मैत्री....सुंदर नात्यांपैकी एक नातं. मैत्रीचा दिवस साजरा करताना मराठी चित्रपटसृष्टीतील लक्ष्या आणि अशोक यांची धमाकेदार जोडी विसरून कसं चालेल.. लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी 80-90 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीधुमाकूळ घातला. विनोदी शैली आणि उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर या जोडीने अनेकांची मन जिंकली. आज ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लक्ष्य आणि अशोक सराफ या जोडीचे 5 गाजलेले चित्रपट पाहूयात...
लक्ष्या आणि अशोक या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले. धमाल जोडी, प्रेम करू या खुल्लम खुल्ला, धूमधडाका, धरलं तर चावतय, फेका फेकी, गडबड घोटाळा, इजा बिजा तिजा, गोडी गुलाबी, एका पेक्षा एक, मुंबई, ते मॉरेशिअस...या चित्रपटांमध्ये या जोडीने एकत्र काम केले. लक्ष्या आणि अशोक जा जोडीच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे आयत्या घरात घरोबा. एक गरीब माणूस आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्षातीली 3 महिने एका मोठ्या बंगल्यात राहायला जातो त्यांनतर पुढे काय घडते यावर विनोदी गोष्टी दाखवली आहे. लक्ष्या आणि अशोक या जोडीची धमाल या चित्रपटात पाहा मिळते. दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित शेजारी शेजारी या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली. लग्नाचं खोट नाटक करणाऱ्या एका जोडप्याला शेजारी एक नवं जोडपं राहायला येत त्यानंतर होणारी धमाल या चित्रपटात दाखवली आहे.90 च्या दशकात गाजलेला आणि विनोदी अभिनयाची मेजवानी ठरलेला चित्रपट म्हणजे बाळाचे बाप ब्रह्मचारी. लक्ष्या आणि अशोक या जोडीने दोन अविवाहित तरुणाची भूमिका साकारली आहे ज्यांच्या दारात कोणीतरी बाळ सोडून जाते ...त्यानंतर पुढे काय घटते यावर ही कथा आधारित आहे. मराठी चित्रपसृष्टीतील प्रेक्षकांचा आवडता चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी.1988 च्या दशकात
या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता लक्ष्याने साकारलेली परश्या आणि पार्वतीच्या भूमिकेला आजही प्रेक्षकांची पसंती मिळते. अशोक सराफ यांची धनंजय माने या भूमिकेला प्रेक्षकांची वाह वा मिळाली. लक्ष्या आणि अशोक या जोडीने चंगुमंगु या चित्रपटामध्ये साकारलेल्या दोन भावांच्या भूमिकेने आणि विनोदी करामतीने प्रेक्षकांना पोट धरून हसविले. त्या काळी हा सिनेमा हाऊसफुल्ल झाला होता. नंतर या चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक झाला ज्यामध्ये गोविंदा आणि चंकी पांडे यांनी काम केले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.