आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाची एक प्रकारे दिवाळीच असते. या वेळी विठुरायाला आणि श्री रुक्मिणीमातेला घालण्यासाठी खास बंगळूर येथून आकर्षक रेशमी पोषाख आणण्यात आला. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे अर्थात राजस सुकुमाराचे आणि श्री रुक्मिणीमातेचे रूप अधिकच खुलून दिसू लागले.
रुक्मिणी मंदिरात फुलांची आणि सफरचदांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्री विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध रंगाच्या आणि सुगंधांच्या या मनमोहक सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभाऱ्यात आणि संपूर्ण मंदिरात फुलांचा सुगंध दरवळतो आहे.श्री विठ्ठल - रुक्मिणीची शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिरातील वीणेकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई आदी उपस्थित होते.रुक्मिणी मंदिरआषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.श्री विठ्ठल - रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. श्री विठ्ठल - रुक्मिणीची शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंदिरातील वीणेकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई आदी उपस्थित होते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.