तुळशी विवाहानंतर सुरू होतो लग्नाचा सिझन. लग्न ठरलं की साखरपुड्याची अंगठी, साडी खरेदी होते. त्यातही मुला-मुलींना खूप उत्साह असतो. पण लग्नाची खरेदी जवळ आली की मात्र पोटात गोळा येतो. खूप खरेदी करायची असते. लग्नात मुलींची सगळ्यात आवडीची खरेदी म्हणजे मंगळसूत्र. या खरेदीआधी मुली डायरेक्ट दुकानात जाण्याआधी मंगळसूत्र कसं असाव याबाबत रिसर्च करतात. त्यासाठी इंटरनेट कामाला येतोच. पण आता अनेक अभिनेत्रींची मंगळसूत्र बघून तसे करण्याकडे मुलींचा कल वाढला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या लग्नात अशाप्रकारे मंगळसूत्र करून घेऊ शकता.
पत्रलेखा स्टाईल- सब्यसाचीने डिझाईन केलेले हे मंगळसूत्र आणि लाल कपडे घालून पत्रलेखा गेल्या आठवड्यात दिसली. तिच्या या मंगळसूत्राची सोशल मिडियावर खूप चर्चा होती. रसिका सुनील- रसिका सुनील ने दिवाळीच्या आधी लग्न केले. तिचे छोटे मंगळसूत्र लक्षवेधी ठरले.आयुशी टिळक- सुयश टिळकची बायको आयुशीचे छोटे मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. मोठ्या मंगळसूत्राबरोब ती ते सध्या नियमित घालते आहे. सोनाली कुलकर्णी- सोनालीच्या लग्नानंतर तीने आद्या ने डिझाईन केलेल्या मंगळसूत्राला पसंती दिली. सिल्वर डिझाईन असलेली तिची ही मंगळसूत्र खूप लोकप्रिय ठरली. मिताली मयेकर- सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाबरोबर त्यांनी घातलेल्या कपड्यांची, मंगळसु्त्राची चर्चा झाली. मितालीचे हे मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. यामी गौतम आणि दिया मिर्झा यांची ही लहान पण मध्ये डायमंड असलेली मंगळसूत्र. लहान मंगळसुत्रांसाठी सध्या अनेकींची या मंगळसूत्रांन पसंती आहे. स्वप्नाली पाटील- स्वप्नाली पाटीलचे साधे पण दिसायला आकर्षक दिसणारे हे मंगळसूत्र ती नेहमी सणावाराला वापरते. अभिज्ञा भावे- अभिज्ञाने घातलेल्या मंगळसूत्रात एम आणि ए अशी आद्याक्षरे लिहिली होती. तेही मंगळसूत्र खूप लोकप्रिय ठरले. त्यानंतर अशी मंगळसूत्र बनवून घेण्याचा ट्रेंड आला होता. दीपिका पादुकोण- दिपिका पादुकोणच्या या डायमंड मंगळसूत्राची तिच्या लग्नाइतकीच चर्चा रंगली. सोनम कपूर- सोनम कपूरने तिच्या आणि आनंद अहुजाच्या राशीची साईन मंगळसूत्रात कोरली होती. हे मंगळसूत्र लोकप्रिय ठरले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.