबतच्या लग्नासाठी तिने खास तयारी केलीय. गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. अनिरुद्धच्या नावाची मेहंदीही तिच्या हातावर सजली आहे.
आता या दोघांचं लग्न पार पडणार की इथेही नवा ट्विस्ट येणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल. आई कुठे काय करते ही मालिका सोमवार ते शनिवार ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.